Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mira Bhayandar News: मंत्र्यांच्या प्रोटोकॉलचा भंग भोवला; अतिरिक्त आयुक्तांची उचलबांगडी, सचिन बांगर यांची नियुक्ती

Mira Bhayandar News: मंत्र्यांच्या प्रोटोकॉलचा कथित भंग आणि निमंत्रणपत्रिकेत नावाच्या क्रमावरून निर्माण झालेल्या वादानंतर राज्य शासनाने अतिरिक्त आयुक्तांवर कारवाई केली आहे. या प्रकरणातील चौकशी अहवालानंतर संबंधित अतिरिक्त आयुक्तांची उचलबांगडी करण्यात आली, त्यांच्या जागी सचिन बांगर यांची अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आले.

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 07, 2026 | 05:07 PM
मंत्र्यांच्या प्रोटोकॉलचा भंग भोवला; अतिरिक्त आयुक्तांची उचलबांगडी, सचिन बांगर यांची नियुक्ती

मंत्र्यांच्या प्रोटोकॉलचा भंग भोवला; अतिरिक्त आयुक्तांची उचलबांगडी, सचिन बांगर यांची नियुक्ती

Follow Us
Follow Us:
  • निमंत्रणपत्रिकेतील ‘नावाच्या क्रमाने’ पेटला वाद
  • चौकशी अहवालानंतर अतिरिक्त आयुक्तांवर कारवाई
  • अतिरिक्त आयुक्तांची बदली, सचिन बांगरांकडे जबाबदारी
विजय काते, मीरा-भाईंदर : शासकीय कार्यक्रमाच्या निमंत्रणपत्रिकेत कॅबिनेट मंत्र्यांचा राजशिष्टाचारानुसार उल्लेख न करणे मिरा-भाईंदर महापालिका प्रशासनाला चांगलेच महागात पडले आहे. प्रोटोकॉलच्या कथित उल्लंघनाची राज्य शासनाने गंभीर दखल घेत चौकशी केल्यानंतर महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त प्रियंका राजपूत यांची मिरा-भाईंदरमधून बदली करण्यात आली आहे. त्यांची वसई-विरार शहर महानगरपालिकेत उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली असून, त्यांच्या जागी सचिन बांगर यांची अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे महापालिका वर्तुळात या कारवाईची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात झाली ती १५ एप्रिल २०२६ रोजीच्या क्रीडा संकुलाच्या लोकार्पण सोहळ्यापासून. कार्यक्रमासाठी छापण्यात आलेल्या निमंत्रणपत्रिकेचा मसुदा राजशिष्टाचार अधिकाऱ्यांकडून तपासून आणि प्रमाणित करून घेणे आवश्यक होते. मात्र, ही प्रक्रिया पूर्ण न करताच निमंत्रणपत्रिका छापण्यात आल्याचे चौकशीत समोर आले.

Beed Drought Crisis : पावसाअभावी बीडमध्ये दुष्काळाची तीव्रता वाढली; शेती, चारा आणि पाणीटंचाईचे संकट

विशेष म्हणजे, या निमंत्रणपत्रिकेत महाराष्ट्राचे परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या नावाचा राजशिष्टाचार व ज्येष्ठता क्रमानुसार आवश्यक तो उल्लेख करण्यात आला नसल्याचा मुद्दा पुढे आला. त्यामुळे केवळ एका निमंत्रणपत्रिकेतील मजकुराचा विषय न राहता हा थेट शासकीय प्रोटोकॉलच्या पालनाचा प्रश्न बनला.

एकाच प्रकरणानंतर दुसऱ्या निमंत्रणपत्रिकेवरही बोट

याचदरम्यान ५ मे २०२६ रोजी महापालिकेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कामगार दिन सत्कार समारंभाच्या निमंत्रणपत्रिकेचाही मुद्दा चौकशीच्या कक्षेत आला. या निमंत्रणपत्रिकेचा मसुदा अधिकृत मंजुरी आणि आवश्यक राजशिष्टाचार प्रक्रिया पूर्ण न करता अंतिम केल्याचे चौकशीत नमूद करण्यात आले.

दोन्ही घटनांची चौकशी करण्यासाठी पाच सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली. समितीने २० जुलै २०२६ रोजी बैठक घेतल्यानंतर अंतिम अहवाल सादर केला. संबंधित विभाग आणि अधिकाऱ्यांकडून सामान्य प्रशासन विभागाचे २० नोव्हेंबर २०२५चे परिपत्रक तसेच महापालिका आयुक्तांचे ११ मार्च २०२६चे आदेश यांचे पालन झाले नसल्याचे अहवालात नमूद करण्यात आले.

चौकशीचा अहवाल आला आणि प्रशासकीय फेरबदल

चौकशी अहवालानंतर राजशिष्टाचार विभाग आणि नगरविकास विभागाने या प्रकरणाची दखल घेतली. त्यानंतर शासनस्तरावरून कारवाई करण्यात आली. प्रियंका राजपूत यांची मिरा-भाईंदर महापालिकेतून बदली करून त्यांची वसई-विरार महापालिकेत उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या जागी सचिन बांगर यांची अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली.

दरम्यान, क्रीडा संकुलाच्या उद्घाटनाच्या निमंत्रणपत्रिकेचा मजकूर आवश्यक प्रमाणनाशिवाय अंतिम केल्याप्रकरणी शहर अभियंता दीपक खांबित यांच्यावरही शिस्तभंगाची बाब नमूद करण्यात आली आहे. त्यामुळे आता त्यांच्यावर कोणती कारवाई होते, याकडे महापालिका वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

‘प्रोटोकॉल म्हणजे व्यक्तीचा नव्हे, पदाचा सन्मान’

या कारवाईवर प्रतिक्रिया देताना मंत्री प्रताप सरनाईक यांनी प्रशासनातील अधिकाऱ्यांनी शासकीय नियम आणि राजशिष्टाचाराचे काटेकोर पालन करणे आवश्यक असल्याचे सांगितले. शासकीय कार्यक्रमांमध्ये राजशिष्टाचार पाळणे हा केवळ मंत्र्याचा किंवा एखाद्या व्यक्तीचा सन्मान नसून लोकप्रतिनिधींच्या संविधानात्मक पदाचा सन्मान असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

प्रशासकीय कामकाजात नियमबाह्य पद्धतीला स्थान नसावे आणि प्रोटोकॉलचे उल्लंघन भविष्यात होऊ नये, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. एका निमंत्रणपत्रिकेतील नावाच्या क्रमापासून सुरू झालेला हा वाद अखेर अतिरिक्त आयुक्तांच्या बदलीपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे महापालिकेतील आगामी शासकीय कार्यक्रमांमध्ये राजशिष्टाचाराच्या नियमांची अंमलबजावणी आता किती काटेकोरपणे होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Chemical Ripened Bananas: तुर्भे APMC मध्ये 1,394 किलो रासायनिक पिकवलेली केळी जप्त; ‘इथेफॉन’चा वापर, केमिकलयुक्त केळी कशी ओळखाल

Web Title: Additional commissioner removed over minister protocol violation sachin bangar appointed after invitation card row sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 07, 2026 | 05:07 PM

Topics:  

  • Government
  • maharashtra
  • mira bhayandar

संबंधित बातम्या

Bhandara:शाळेच्या मैदानावर आढळल्या भानामतीच्या आकृत्या! पांढऱ्या रेषा, पूजासाहित्य, खिळे, लिंबू यांची सांगड; चर्चेला मोठे उधान
1

Bhandara:शाळेच्या मैदानावर आढळल्या भानामतीच्या आकृत्या! पांढऱ्या रेषा, पूजासाहित्य, खिळे, लिंबू यांची सांगड; चर्चेला मोठे उधान

Organ Donation : मृत्यूनंतरही इतरांना जीवनदान! ठाण्यात ४३ वर्षीय ब्रेन-स्टेम डेड व्यक्तीचे यकृत आणि दोन्ही मूत्रपिंड दान
2

Organ Donation : मृत्यूनंतरही इतरांना जीवनदान! ठाण्यात ४३ वर्षीय ब्रेन-स्टेम डेड व्यक्तीचे यकृत आणि दोन्ही मूत्रपिंड दान

108 Ambulance Service: ठाण्यात १०८ ॲम्ब्युलन्स ठरली जीवनदायिनी! रस्त्यातच गर्भवतीची सुरक्षित प्रसूती; वैद्यकीय पथकाचे कौतुक
3

108 Ambulance Service: ठाण्यात १०८ ॲम्ब्युलन्स ठरली जीवनदायिनी! रस्त्यातच गर्भवतीची सुरक्षित प्रसूती; वैद्यकीय पथकाचे कौतुक

Satara News: विकासाच्या नावाखाली वाईच्या ऐतिहासिक घाटांची तोडफोड; कृष्णाकाठचा शेकडो वर्षांचा वारसा धोक्यात!
4

Satara News: विकासाच्या नावाखाली वाईच्या ऐतिहासिक घाटांची तोडफोड; कृष्णाकाठचा शेकडो वर्षांचा वारसा धोक्यात!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.