Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar News: कर्जतमध्ये भाजपाची ‘इनकमिंग’ वाढवणारे शिंदेंच्या शिवसेनेला झाले कनेक्ट!

कर्जत जामखेडच्या मतदारसंघात भाजप नेते प्रवीण घुले आणि सचिन घुले यांनी समर्थकांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करत सर्वाना राजकीय धक्का दिला आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 26, 2026 | 09:07 PM
कर्जतमध्ये भाजपाची 'इनकमिंग' वाढवणारे शिंदेंच्या शिवसेनेला झाले कनेक्ट!

कर्जतमध्ये भाजपाची 'इनकमिंग' वाढवणारे शिंदेंच्या शिवसेनेला झाले कनेक्ट!

Follow Us
Follow Us:

कर्जत-जामखेड मतदारसंघात अचानक घडलेल्या राजकीय हालचालींनी स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडवली आहे. कर्जत नगरपंचायतीतील सत्तासमीकरणांवर निर्णायक प्रभाव असलेले भाजप नेते प्रवीण घुले आणि सचिन घुले यांनी समर्थकांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करत नवे राजकीय संकेत दिले आहेत.

तीन वर्षांपूर्वी प्रविण घुले यांनी काँग्रेसमधून त्यावेळी उपमुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला होता. खुल्या प्रवर्गातील घुले हे पहिले प्रस्थ विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदें यांना मिळाले होते. त्यांच्या पक्षप्रवेशानंतर कर्जत-जामखेड मतदारसंघात भाजपात ‘इनकमिंग’ वाढले. त्याचा फायदा २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत प्रा. राम शिंदे यांना झाला. त्यांचा केवळ १२४३ मतांनी निसटता पराभव झाला. घुले बंधुंनी घेतलेला हा निर्णय भाजप नेते सभापती प्रा. राम शिंदे यांना धक्का मानला जातो.

सततच्या चार्जिंगपासून ग्राहकांची सुटका! ‘ही’ Electric Car स्वतःहून होते चार्ज, जाणून घ्या REEV गाड्यांबद्दल

स्थानिक पातळीवर किंगमेकर म्हणून ओळख असलेल्या घुले बंधूंच्या या पावलामुळे कर्जत नगरपंचायतीतील सत्तेचे संतुलन बदलण्याची चिन्हे दिसत आहेत. घुले बंधूंचा प्रभाव केवळ नगरपंचायतीच्या माध्यमातून केवळ कर्जत शहरापुरता मर्यादित नसून ग्रामीण भागातही त्यांचे मजबूत जाळे आहे. पूर्वी २०१९ ला रोहित पवार यांच्या राजकीय घडामोडींमध्येही त्यांची भूमिका महत्त्वाची राहिली होती. २०२४ ला प्रा. राम शिंदेंना कर्जत तालुक्यातून लक्षणीय मते मिळाली. यामध्येही घुले बंधू यांचे योगदान महत्त्वाचे ठरले होते. त्यामुळे त्यांच्या पक्षांतराकडे केवळ स्थानिक घटना म्हणून नव्हे, तर भविष्यातील व्यापक राजकीय रणनीती म्हणून पाहिले जात आहे.

या घडामोडींमुळे सर्वांचे लक्ष कर्जत नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा रोहिणी घुले यांच्या भूमिकेकडे लागले आहे. कुटुंबातील प्रमुख सदस्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्या भाजपमध्ये कायम राहणार की नवा राजकीय निर्णय घेणार, याकडे मतदारसंघाचे लक्ष लागले आहे. त्यांच्या पुढील पावलावर नगरपंचायतीतील सत्तेचे भवितव्य अवलंबून राहणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

Narhari Zirwal Viral Video: झिरवळांना अडकवण्यासाठी कुणी सापळा रचला; वडेट्टीवारांचा विधानसभेत लेटरबॉम्ब

निर्णयाची चाहूल अगोदरच लागली

भाजपाला रामराम ठोकून शिवसेनेत प्रवेश करण्याच्या घुले बंधूच्या निर्णयाची चाहूल आधीच सोशल मीडियाद्वारे लागली होती, समर्थकांनी ‘जय महाराष्ट्र’चे स्टेटस शेअर करत बदलांचे संकेत दिले होते. त्यानंतर मुंबईत जाऊन त्यांनी अधिकृतरित्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्या या प्रवेशानंतर घुले बंधूच्या भूमिकेबाबत सुरू असलेल्या वर्षांना पूर्णविराम मिळाला.

विधानसभेसाठीची आतापासून रणनीती !

राजकीय जाणकारांच्या मते, हा केवळ पक्षप्रवेश नसून २०२९ च्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने आखलेली रणनीती असू शकते, कर्जत-जामखेड मतदारसंघात घुले कुटुंबाचा प्रभाव लक्षात घेतल्यास, या बदलाचा परिणाम आगामी काळात अधिक ठळकपणे जाणवण्याची शक्यता आहे. एकूणच घुले बंधूच्या या निर्णायक पावलामुळे कर्जत-जामखेडमधील राजकारण नव्या टप्प्यात प्रवेश करत आहे. पुढील काही दिवसांत आणखी मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Web Title: Ahilyanagar news karjat jamkhed constituency pravin ghule sachin ghule joined eknath shinde shivsena

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 26, 2026 | 09:07 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • Eknath Shinde
  • Karjat Jamkhed

संबंधित बातम्या

मोठी बातमी ! शिंदे गटाच्या नेत्याकडून विमानतळावर फायरिंग; दोन सुरक्षा कर्मचारी जखमी
1

मोठी बातमी ! शिंदे गटाच्या नेत्याकडून विमानतळावर फायरिंग; दोन सुरक्षा कर्मचारी जखमी

‘सक्षम शेतकरी, कर्तृत्ववान युवक आणि सशक्त महिला हीच विकासाची खरी व्याख्या’; एकनाथ शिंदेंचा विश्वास
2

‘सक्षम शेतकरी, कर्तृत्ववान युवक आणि सशक्त महिला हीच विकासाची खरी व्याख्या’; एकनाथ शिंदेंचा विश्वास

Eknath Shinde: ठाण्याचा होणार कायापालट! मेट्रो, बोरिवली बोगद्यासह अत्याधुनिक सुविधांना वेग, उपमुख्यमंत्र्यांची माहिती
3

Eknath Shinde: ठाण्याचा होणार कायापालट! मेट्रो, बोरिवली बोगद्यासह अत्याधुनिक सुविधांना वेग, उपमुख्यमंत्र्यांची माहिती

Nashik Politics: तू मागच्या निवडणुकीत वाचलास, आता वाचणार नाही!; शिंदे गटाच्या तालुकाप्रमुखाला आमदारपुत्राकडून धमकी?
4

Nashik Politics: तू मागच्या निवडणुकीत वाचलास, आता वाचणार नाही!; शिंदे गटाच्या तालुकाप्रमुखाला आमदारपुत्राकडून धमकी?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.