Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar News: लाडक्या बहिणींची झाली 5 लाखांची फसवणूक, ‘या’ गोष्टीचे आमिष दाखवत बचतगटातील 439 भगिनींना फसवले

तुम्हाला शिलाई मशीन मिळवून देतो असे खोटे आश्वासन देत प्रशांत अडसूळ नावाच्या व्यक्तीने तब्बल 439 लाडक्या भागणीनींची फसवणूक केली आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Apr 22, 2026 | 10:02 PM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us
Follow Us:

मिरजगाव कर्जत तालुक्यातील कोरेगाव येथील व्यक्तीने तालुक्यातील गरजू व गरीब महिलांच्या भोळ्या भाबड्या लाडक्या बहींणीना स्वयंरोजगाराचे आमिष दाखवून जास्तीचे चार पैसे मिळतील व त्यांच्या प्रपंचाला कशाप्रकारे मदत होईल, असे सांगत बचतगटातील ४३९ लाडक्या बहिणींची ४ लाख ८२ हजार ९०० रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

महिलांना गृह उद्योग निर्माण व्हावा यासाठी शासनाकडून अनेक चांगल्या योजना राबवल्या जात आहेत यातून महिला सक्षम होईल या उद्देशाने शासन स्तरावर गरजू व होतकरू महिलांना शिलाई मशीन पंचायत समिती कडून दिल्या जातात याचाच फायदा घेत येथील व्यक्तीने तुम्हाला शिलाई मशीन मिळवून देतो नावाखाली, प्रत्येक महिलेकडून ११०० रुपये जमा केले. मात्र, त्यानंतर राज कालावधी होऊन गेला तरी मशीन एकाही महिलेला दिली गेली नाही.

साताऱ्यात रंगणार १५ वे विद्रोही साहित्य संमेलन; जेएनयूच्या प्रो. डॉ. सोनाझरिया मिंझ यांच्या हस्ते होणार उद्घाटन

आपली फसवणूक झाल्याचे या लाभार्थी महिलांच्या निदर्शनास आल्याने या महिलांनी थेट कर्जत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार कर्जत पंचायत समितीच्या महिला बचत गट समुदाय व्यक्ती (सीआरपी) सरोज सुभाष सुतार यांनी कर्जत पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दिली.

११०० रुपयांत शिलाई मशीन देण्याचे आमिष सदर फसवेगिरी करणाऱ्या प्रवृत्तीच्या व्यक्तीने दाखवले. यामध्ये महिलांना फसवले असल्याची तक्रार दिली. महिलांचा विश्वास संपादन केला. त्या नुसार महिलांनी रक्कम जमा केली. प्रशांत अडसूळ यांच्याकडे जमा केली यावेळी अडसूळ यांनी या महिलांना त्यासाठी बुकिंग करण्यासाठी रक्कम अगोदर भरावी लागेल, असे सांगून लाखो रुपये जमा करून घेतले. अनेक महिने उलटूनही एकाही महिलेला शिलाई मशीन मिळाली नाही. यामध्ये आपण पुरते फसलो असल्याचे महिलांच्या लक्षात आलेत्यावेळी त्यांनी संबंधित व्यक्तीला भरलेले पैसे परत मागितल्यावर त्याच्याकडून उडवा उडवी चे उत्तरे येऊ लागली त्यानंतर टाळाटाळ करण्यात आली.

फसलेल्या महिलांचे पैसे मिळवून द्या

संबंधित पोलीस अधिकारी यांनी यावर कारवाई करून या फसलेल्या महिलांचे पैसे परत मिळवून देण्यासाठी मदत करावी अशी मागणी या फसगत झालेल्या महिलांनी केली आहे.

Ladki Bahin Yojna: ‘लाडकी बहीण’ योजनेच्या दुरुस्तीसाठी ‘या’ दिवशी शेवटची संधी; ८५ हजार महिलांच्या अर्जात होत्या त्रुटी

महिलांना ११०० रुपयांत शिलाई मशीन

सरोज सुतार या २०१९ पासून पंचायत समितीमध्ये बचत गट विभागात सीआरपी म्हणून काम करत असताना विविध शासकीय योजनांची माहिती देतात. त्याचा गैरफायदा घेत प्रशांत अडसूळ (कोरेगाव, ता. कर्जत) नामक व्यक्तीने त्यांच्याशी संपर्क साधून शिलाई मशीन योजनेत महिलांना ११०० रुपयांत शिलाई मशीन देण्याचे आमिष दाखवले.

Web Title: Ahilyanagar karjat sewing machine scam 439 women cheated prashant adsul fraud

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 22, 2026 | 10:02 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • Marathi News

संबंधित बातम्या

World News : तेल बाजारातील अस्थिरता अनेक वर्षे कायम राहण्याची शक्यता; अधिकाऱ्यांचा इशारा
1

World News : तेल बाजारातील अस्थिरता अनेक वर्षे कायम राहण्याची शक्यता; अधिकाऱ्यांचा इशारा

Yemen News : येमेनमध्ये हुथींविरोधात मोठी कारवाई; सरकारी दलांचा बाब-अल-मंदेबकडे जोरदार पलटवार
2

Yemen News : येमेनमध्ये हुथींविरोधात मोठी कारवाई; सरकारी दलांचा बाब-अल-मंदेबकडे जोरदार पलटवार

Satara News: :दुष्काळाच्या कचाट्यात शेतकरी; दूध व्यवसायानेही सोडली साथ!
3

Satara News: :दुष्काळाच्या कचाट्यात शेतकरी; दूध व्यवसायानेही सोडली साथ!

Wai News : बिबट्याच्या वाढत्या वावराने पश्चिम वाईत भीती; पिंजरे-कॅमेरे बसवण्याची मागणी
4

Wai News : बिबट्याच्या वाढत्या वावराने पश्चिम वाईत भीती; पिंजरे-कॅमेरे बसवण्याची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.