(फोटो- टीम नवराष्ट्र / @mumbairailusers)
दलापूर येथील नामांकित शाळेत चार वर्षांच्या दोन मुलींवर अत्याचाराची घटना घडली आहे. दरम्यान या घटनेच्या विरोधात आज सकाळपासून नागरिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. सकाळी शहा ते साडेसहा वाजल्यापासून आंदोलकांनी बदलापूर रेल्वे स्थानकांवर ठिय्या दिला होता. अखेर तब्बल ११ ते १२ तासांनी बदलापूर रेल्वे स्थानकातून रेल्वे धावली आहे. रेल्वे सुरू झाल्याने प्रवाशानी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
आज सकाळपासून आंदोलकांनी बदलापूर रेल्वे स्थानकात या दुर्दैवी घटनेविरुद्ध आंदोलन सुरू केले होते. पोलिसांनी त्या आरोपीला अटक केली आहे. दरम्यान त्या आरोपीला आजच्या फाशी देण्याची मागणी आंदोलकांनी केली. आंदोलन मागे घेण्यासाठी पोलिसांनी अनेकदा आंदोलकांना आवाहन केले. त्यानंतर सरकारचे प्रतिनिधी म्हणून मंत्री गिरीश महाजन हे आंदोलनस्थळी पोहोचली. मात्र गिरीश महाजन देखील आंदोलक ऐकत नसल्याने तिथून निघून गेले.
तब्बल ११ तास बदलापूर येथे सुरू असलेल्या आंदोलनामुळे रेल्वेसेवा खंडित झाली होती. ३० पेक्षा अधिक लोकल रद्द करण्यात आल्या. अनेक एक्क्सप्रेस गाड्या दुसऱ्या मार्गाने वळविण्यात आल्या. सरकारने आंदोलकांच्या मागण्या मान्य केल्या. त्यांनतर देखील आंदोलक मागे हटायला तयार नसल्याने पोलिसांनी संध्याकाळी ६ वाजता सौम्य लाठीचार्ज करत तेथील आंदोलकांना ट्रॅकवरून दूर केले. अनेकांची धरपकड अजूनही सुरू आहे. आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीत अनेक पोलीस जखमी झाले आहेत.
दरम्यान अखेर ११ तासांनी बदलापूर स्थानकातून रेल्वे धावली आहे. संध्याकाळी साडे सात वाजता रेल्वे ट्रॅकवर रेल्वे इंजिन चालवून टेस्टिंग करण्यात आले. त्यानंतर साधारण काही वेळाने सीएसएमटीकडे जाणारी जलद लोकल या मार्गावरून धावली. थोड्याच वेळात बदलापूर स्थानकातून लोकल सेवा सुरळीतपणे सुरू झाली आहे. लोकल सुरू झाल्याने प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.