Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोण होणार करोडपती’च्या विशेष भागात एचआयव्हीग्रस्त मुलांसाठी काम करणार्‍या संस्थेसाठी अभिनेता अशोक सराफ खेळ खेळणार

मनोरंजन सृष्टीतील अथांग सागरामध्ये अभिनयाचं स्वतंत्र बेट असणारे विनोदाचे बादशाह अशोक सराफ ज्ञान आणि मनोरंजनाच्या अद्भुत खेळात म्हणजे कोण होणार करोडपती'च्या मंचावर सहभागी होणार आहेत. अशोक सराफ यांनी वयाची पंच्याहत्तरी नुकतीच पूर्ण केली असली, तरी त्यांचा या वयातला उत्साह दांडगा आहे. अशोक सराफ यांच्याबरोबर त्यांचे धाकटे बंधू सुभाष सराफ आणि पत्नी निवेदिता सराफ यांच्या भगिनी डॉ. मिनल परांजपे हेही सहभागी होणार आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 23, 2022 | 05:06 PM
कोण होणार करोडपती’च्या विशेष भागात एचआयव्हीग्रस्त मुलांसाठी काम करणार्‍या संस्थेसाठी अभिनेता अशोक सराफ खेळ खेळणार
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : मनोरंजन सृष्टीतील अथांग सागरामध्ये अभिनयाचं स्वतंत्र बेट असणारे विनोदाचे बादशाह अशोक सराफ ज्ञान आणि मनोरंजनाच्या अद्भुत खेळात म्हणजे कोण होणार करोडपती’च्या मंचावर सहभागी होणार आहेत. अशोक सराफ यांनी वयाची पंच्याहत्तरी नुकतीच पूर्ण केली असली, तरी त्यांचा या वयातला उत्साह दांडगा आहे. अशोक सराफ यांच्याबरोबर त्यांचे धाकटे बंधू सुभाष सराफ आणि पत्नी निवेदिता सराफ यांच्या भगिनी डॉ. मिनल परांजपे हेही सहभागी होणार आहेत.

यशाचं शिखर गाठूनही पाय कायम जमिनीवर असणाऱ्या अशोक सराफ यांनी विनोदी भूमिकांबरोबरच गंभीर भूमिकासुद्धा चोख बजावल्या आहेत. आणि म्हणूनच काही मोजक्या चतुरस्र अभिनेत्यांमध्ये त्यांची गणना होते. सिनेसृष्टीतल्या त्यांच्या कारकिर्दीमधल्या वैविध्यपूर्ण भूमिका त्यांनी जबरदस्त अभिनयाच्या जोरावर रसिकांच्या मनावर कोरून ठेवल्या आहेत. अभिनयातल्या अशा तळपणाऱ्या सूर्याच्या येण्यानी कोण होणार करोडपती’चा मंच उजळून निघणार आहे.

[read_also content=”संजय राऊतांचे मविआ सरकारमधून बाहेर पडण्याचे संकेत, पृथ्वीराज चव्हाण म्हणाले… https://www.navarashtra.com/maharashtra/a-sign-of-sanjay-rauts-exit-from-the-mavia-government-prithviraj-chavan-said-nrdm-296126.html”]

पंढरपूरजवळील एचआयव्हीग्रस्त मुलांसाठी काम करणार्‍या आणि त्यांना आधार देणार्‍या प्रभा-हिरा प्रतिष्ठान संचलित ‘पालवी’ या सेवाभावी संस्थेसाठी अशोक सराफ कोण होणार करोडपती चा खेळ खेळणार आहेत. अशोक सराफ हे नाव घेतल्यानंतर अशी ही बनवाबनवी, धुमधडाका, नवरा माझा नवसाचा असे अनेक हीट चित्रपट आपल्या डोळ्यासमोर येतात. त्यांचा ‘ययाती’पासून सुरू झालेला नाट्यसृष्टीतला प्रवास आत्ताच्या ‘व्हॅक्युम क्लिनर’पर्यंत अव्याहतपणे सुरू आहे. अशोक सराफ यांना चित्रपटसृष्टीत पदार्पण करून ५० वर्षं पूर्ण झाली आहेत. ‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर सिनेनाट्यसृष्टीतल्या अनेक आठवणींना उजाळा देण्यात आला.

[read_also content=”संजय राऊतांच्या ‘परत या’ आवाहानानंतर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया, म्हणाले… https://www.navarashtra.com/maharashtra/eknath-shindes-reaction-after-sanjay-rauts-come-back-call-said-nrdm-296097.html”]

मनोरंजन सृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी अशोक सराफ हे बँकेत नोकरी करायचे आणि एकीकडे नाटकाचे दौरे करायचे. त्या वेळी खोटी मेडिकल सर्टिफिकेट देऊन बँकेत घेतलेल्या सुट्ट्यांचे मजेदार किस्से सराफ आणि त्यांचे बंधू यांनी यावेळी सांगितले. लहानपणी प्रसिद्ध क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांच्याबरोबर नाटकात काम केल्याच्या आणि त्यांच्याबरोबर क्रिकेट खेळल्याच्या आठवणीही त्यांनी सांगितल्या.

ययाती आणि देवयानी ह्या नाटकातून त्यांनी रंगमंचावर पदार्पण केलं, प्रेमा तुझा रंग कसा या नाटकातला पँटची नाडी सुटल्याचा गमतीशीर किस्सा,’भस्म’ चित्रपटातल्या भूमिकेसाठी घेतलेली मेहनत, संगीताची आवड; अशा अनेक आठवणी आणि किस्से यांमुळे ‘कोण होणार करोडपती’चा हा विशेष भाग अधिकच रंगतदार होणार आहे.

Web Title: Actor ashok saraf will play a game for an organization working for hiv positive children in a special episode of who will be a millionaire nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 23, 2022 | 05:06 PM

Topics:  

  • ashok saraf
  • NAVARASHTRA
  • Sachin khedekar

संबंधित बातम्या

भैरवीच्या आयुष्यात आव्हानांचा डोंगर, अशोक मामा मात्र भूमिकेवर ठाम! मालिकेला आता नवं वळण
1

भैरवीच्या आयुष्यात आव्हानांचा डोंगर, अशोक मामा मात्र भूमिकेवर ठाम! मालिकेला आता नवं वळण

अशोकमामा उघडू शकतील का रक्ताच्या नात्यांचे बंद दरवाजे? अशोक मा.मा. मालिकेत नवं वळणं
2

अशोकमामा उघडू शकतील का रक्ताच्या नात्यांचे बंद दरवाजे? अशोक मा.मा. मालिकेत नवं वळणं

Video : “एक नंबर मामा” ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या डफली वादनावर नेटकरी पडले प्रेमात
3

Video : “एक नंबर मामा” ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या डफली वादनावर नेटकरी पडले प्रेमात

महाराष्ट्र बदलत आहे…१७ ऑगस्ट शेवटची संधी, लवकरच सहभागी व्हा @ MH 1st Conclave 2025
4

महाराष्ट्र बदलत आहे…१७ ऑगस्ट शेवटची संधी, लवकरच सहभागी व्हा @ MH 1st Conclave 2025

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.