Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar News: बिबट्याची दहशत पुन्हा वाढली! एकाच आठवड्यात 4 हल्ले आणि…

आता कुठे बिबट्याचे हल्ले थांबले होते, तेच आता त्याचे हल्ले वाढल्याची घटना पुन्हा समोर येत आहे. संगमनेर तालुक्यातील शिबलापूर परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात १० शेळ्या आणि १ बोकड अशा एकूण ११ प्राण्यांचा मृत्यू झाला आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Apr 18, 2026 | 08:14 PM
Ahilyanagar News: बिबट्याची दहशत पुन्हा वाढली! एकाच आठवड्यात 4 हल्ले आणि…
Follow Us
Follow Us:

संगमनेर तालुक्यातील शिबलापूर परिसरात बिबट्याने धुमाकूळ घालत एका वयोवृद्ध महिलेच्या गोठ्यावर भीषण हल्ला केला. या हल्ल्यात १० शेळ्या आणि १ बोकड अशा एकूण ११ प्राण्यांचा मृत्यू झाला असून, सुमारे अडीच ते तीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

शुक्रवारी दि १७ रोजी दरम्यान, आश्वी बुद्रुक येथे सकाळी ८ वाजता सुमनबाई बाळासाहेब खेमनर यांच्यावरही बिबट्‌याने हल्ला केल्याची घटना समोर आली असून, शेतकरी कुटुंबांमध्ये भीतीचे सावट अधिकच गडद झाले आहे. शिबलापूर-आश्वी रस्त्यावरील बोंद्रे वस्ती येथे राहणाऱ्या ६२ वर्षीय लहानबाई मच्छिंद्र वनवे यांच्या गोठ्यावर बुधवारी मध्यरात्री हा प्रकार घडला. त्यांच्या घरामागील १० बाय १५ आकाराच्या पत्र्याच्या गोठ्यात शेळ्या बांधलेल्या होत्या.

चीनमध्ये तयार होणारी कार चीनच्याच कंपनीला टक्कर देणार! 751 किमीची रेंज आणि बरंच काही

बिबट्याने गोठ्याच्या पाठीमागील अरुंद फटीतून आत प्रवेश करून एकामागून एक प्राण्यांवर हल्ला चढवला. गोठा पूर्णपणे बंदिस्त असल्याने बिबट्याला बाहेर पडता न आल्याने तो पिसाळल्यासारखा वागला आणि त्याने ११ प्राण्यांचा जागीच बळी घेतला. तीन लहान कोकरे मात्र सुदैवाने बचावली. हल्ल्यानंतर बिबट्याने पाच शेळ्या जवळील ऊसाच्या शेतात ओढून नेल्या. घटनेनंतर सरपंच प्रमोद बोंद्रे, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश शिंदे व ग्रामस्थांनी ऊसाच्या शेतात शोधमोहीम राबवली. यावेळी बिबट्याचा वावर दिसून आल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले.

वनवे यांचा उदरनिर्वाहाचा आधार हिरावला

लहानबाई वनवे या अत्यंत गरीब असून त्यांचा उदरनिर्वाह शेळीपालनावर अवलंबून आहे. स्वतःची शेती नसल्याने त्या इतरांकडून चारा आणून शेळ्यांचे पालन करत होत्या. एकाच रात्रीत त्यांचे सर्वस्व नष्ट झाल्याने दुष्काळात तेरावा महिना अशी अवस्था झाली आहे.

Tesla आणू शकते त्यांची सर्वात स्वस्त SUV, कधी होणार लाँच? जाणून घ्या एका क्लिकवर

बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी

परिसरात बिबट्याचे हल्ले वाढत असून, या आठवड्यातील हा चौथा हल्ला असल्याची माहिती आहे. त्यामुळे संबंधित बिबट्याला तातडीने पिंजरा लावून पकडावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

शासकीय योजनेचा लाभ वनवे यांना द्यावा

राज्याच्या पशुसंवर्धन विभागामार्फत सुरू असलेल्या शेळीपालन योजनेचा लाभ नुकसानग्रस्त लहानबाई वनवे यांना तातडीने देण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.

Web Title: Ahilyanagar leopard attack sangamner shiblapur goat loss villagers demand action

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 18, 2026 | 08:14 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • Leopard Attack
  • Sangamner

संबंधित बातम्या

गाढवे पट वस्तीवर बिबट्याचा मुक्त संचार! ओतूर परिसरातील नागरिक भयभीत; वनविभागाच्या कारवाईकडे लक्ष
1

गाढवे पट वस्तीवर बिबट्याचा मुक्त संचार! ओतूर परिसरातील नागरिक भयभीत; वनविभागाच्या कारवाईकडे लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.