Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘नवराष्ट्र’च्या बातमीची ठिणगी अन शासनाला जाग! अहिल्यानगरमध्ये अखेर दुष्काळ जाहीर; आता ‘सरसकट कर्जमाफी’साठी स्वाभिमानी आक्रमक

अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व १४ तालुक्यांत दुष्काळ जाहीर झाल्यानंतर शेतकरी प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सरसकट कर्जमाफी, जनावरांसाठी चारा-पाणी आणि टँकरची मागणी करत आंदोलनाचा इशारा दिला आहे.

  • By विवेक
Updated On: Sep 26, 2026 | 09:13 PM
Ahilyanagar Drought

Ahilyanagar Drought

Follow Us
Follow Us:
  • अहिल्यानगरच्या सर्व १४ तालुक्यांत दुष्काळ जाहीर
  • सरसकट कर्जमाफीसह चारा आणि पाण्याची स्वाभिमानीची मागणी
  • मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा
 

पोपट पिटेकर, अहिल्यानगर : बळीराजाच्या डोळ्यांतील अश्रू आणि वाळणाऱ्या पिकांचा टाहो जेव्हा ‘नवराष्ट्र‘ने संपूर्ण महाराष्ट्रासमोर मांडला, तेव्हा शासनाला शेवटी जाग यावीच लागली. अहिल्यानगर जिल्ह्यातील भीषण आणि विदारक परिस्थितीवर ‘नवराष्ट्र’ने सातत्याने प्रकाश टाकला. आमदार, खासदार आणि पालकमंत्र्यांना जनतेच्या वतीने थेट जाब विचारला. या धडाकेबाज बातमीचाच हा दणकेबाज इम्पॅक्ट आहे की, राज्य शासनाला अखेर अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वच्या सर्व तालुक्यांत दुष्काळ जाहीर करावा लागला आहे.

परंतु, दुष्काळ जाहीर करून प्रश्न मिटत नाही, तर तो तिथून सुरू होतो. त्यामुळेच आता बळीराजाला वाचवण्यासाठी ‘स्वाभिमानी शेतकरी संघटना’ मैदानात उतरली असून, “सरसकट कर्जमाफी द्या, नाहीतर लोकप्रतिनिधींना रस्त्यावर फिरू देणार नाही!” असा थेट इशारा देत आक्रमक पवित्रा घेतला आहे.

1972च्या दुष्काळापेक्षाही भीषण वास्तव!

आज अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव, नगर, श्रीगोंदा, नेवासा, पारनेर, पाथर्डी, कर्जत, जामखेड, संगमनेर, राहुरी, अकोले, कोपरगाव, श्रीरामपूर आणि राहाता या सर्व १४ तालुक्यांची अवस्था दयनीय झाली आहे. जुने-जाणते नागरिक सांगतात की, यंदाची परिस्थिती १९७२ च्या ऐतिहासिक दुष्काळापेक्षाही भयंकर आहे. ७२ च्या दुष्काळात किमान पिण्यासाठी तरी पाणी उपलब्ध होते; परंतु आज नदी, नाले, विहिरी आणि तलाव पार कोरडेठाक पडले आहेत. मातीची तहान तर दूरच, पण माणसाच्या घशाची कोरड आणि मुक्या जनावरांच्या पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. हंबरणाऱ्या जनावरांना चारा आणि पाणी कुठून आणायचे, या चिंतेत शेतकरी कोलमडून पडला आहे.

Maharashtra Drought : ’99 टक्के भागात दुष्काळाची स्थिती’; नाना पटोलेंचा सरकारवर जोरदार हल्लाबोल

पोळाही गेला सुतकात; पेरणीचा खर्च मातीत!

यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांनी हजारो रुपये पदरमोड करून, उसनवारी करून आणि कर्ज काढून बी-बियाणे व खते खरेदी केली. पीक येईल आणि संसाराचा गाडा हाकलेल, या आशेवर पेरणी केली. पण पावसाने दगा दिला आणि हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. या भीषण परिस्थितीचे विदारक दृश्य यंदाच्या ‘बैलपोळा’ सणाला पाहायला मिळाले. जो बळीराजा नेहमी मोठ्या उत्साहात आणि वाजत-गाजत पोळा साजरा करायचा, त्याने यंदा अतिशय साध्या आणि सुतकी वातावरणात हा सण पार पाडला. ज्या बैलाच्या जीवावर शेती पिकवायची, तोच बैल चाऱ्या- पाण्याविना तडफडताना पाहून बळीराजाचे काळीज हेलावून गेले आहे.

“कर्ज कसे फेडायचे? मुलांचे शिक्षण कसे करायचे?”

शेतात पिकाचा एक अंकुरही उरलेला नाही. अशा स्थितीत बँकांचे आणि सावकारांचे घेतलेले कर्ज कसे फेडायचे? मुलांची शाळा-कॉलेजची फी कशी भरायची? आणि रोजचे पोट कसे भरायचे? हे यक्षप्रश्न आज प्रत्येक शेतकऱ्याच्या समोर ठाकले आहेत. शासनाने जर तातडीने सरसकट कर्जमाफी दिली नाही, तर आमच्यासमोर आत्महत्येशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरणार नाही,” असा अत्यंत विषण्ण आणि थरकाप उडवणारा इशारा हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी दिला आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा थेट ‘रस्ता रोको’ इशारा-

दुष्काळ जाहीर झाल्याने कागदी घोडे नाचवणे थांबवून प्रत्यक्ष मदत सुरू करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. शेतकरी हक्कासाठी सदैव रस्त्यावर उतरणारी ‘स्वाभिमानी शेतकरी संघटना’ आता अधिकच आक्रमक झाली आहे.

स्वाभिमानीने शासनासमोर स्पष्ट मागण्या ठेवल्या आहेत:

शेतकऱ्यांना तातडीने ‘सरसकट कर्जमाफी’ देण्यात यावी.

जनावरांसाठी छावण्या आणि मोफत चारा-पाण्याची व्यवस्था करावी.

पिण्याच्या पाण्यासाठी सर्व बाधित गावांत विलंब न करता टँकर सुरू करावेत.

“जर सरकारने त्वरित ठोस पावले उचलली नाहीत, तर जिल्ह्यातील आमदार आणि खासदारांना रस्त्यावर फिरू दिले जाणार नाही. राज्यभर तीव्र आंदोलन उभे केले जाईल,” असा सज्जड दम स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे.

Maharashtra Drought : शब्द गोल गोल फिरवू नका… दुष्काळावरून रोहिणी खडसेंचा सीएमवर हल्लाबोल

Web Title: Ahilyanagar drought declared farmer loan waiver swabhimani shetkari sanghatana

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 26, 2026 | 08:50 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • drought news
  • Maharashtra Drought 2026
  • Navarashtra Impact

संबंधित बातम्या

Maharashtra Drought : दुष्काळग्रस्त रत्नागिरीसाठी उदय सामंतांचा मास्टर प्लॅन; चारा-पाणी ते कर्ज पुनर्गठन
1

Maharashtra Drought : दुष्काळग्रस्त रत्नागिरीसाठी उदय सामंतांचा मास्टर प्लॅन; चारा-पाणी ते कर्ज पुनर्गठन

Maharashtra Drought : ’99 टक्के भागात दुष्काळाची स्थिती’; नाना पटोलेंचा सरकारवर जोरदार हल्लाबोल
2

Maharashtra Drought : ’99 टक्के भागात दुष्काळाची स्थिती’; नाना पटोलेंचा सरकारवर जोरदार हल्लाबोल

Supriya Sule : ‘मंत्र्यांच्या गाड्या अडवा, जेलमध्ये जायची माझी तयारी’ पंढरपुरात दुष्काळाच्या मुद्द्यावर सुप्रिया सुळे आक्रमक
3

Supriya Sule : ‘मंत्र्यांच्या गाड्या अडवा, जेलमध्ये जायची माझी तयारी’ पंढरपुरात दुष्काळाच्या मुद्द्यावर सुप्रिया सुळे आक्रमक

Maharashtra Drought : ‘दुष्काळ जाहीर केला, आता भरीव मदतीचा मुहूर्त कधी?’ हर्षवर्धन सपकाळांची सरकारकडे मोठी मागणी
4

Maharashtra Drought : ‘दुष्काळ जाहीर केला, आता भरीव मदतीचा मुहूर्त कधी?’ हर्षवर्धन सपकाळांची सरकारकडे मोठी मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.