संग्रहित फोटो
पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील तापमानात (Increase in Temperature) मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे अनेक नागरिक दुपारच्या वेळेत बाहेर पडताना कमी प्रमाणात दिसत आहेत. त्यात सकाळपासून कडाक्याच्या उन्हानंतर पुण्यात मुसळधार पावसाने (Rain in Pune) हजेरी लावली. या अचानक आलेल्या पावसामुळे पुणेकरांची चांगलीच तारांबळ उडाली.
पुणे शहर आणि परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली. यात पुणे शहरातील डेक्कन, शिवाजीनगरसह सिंहगड रस्त्यावर मुसळधार पाऊस सुरू आहे. तसेच कोथरूड परिसरात गारांसह जोरदार पाऊस सुरू आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यात गारांसह मुसळधार पाऊस झाला होता. त्यानंतरच्या दिवसात सायंकाळी ढगाळ हवामान राहत होते. पण आता पुण्यातील काही भागांत मुसळधार पाऊस पडला आहे.
दौंड तालुक्यात मुसळधार पाऊस
दौंड शहरासह तालुक्याच्या पूर्व व इतर भागात विजांच्या कडकडासह अवकाळी पाऊस झाला होता. त्यावेळी दौंड शहरातील स्वामी समर्थ नगर भागात वीज कोसळल्याने बैलगाडी व ट्रॅक्टर जळून खाक झाल्याची घटना घडली होती. दौंड शहर, तालुक्यातील पाटस, कुरकुंभ मळद यासह दौंडच्या पूर्व भागात विजांच्या कडकडासह अवकाळी पावसाने सुरुवात केली होती. त्यानंतर आता पुणे शहर आणि परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे.