संग्रहित फोटो
कोल्हापूर/दिपक घाटगे : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान झाले असून या निवडणुकीची मतमोजणी उद्या शनिवार दिनांक २३ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजल्यापासून सुरु होणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील दहा मतदारसंघातील मतमोजणी प्रक्रिया सुरळीत व पारदर्शक पद्धतीने होण्याच्या दृष्टीने यंत्रणा सज्ज झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
10 मतदारसंघातील मतमोजणी खालील ठिकाणी होणार
२७२ चंदगड- पॅव्हेलियन हॉल गांधीनगर, नगरपरिषद, गडहिंग्लज, २७२ राधानगरी- तालुका क्रीडा संकुल, जवाहर बाल भवन, गारगोटी, २७३ कागल-जवाहर नवोदय विद्यालय, सांगाव रोड, कागल, २७४ कोल्हापूर दक्षिण- व्ही.टी. पाटील सभागृह, ताराराणी विद्यापीठ, राजारामपुरी, कोल्हापूर. २७५ करवीर –शासकीय धान्य गोदाम क्र. डी, रमणमळा कसबा बावडा, कोल्हापूर, २७६ कोल्हापूर उत्तर- शासकीय धान्य गोदाम क्र. अ, रमणमळा कसबा बावडा, कोल्हापूर
२७७ शाहूवाडी-जुने शासकीय धान्य गोदाम-पश्चिमेकडील बाजू भाग-ब, तहसिल कार्यालयाशेजारी, शाहूवाडी, २७८ हातकणंगले -शासकीय धान्य गोदाम- नंबर २, हातकणंगले. २७९ इचलकरंजी- राजीव गांधी सांस्कृतिक भवन, कापड मार्केटसमोर, इचलकरंजी, २८० शिरोळ- मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमधील आवारामध्ये (तळ मजला)
मतमोजणीसाठी १ हजार १७४ अधिकारी, कर्मचाऱ्यांची सरमिसळ करण्यात आली आहे. निरीक्षक मीर तारिक अली, राम कुमार पोद्दार, गगन, उपजिल्हा निवडणूक अधिकारी समाधान शेंडगे, मनुष्यबळ नोडल अधिकारी राहुल रोकडे, निवडणूक निर्णय अधिकारी, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी गौरव कवाडे आणि मतमोजणी निरीक्षक व्ही सी द्वारे सुचना दिल्या.
तर गौरव कवाडे यांनी सरमिसळबाबत सादरीकरण केले. मतमोजणी नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांचे द्वितीय प्रशिक्षण त्यांच्या नियुक्त मतदारसंघामध्ये घेण्यात आले. सुमारे १ हजार १७४ मतमोजणी अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. ईव्हीएम मतमोजणीसाठी १७६ मोजणी पर्यवेक्षक, १८६ मोजणी सहाय्यक, १९६ सूक्ष्म निरीक्षक आणि पोस्टल मतपत्रिका मतमोजणीसाठी १५४ मोजणी पर्यवेक्षक, ३०८ मोजणी सहाय्यक, १५४ सूक्ष्म निरीक्षक अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत.
हे सुद्धा वाचा : एकतर्फी नाहीच… चुरशीचीच! सर्वे करणाऱ्या संस्थांचा ʻचिंचवडʼबाबत धक्कादायक अंदाज
23 नोव्हेंबरलाच निवडणुकीचा निकाल
विधानसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाने 95 जागांवर निवडणूक लढवली होती. तर शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला 81 जागा आल्या होत्या. एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडीमध्ये 9 जागा अधिक मिळाल्या होत्या. मात्र तरीदेखील उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा एकनाथ शिंदे सरस ठरताना दिसत आहे. शिवसेना शिंदे गटाला बहुतेक एक्झिट पोलमध्ये जास्त जागा मिळत असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हा केवळ एक्झिट पोलचा अंदाज असून, 23 नोव्हेंबरलाच निवडणुकीचा निकाल स्पष्ट होणार आहे.