Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘झालं इलेक्शन’ आता ‘जपा रिलेशन’; सोशल मीडियामध्ये ट्रोलरची जनतेला भावनिक साद

विधानसभा निवडणुकीच्या काळात गावागावातील व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपसह सोशल मीडियाच्या माध्यमामधून सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आपापल्या नेत्यांची बाजू मांडत जवळपास पंधरा दिवस जोरदार प्रचार केला.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 22, 2024 | 01:53 PM
'झालं इलेक्शन' आता 'जपा रिलेशन'; सोशल मीडियामध्ये ट्रोलरची जनतेला भावनिक साद

'झालं इलेक्शन' आता 'जपा रिलेशन'; सोशल मीडियामध्ये ट्रोलरची जनतेला भावनिक साद

Follow Us
Close
Follow Us:

मेढा/ दत्तात्रय पवार : पक्ष फोडाफोडी नंतर प्रथमच ही निवडणूक होत असल्याने या विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी विरोधकांमध्ये प्रचाराचे अनेक मुद्दे गाजलेले पाहायला मिळाले या मुद्द्यांनी ग्रामीण भाग अगदी दुमदुमून निघाला अशात विधानसभा निवडणुकीच्या काळात गावागावातील व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपसह  सोशल मीडियाच्या माध्यमामधून सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आपापल्या नेत्यांची बाजू मांडत जवळपास पंधरा दिवस जोरदार प्रचार केला. गावातील विविध मुद्दे घेऊन एकमेकांवर शाब्दिक वॉर केले. इतकेच नव्हे तर हा वाद काही ठिकाणी कधीकधी शिवीगाळीपर्यंत विकोपाला देखील गेला गेला. मात्र, निवडणूक प्रक्रिया पार पडताच ‘झाले इलेक्शन, आता जपा रिलेशन..!’ असे प्रेमाचे संदेश ग्रुपवर फिरू लागल्याने एकमेकांमध्ये पुन्हा एकदा प्रेमाचा गोडवा निर्माण होऊ लागला आहे.

निवडणुका जाहीर झाल्यापासून सातारा जिल्ह्यात सर्वपक्षीय समर्थकांना मोठा जोर चढला होता. आपल्या नेत्याचे कौतुक करण्यापासून विरोधी नेत्याचे जमेल तसे वाभाडे काढण्यापर्यंत सगळे प्रकार निवडणूक प्रचार काळात झाले. असे प्रकार ग्रामीण भागात जास्त पाहायला मिळाले. जणू कार्यकर्त्यांनी ही निवडणूक आपल्या हातात घेतली होती. अनेकांनी येथील स्थानिक प्रश्नांवर बोट ठेवून नेत्यांच्या कार्यकर्त्यांना जाब विचारला. अनेकांनी सिंचनाचा प्रश्न महागाई, आरक्षणाचा प्रश्न लाडकी बहीणवरून कांद्याचे बाजारभाव असे अनेक प्रश्न उपस्थित केले. तर अनेकांनी दहशत, गुंडगिरी, महिलांची सुरक्षितता खुंटलेला विकास, पक्ष फोडाफोडीचे राजकारण खुनशी राजकारण आदींवर चर्चा केली.

एकाच गावात राहून राजकारण करणारे कार्यकर्ते गावच्या पारावर बसून अगदी राज्याचा कारभार सोशल मीडियावरून हाकत होते. गल्लीपासून दिल्लीपर्यंतची चर्चा गावातल्या ग्रुपवर करून राज्य समृद्ध कसा होईल? काय नियोजन केले पाहिजे? कुणाला निवडून द्यावं? हे पटवून सांगत होते. अनेक ग्रुपचे सदस्य रात्री उशिरापर्यंत सक्रिय राहून पोस्टद्वारे मत मांडत होते.

हे सुद्धा वाचा : Maharashtra Election Result 2024 : विधानसभेची उद्या मतमोजणी, यंत्रणा सज्ज; हजारो कर्मचारी तैनात

निवडणुकीच्या निकालाच्या अंदाजापर्यंत ग्रुपवर चर्चा होत असताना अनेकांनी तर चक्क झालेल्या मतांची आकडेवारीसह आपला नेता किती मतांनी विजयी होणार? याचीही आकडेवारी जाहीर करून निकाल देऊन टाकला. अनेक स्थानिक नेतेमंडळी अजूनही आपापल्या नेत्याच्या विजयाची गणिते मांडताना दिसून आले मात्र, कुणाला तरी यश-अपयश पचवावे लागणार आहे. प्रचाराच्या काळात दिसलेला टीकेचा सूर, शाब्दिक वॉर आणि कडवटपणा मागे ठेवा. निवडणुका संपल्या आहेत. आता जवळच्यांशी, मित्रांशी असलेले संबंध जपा, हे सांगणारा ‘झाले इलेक्शन, आता जपा रिलेशन! हा मेसेज सर्वांना प्रेमसंबंध जपून भानावर आणणारा ठरत आहे.

Web Title: After voting for the assembly social media posts are going viral to preserve the relationship nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 22, 2024 | 01:53 PM

Topics:  

  • BJP
  • Congress
  • Election Result
  • maharashtra
  • Maharashtra Election
  • Nationalist Congress Party
  • shivsena

संबंधित बातम्या

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू
1

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय
2

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले
3

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?
4

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.