फोटो सौजन्य सोशल मिडिया
Chemical Ripened Bananas: नवी मुंबईतील तुर्भे एपीएमसी बाजारात अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केली. या मध्ये तब्बल 1, 394 किलो केळी जप्त करण्यात आली आहेत. केळी पिकवण्यासाठी रासायनिक औषधाचा वापर करून केळी पिकवली जात होती. या बद्दल गुप्त माहिती मिळताच अन्न व औषध प्रशासनाने (FDA) ने एका व्यापाऱ्यांच्या दुकानावर धाड टाकली. या मध्ये ‘ इथेफाॅन ‘ नावाचा रासायनिक घटक वापरण्यात येत होता.
‘इथेफाॅन ‘ चा वापर रासायनिक द्रवात केला जात होता. याची माहिती मिळताच अन्न व औषध प्रशासनाने (FDA) कारवाई केली आहे.अन्न व औषध प्रशासनाने सुमारे 67, 814 किंमतीचा माल जप्त केला आहे. तर सदर घटनेची पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
जास्त नफा मिळावा यासाठी रासायनिक पर्दांथाचा वापर सरास केला जातो. केळी लवकरात लवकर पिकावी यासाठी कॅल्शियम कार्बाइडसारख्या धोकादायक केमिकलचा वापर केला जातो. अशा केमिकलयुक्त केळी खल्यामुळे आपल्या आरोग्यावर आणि शरिरावर विपरीत परिणाम होऊ शकतो. यामुळे पोटदुखी, अपचन सारखे त्रास होऊ शकतात. बाजारात केळी खरेदी करताना नैसर्गिकरीत्या पिकलेली केळी कशी ओळखावी, यासाठी काही सोप्या पध्दती समजूण घेऊयात.
नैसर्गिकरित्या पिकवलेल्या केळीचा रंग हा फिकट आणि थोडाफार काळा असतो. त्यावर तपकिरी रंगाचे डाग असतात.केमिकलयुक्त केळी गडद पिवळी आणि चकचकीत वाटतात. यावर कोणतेही डाग दिसत नाही. ती सर्व बाजूंनी एकसारखी पिवळी दिसतात. जर केळीचा संपूर्ण भाग पिवळा असेल पण तिचे देठ हिरव्या रंगाचे असते.
नैसर्गिकरीत्या पिकलेल्या केळीचे देठही पिवळसर किंवा काळे पडलेले असते. केमिकलने पिकवलेली केळी वरून पिवळी आणि मऊ दिसत असली, तरी आतून ती कच्ची किवा टणक राहतात. अशी केळी खाताना ती थोडी कडवट किंवा अळणी लागतात, याउलट नैसर्गिक केळी आतून आणि बाहेरून समान मऊ व गौड असतात.
Accident News: मुंबई-गोवा महामार्गावर इर्टिगा कारचा भीषण अपघात; एक ठार, दोन गंभीर जखमी!






