Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar News: ‘लेडी सिंघम’ची जोरदार कारवाई: हुकूमशाही आणि अडथळ्यांना न जुमानता कारवाईचा धडाका!

Ahilyanagar News: प्रशासकीय दबाव, अडथळे आणि विरोधाला न जुमानता ‘लेडी सिंघम’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अधिकाऱ्यांनी कठोर कारवाई करत गैरप्रकारांवर मोठा प्रहार केला. त्यांच्या धाडसी निर्णयामुळे परिसरात खळबळ उडाली असून कारवाईची सर्वत्र चर्चा रंगली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 07, 2026 | 02:28 PM
‘लेडी सिंघम’ची जोरदार कारवाई: हुकूमशाही आणि अडथळ्यांना न जुमानता कारवाईचा धडाका!

‘लेडी सिंघम’ची जोरदार कारवाई: हुकूमशाही आणि अडथळ्यांना न जुमानता कारवाईचा धडाका!

Follow Us
Follow Us:
  • लेडी सिंघम’ची जोरदार कारवाई
  • हुकूमशाही आणि अडथळ्यांना न जुमानता कारवाईचा धडाका!
  • पोलिसांवर दबाव आणण्याचा राजकीय बनाव
पोपट पिटेकर,​ अहिल्यानगर :  शहर परिसरामध्ये वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली करणाऱ्या वाहनधारकांवर सध्या पोलीस प्रशासनाकडून कठोर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. कोतवाली पोलीस स्टेशन समोरील मुख्य रस्त्यावर ‘फॅन्सी’ नंबर प्लेट्स, नंबर प्लेट नसणे, आणि विनापरवाना टू-व्हीलर चालवणाऱ्या बेफिक्र वाहनधारकांची कसून तपासणी केली जात आहे. या धडक मोहिमेत एका कर्तव्यदक्ष महिला पोलीस शिपाई म्हणजेच आपल्या ‘लेडी सिंघम’ने दाखवलेल्या धडाडीचे सर्वसामान्यांकडून उस्फूर्त कौतुक होत आहे. ​कारवाईदरम्यान काही बेशिस्त वाहनचालक “आम्ही नगरसेवकांचे कार्यकर्ते,माणसे आहोत, गाडी सोडून द्या” असा धाक दाखवून पोलिसांच्या कामात थेट अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करताना दिसले.

Ahilyanagar News: जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या 107 व्या सभेत राडा; सभेपूर्वी प्रतिसभा, महिला शिक्षिकेला भोवळ

लोकप्रतिनिधींच्या नावाचा वापर करून कारवाईतून पळवाट काढण्याचा आणि पोलिसांवर दबाव आणण्याचा राजकीय बनाव येथे रचण्यात आला. परंतु, कोणत्याही दबावाला किंवा पोकळ धमक्यांना बळी न पडता, या ‘लेडी सिंघम’ने आपले कर्तव्य अत्यंत प्रामाणिकपणे व निडरपणे पार पाडले. “नियम सर्वांसाठी समान आहेत” असा स्पष्ट आणि रोखठोक संदेश देत त्यांनी हुकूमशाही दाखवणाऱ्यांना आणि नियमांची मग्रुरी करणाऱ्यांना चांगलाच इंगा दाखवला. राजकीय वजनाचा वापर करून सुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या एकाचीही गय न करता त्यांनी कडक दंडात्मक कारवाईचा बडगा सुरूच ठेवला.

​कायद्याचे राज्य राखण्यासाठी आणि रस्त्यावरील शिस्त अबाधित ठेवण्यासाठी कोणत्याही अडथळ्यांना न जुमानता धाडसाने काम करणाऱ्या या महिला शिपाई लेडी सिंघम कार्यपद्धतीचे नागरिकांमधून प्रचंड कौतुक होत आहे. “पोलीस खात्यात अशाच प्रामाणिक आणि कडक अधिकाऱ्यांची गरज आहे,” अशी भावना नागरिक व्यक्त करत असून लेडी सिंघम यांच्या या कौतुकास्पद कारवाईची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे.

नागरिकांकडून पोलिसांच्या धाडसाचे कौतुक

सार्वजनिक ठिकाणी कोणाच्याही दबावाला न जुमानता नियमांची अंमलबजावणी करणाऱ्या महिला पोलीस शिपाईचे नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे. सोशल मीडियावरही त्यांच्या धाडसी कारवाईची चर्चा सुरू असून, “कायद्यापुढे सर्व समान आहेत” हा संदेश त्यांनी आपल्या कृतीतून दिल्याची प्रतिक्रिया अनेक नागरिक व्यक्त करत आहेत.

वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन

पोलीस प्रशासनाने नागरिकांना वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे. फॅन्सी नंबर प्लेट्स, विनापरवाना वाहन चालविणे, कागदपत्रांशिवाय वाहन रस्त्यावर आणणे किंवा राजकीय ओळखीचा गैरवापर करून कारवाई टाळण्याचा प्रयत्न करणे यापैकी कोणतीही बाब सहन केली जाणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. आगामी काळातही अशा विशेष मोहिमा सुरू राहणार असून नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

Ahilyanagar News: युवा शेतकऱ्यांसाठी रोजगाराची नवी दिशा; प्रशिक्षणानंतर प्रमाणपत्रांसह शासकीय योजनांची माहिती

Web Title: Ahilyanagar news lady singham strikes tough action despite pressure and obstacles

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2026 | 02:28 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • viral news

संबंधित बातम्या

ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी शकुंतला नगरकर यांचं निधन; 50 वर्षांहून अधिक काळ लावणी गाजवल्यानंतर घेतला अखेरचा श्वास
1

ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी शकुंतला नगरकर यांचं निधन; 50 वर्षांहून अधिक काळ लावणी गाजवल्यानंतर घेतला अखेरचा श्वास

‘सुप्रीम कोर्ट’ थीमवर गणपतीचा अनोखा दरबार; ‘न्यायमूर्ती गणराया’ देत आहेत दर्शन, Video Viral
2

‘सुप्रीम कोर्ट’ थीमवर गणपतीचा अनोखा दरबार; ‘न्यायमूर्ती गणराया’ देत आहेत दर्शन, Video Viral

Video Viral : ३ कोटींच्या नोटांनी सजले ‘बाप्पा’! तेलंगणातील ‘हे’ मंदिर पाहून डोळ्यांचे पारणे फिटेल; मुकुट अन् माळेवरही नोटाच नोटा
3

Video Viral : ३ कोटींच्या नोटांनी सजले ‘बाप्पा’! तेलंगणातील ‘हे’ मंदिर पाहून डोळ्यांचे पारणे फिटेल; मुकुट अन् माळेवरही नोटाच नोटा

‘सगळे माझा पाठलाग करत होते…’; महिलांचे कपडे घालून दिल्लीत रात्रीची सुरक्षा पाहायला निघाला तरुण; Video Viral
4

‘सगळे माझा पाठलाग करत होते…’; महिलांचे कपडे घालून दिल्लीत रात्रीची सुरक्षा पाहायला निघाला तरुण; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.