ठाकरे गटातील कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात; राऊत बंधू संतापले
ईशान्य मुंबईत मतदान सुरु आहे. पोलिसांनी ठाकरे गटाच्या दोन कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. त्यानंतर ठाकरे सेनेचे आमदार सुनिल राऊत यांनी पोलिसांशी वाद घातला. त्यांनी पोलिसांना जाब विचारला.
मुंबई : देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. राज्यात आज पाचव्या टप्प्यातलं मतदान सुरु आहे. मुंबईच्या सहा जागांसह राज्यातील एकूण १३ मतदारसंघात आज मतदान होत आहे. ईशान्य मुंबईत मतदान सुरु आहे. पोलिसांनी ठाकरे गटाच्या दोन कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. त्यानंतर ठाकरे सेनेचे आमदार सुनिल राऊत यांनी पोलिसांशी वाद घातला. त्यांनी पोलिसांना जाब विचारला.
मतदान केंद्रावर ठाकरे गटाचे कार्यकर्ते हे डमी मशीनचं प्रात्यक्षिक दाखवत होते. मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आणि गाडीत बसवले. हे लक्षात येताच राऊत यांनी पोलिसांना या कारवाईबाबात प्रश्न विचारले. आमचे कार्यकर्ते मतदान केंद्रापासून 100 मीटर बाहेर अंतरावर होते, टेबलवर नागरिकांना मार्गदर्शन करत होते, मग त्यांना ताब्यात का घेतले असा सवाल पोलिसांना विचारला. आमच्या कार्यकर्त्यांवर दबाव आणला जात आहे, त्यांना धमकी दिली जात आहे, असा आरोपही त्यांनी केला. भाजपला पराभव दिसू लागला आहे, म्हणून पोलिसांवर जबाव आणला जातोय, अशी टीका त्यांनी केली.
दरम्यान पोलिसांच्या या कारवाईवर संजय रऊत यांनीही नाराजी व्यक्त केली. प्रचंड पैशांचे वाटप केले जात आहे. त्यावर काही कारवाई केली जात नाही. निवडणूक आयोग हे भारतीय जनता पक्षाची शाखा म्हणून काम करत आहे, असा आरोप त्यांनी केला. निवडणूक आयोगाची अशी कोणतीही नियमावली नाही. मार्गदर्शन करण्यासंदर्भात काही नियमावली नाही. तरीही काही लोकांनी पोलिसांवार, अधिकाऱ्यांवर दादागिरी करत आमच्या कार्यकर्त्यांना अटक केली. पोलीस त्यांना घेऊन गेले. पण जे पैसे वाटप करत होते, त्यांना अटक केली नाही. पण तुमचा दबाव, तुमच्या पैशाचे वाटप झुगारुन लोकांनी मतदान केले आहे, हे 4 जून नंतर त्यांना समजेल असे राऊत म्हणाले.
Web Title: Activists of the thackeray group were detained by the police the raut brothers were furious nrdm