Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 24 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar News: कोरडगाव परिसरात रेशनधान्याचा मोठा काळाबाजार! ऑनलाईन रेशनकार्ड असून सुद्धा मिळेना धान्य

सरकारकडून गरिबांना मोफत रेशन योजना सुरु करून देखील नगर जिल्ह्यातील कोरडगाव परिसरातील अनेक गावात लोकांना ऑनलाईन रेशनकार्ड असून सुद्धा धान्य मिळत नाही आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 22, 2026 | 09:16 PM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us
Follow Us:

सरकारने गरिबांच्या कल्याणासाठी मोफत रेशन योजना सुरू केली असली, तरी कोरडगाव परिसरातील अनेक गावांमध्ये या योजनेचा पुरता बोजवारा उडाला आहे. कोरडगाव , औरंगपूर, जिरेवाडी, दैत्य नांदूर, कळसपिंप्री, सोनोशी, भुतेटाकळी, शेकटे, अकोले आणि जळगाव या भागांत धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

एकीकडे अनेक गरीब कुटुंबांचे रेशन कार्ड ऑनलाईन असूनही त्यांना धान्य। नाकारले जात आहे, तर दुसरीकडे धनदांडगे लाभार्थी आपले धान्य थेट व्यापाऱ्यांना विकत असल्याचे चित्र दिसत आहे. परिसरातील अनेक अत्यंत गरजू आणि गरीब कुटुंबांकडे रेशन कार्ड उपलब्ध आहेत. इतकेच नव्हे तर प्रशासकीय दप्तरी त्यांची नावे ‘ऑनलाईन’ सुद्धा दिसत आहेत. तरीही, तांत्रिक – कारणांचे किंवा ‘साठा उपलब्ध नाही’ असे सांगून या गरिबांना धान्यापासून वंचित – ठेवले जात आहे. ज्यांच्या घरात चुली – पेटवण्यासाठी धान्याची नितांत गरज आहे, त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागत असल्याने संताप व्यक्त होत आहे.

Ahilyanagar News: पुणे- नाशिक रेल्वेचे भवितव्य अंधकारात? महारेलला वितरित केलेला निधी काढून घेण्याची प्रक्रिया सुरू

अपात्र लाभार्थ्यांचे धान्य बंद करण्याची मागणी

ज्यांना खरोखर गरज आहे त्यांना धान्य मिळत नाही आणि जे धान्य विकून पैसे कमावतात त्यांना मोफत धान्य मिळते, हा कुठला न्याय? असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत. जे लाभार्थी धान्य विकताना आढळतात, त्यांचे रेशन कार्ड तात्काळ रद्द करावे आणि तो कोटा गावातील खन्ऱ्या गरीब व वंचित कुटुंबांना वळवावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

धनदांडग्यांची चैन, व्यापाऱ्यांची चांदी

एकीकडे गरीब धान्यासाठी वणवण फिरत असताना, दुसरीकडे ज्यांची आर्थिक स्थिती उत्तम आहे अशा धनदांडग्या लाभार्थ्यांना मात्र नियमित धान्य मिळत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, हे लाभार्थी रेशन दुकानातून धान्य घेतात आणि तिथेच किंवा गावाबाहेर दबा धरून बसलेल्या व्यापाऱ्यांना ते धान्य विकतात. रेशनचा कोठा आला की लगेच या खरेदी-विक्रीच्या व्यवहारांना वेग येतो. गरिबांच्या हक्काचे हे धान्य व्यापाऱ्यांच्या गोदामात जात असताना पुरवठा विभाग मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे.

Ahilyanagar News: खरात प्रकरणात नगर जिल्ह्यातील प्रभावी नेत्याचा सहभाग? डॉ. सुजय विखे पाटलांचे संकेत

पुरवठा विभागाची भूमिका संशयास्पद

इतक्या मोठ्या प्रमाणावर १०-१२ गावांत हा गैरप्रकार सुरू असताना पुरवठा विभागाचे अधिकारी गप्प का? ऑनलाईन रेकॉर्ड असूनही गरिबांना धान्य का दिले जात नाही? या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून चौकशी होणे गरजेचे आहे. अन्यथा, या भ्रष्ट साखळीमुळे सरकारी योजनेचा मूळ हेतूच मोडीत निघण्याची भीती व्यक्त होत आहे. माझे रेशन कार्ड ऑनलाईन दिसते, तरीही मला धान्य दिले जात नाही. आमचा हक्क हिरावून घेऊन तो व्यापाऱ्यांच्या घशात घातला जात आहे. प्रशासनाने याची दखल घ्यावी, असे एका एक वंचित लाभार्थीने सांगितले आहे.

Web Title: Ahilyanagar news koradgaon ration black marketing online ration card issue

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 22, 2026 | 09:16 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • Ration Card

संबंधित बातम्या

नोकरीची कसरत आणि योगाची जिद्द! सॉफ्टवेअर इंजिनिअर सीमा पवार यांचे जागतिक व्यासपीठावर दैदिप्यमान यश
1

नोकरीची कसरत आणि योगाची जिद्द! सॉफ्टवेअर इंजिनिअर सीमा पवार यांचे जागतिक व्यासपीठावर दैदिप्यमान यश

Anna Hazare : नव्या RTI नियमांवर अण्णा हजारे भडकले; वयाच्या ९० व्या वर्षी पुन्हा उपोषणाचा इशारा!
2

Anna Hazare : नव्या RTI नियमांवर अण्णा हजारे भडकले; वयाच्या ९० व्या वर्षी पुन्हा उपोषणाचा इशारा!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.