
Bangladeshi migrant woman takes advantage of Ladki Bhain scheme
Ladki Bahin Yojana News Marathi: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीदरम्यान एक योजना चर्चेत आली ती म्हणजे लाडकी बहीण योजना. ही योजना बंद होईल, निवडणुकीपुरती आहे अशा अनेक टीका विरोधकांनी केल्या होत्या. मात्र ही योजना चालूच राहिली. तसेच या योजनेचा फायदाही सत्ताधाऱ्यांना झाला. याचदरम्यान आता महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी किती अपात्र महिलांचे अर्ज आले? पैसे परत घेतले जाणार का? याबाबत आज (22 जानेवारी 2025) महत्त्वाची माहिती दिली.
सरकारची कुठलीही योजना असू द्या, विशिष्ट कालावधीनंतर किंवा सालाबादप्रमाणे त्या योजनेची स्क्रुटिनी होत असतेच. संजय गांधी निराधार योजनेतही पात्रता आणि अपात्रतेची दरवर्षी तपासली जाते. सिलिंडर अनुदान योजना खरी आहे. प्रक्रियेनुसार लाडकी बहिन योजनेची पात्रता-अपात्रता तपासणे ही एक नियमित प्रक्रिया आहे. इथे काही नवीन नाही. योजना नवी असल्याने आणि पहिलंच वर्ष असल्याने त्याबाबत संभ्रम निर्माण केला जातो आहे असं महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी म्हटलं आहे.
“माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एकही लाभार्थ्यांचे पैसे परत घेण्यात आलेले नाहीत. ज्या महिला अपात्र आहेत त्या स्वेच्छेने योजनांचा लाभ सोडतायत. अशा साडेचार हजार महिला असतील. प्रत्येक योजनांची वर्षभरात स्क्रुटिनी होते. माझी लाडकी बहीण त्याला अपवाद नाही. योजनांमधल्या त्रुटी शोधण्यासाठी काही कालावधी द्यावा लागतो. त्यामानानं आमची योजना नवीन आहे त्यामुळे अशा त्रुटी समोर येतील तशी दुरूस्ती होत राहील, अशी प्रतिक्रिया आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेबाबत बोलताना दिलीय.
आदिती तटकरे म्हणाल्या, “सर्वसाधारणपणे साडेतीन ते चार हजार अर्ज आले आहेत, ज्या लाडक्या बहिणींनी स्वतःहून हे सांगितलं आहे की आम्हाला या योजनेचा लाभ नको. जे अर्ज आले आहेत ते आम्ही मागवलेले नाहीत. दोन किंवा चार महिन्यांसाठी ज्यांनी लाभ घेतला आहे आणि आहोत त्या महिलांनी अर्ज केले आहेत. शासन म्हणून आम्ही एकाही लाभार्थी महिलांच्या लाभाला हात लावलेला नाही. तसंच त्यांच्याकडे संपर्क करुन आम्ही माहिती मागवलेली नाही. सुमारे साडेचार महिला आत्तापर्यंत अशा आहेत ज्यांनी लाडकी बहिण योजनेचा लाभ पात्र नसताना घेतला आहे. तसंच त्यांच्याकडून काहीही रिफंड वगैरे घेतलेले नाहीत. आमच्याकडे अर्ज दिलेले आहेत. त्याची कारणं जोडलेली आहेत, असं आदिती तटकरे म्हणाल्या आहेत.