• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Mumbai »
  • Agreement Between Environment Ministry And Coca Cola Company For Mumbai Climate Week 2026

Mumbai Climate Week 2026 मध्ये महत्त्वाचे सामंजस्य करार; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंची खास उपस्थिती

वापरलेल्या पीईटी बाटल्यांचे संकलन आणि पुनर्वापर करण्यासाठी हिंदुस्थान कोकाकोला कंपनी (एचसीसीबी) आणि महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागामध्ये सामंजस्य करार करण्यात आला.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 18, 2026 | 03:58 PM
Agreement between Environment Ministry and Coca-Cola Company for Mumbai Climate Week 2026

मुंबई हवामान सप्ताह २०२६ साठी पर्यावरण मंत्रालय आणि कोका-कोला कंपनी यांच्यात करार झाला (फोटो - टीम नवराष्ट्र)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Mumbai Climate Week 2026 : मुंबई : हवामान बदलाचा मुकाबला आणि चक्रीय अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग व राज्य हवामान कृती कक्षाने मुंबई क्लायमेट वीक २०२६ दरम्यान दोन महत्त्वाच्या सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या मंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात राज्य हवामान कृती कक्षाने क्लायमेट ट्रेड एलएलपी सोबत आणि पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने हिंदुस्थान कोकाकोला बेव्हरेज कंपनीसोबत महा-आरईपीटी अभियान राबविण्यासंदर्भात करार केला. पीईटी बाटल्यांचे संकलन व पुनर्वापरासाठी पहिल्यांदाच देशात कोकाकोला कंपनीने राज्य शासनासोबत सामंजस्य करार केला आहे.

पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या सचिव जयश्री भोज, वातावरणीय बदल कक्षाचे संचालक अभिजित घोरपडे यांनी या करारावर स्वाक्षरी केल्या. वापरलेल्या पीईटी बाटल्यांचे संकलन आणि पुनर्वापर करण्यासाठी हिंदुस्थान कोकाकोला कंपनी (एचसीसीबी) आणि महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागामध्ये सामंजस्य करार करण्यात आला. हिंदुस्थान कोकाकोला बेव्हरेज कंपनीसोबत “महा-आरपीईटी अभियान” सुरू करण्यासाठी पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने हा करार केला. या उपक्रमातून राज्यभर वापरलेल्या पीईटी बाटल्यांचे संकलन व पुनर्वापराला चालना दिली जाणार आहे. सार्वजनिक-खाजगी भागीदारीच्या माध्यमातून कचरा व्यवस्थापन अधिक शाश्वत करण्याचा हा प्रयत्न असून पर्यावरण संवर्धनासाठी राज्याचा दीर्घकालीन दृष्टिकोन यातून अधोरेखित होत असल्याचे पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने सांगितले आहे. या दोन्ही करारांमुळे हवामान प्रतिकारशक्ती वाढवणे, संस्थात्मक क्षमता मजबूत करणे आणि शाश्वत विकासाला चालना देणे शक्य होणार आहे.

हे देखील वाचा : मुस्लीम आरक्षण रद्द झाल्याने राज्यात वादाची ठिणगी: काँग्रेसने महायुतीला धरले धारेवर

मोठ्या एफएमसीजी कंपनीसोबत महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण विभागाने पहिल्यांदाच समुदाय-केंद्रित, संरचित पीईटी संकलन आणि जनजागृती कार्यक्रम राबवण्यासाठी भागीदारी केली आहे. या सहकार्याअंतर्गत मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेल, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, बीड आणि पालघर येथे जनजागृती मोहिमा, संरचित संकलन व्यवस्था आणि जबाबदार विल्हेवाटीबाबत माहिती-शिक्षण साहित्य प्रसारित केले जाणार आहे. किरकोळ विक्री केंद्रे, हॉटेल्स, कार्यस्थळे आणि सार्वजनिक ठिकाणी संकलन सुविधा उभारून शाळा, संस्था आणि स्थानिक स्वराज्य संस्थांशी वर्षभर समन्वय ठेवला जाणार आहे.

या करारातून धोरणात्मक देखरेख आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी यांचा समन्वय साधत सार्वजनिक-खासगी भागीदारीचे व्यावहारिक मॉडेल उभे राहणार आहे. प्रमुख शहरांमध्ये पीईटी कचरा व्यवस्थापन अधिक शिस्तबद्ध आणि समुदाय-केंद्रित पद्धतीने राबवण्याचा पाया या उपक्रमातून घातला जाणार असल्याचे सांगण्यात आले.

हे देखील वाचा :  महाराष्ट्रसह 10 राज्यातील राज्यसभा निवडणूका जाहीर; शरद पवार पुन्हा खासदारकी स्वीकारणार का?

राज्य हवामान कृती कक्षाने क्लायमेट ट्रेड एलएलपी सोबत केलेल्या करारातून हवामान विषयक जनजागृती, भागधारकांचा सहभाग आणि क्षमता वृद्धी यांना बळ दिले जाणार आहे. या सहकार्यामुळे महाराष्ट्राच्या राज्य हवामान कृती आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी, संवाद व्यवस्था आणि विविध विभागांतील समन्वय मजबूत होणार आहे.

राज्य हवामान कृती कक्षाच्या दोन अहवालाचे पंकजा मुंडे यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई क्लायमेट वीकमध्ये राज्य हवामान कृती कक्षाने दोन महत्त्वाचे अहवालही प्रसिद्ध केले. सी ४० सिटीज यांच्या सहकार्याने तयार करण्यात आलेल्या सी40 अहवाल: महाराष्ट्रातील शहरांतील ऊर्जा आणि बांधकाम क्षेत्रातील नेट झिरो संक्रमण या अहवालात महाराष्ट्रातील शहरांसाठी नेट-झिरो आणि हवामान-प्रतिरोधक विकासाचा रोडमॅप मांडण्यात आला आहे. मुंबई, अमरावती आणि ठाणे यांसह सात शहरांनी उच्च प्रभावी कृती आराखडे तयार केले असून, त्यात महानगरपालिका इमारती नेट-झिरो करणे आणि छतावरील सौरऊर्जा वाढवण्यावर भर देण्यात आला आहे.

तसेच सेंटर फॉर वॉटर अँड सॅनिटेशन सीडब्लूएएस यांच्या सहकार्याने तयार केलेल्या सीडब्लूएएस अहवाल: हवामान-प्रतिक्रियाशील वॉश सेवा या मार्गदर्शिकेत हवामान बदलाशी सुसंगत पाणी व स्वच्छता सेवा कशा राबवायच्या याबाबत व्यावहारिक मार्गदर्शन देण्यात आले आहे. चक्रीय अर्थव्यवस्था पद्धती, ऊर्जा संक्रमण आणि सर्वसमावेशकतेवर भर देत महाराष्ट्रातील शहरांतील अनुभव यात मांडले आहेत. या उपक्रमांमुळे शहरकेंद्रित हवामान कृतीत महाराष्ट्र आघाडीवर राहील आणि इतर शहरांसाठी अनुकरणीय नमुना निर्माण होईल.

Web Title: Agreement between environment ministry and coca cola company for mumbai climate week 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 18, 2026 | 03:58 PM

Topics:  

  • Environment Department
  • Mumbai News
  • Pankaja Munde

संबंधित बातम्या

आपत्ती आली तरी घाबरू नका! ‘दोन लाख विद्यार्थ्यांना…’; Mangal Prabhat Lodha यांची संकल्पना
1

आपत्ती आली तरी घाबरू नका! ‘दोन लाख विद्यार्थ्यांना…’; Mangal Prabhat Lodha यांची संकल्पना

“पर्यावरण संवर्धन हे…” ; Mumbai Climate Week दरम्यान मंत्री पंकजा मुंडेंचे भाष्य
2

“पर्यावरण संवर्धन हे…” ; Mumbai Climate Week दरम्यान मंत्री पंकजा मुंडेंचे भाष्य

“… हीच आपली सामूहिक जबाबदारी” ‘Mumbai Climate Week’ मध्ये पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे?
3

“… हीच आपली सामूहिक जबाबदारी” ‘Mumbai Climate Week’ मध्ये पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे?

संरक्षण ते तंत्रज्ञान! आज Modi-Macron भेटीत ‘या’ महत्वाच्या मुद्द्यांवर होणार चर्चा; भारत-फ्रान्स मैत्रीचा नवा अध्याय
4

संरक्षण ते तंत्रज्ञान! आज Modi-Macron भेटीत ‘या’ महत्वाच्या मुद्द्यांवर होणार चर्चा; भारत-फ्रान्स मैत्रीचा नवा अध्याय

ताज्या बातम्या

पुढे वाचा
तरुण नवोन्मेषक आणि उद्योजक पुरस्कार! अर्ज कसा करावा? शेवटची तारीख जाणून घ्या

तरुण नवोन्मेषक आणि उद्योजक पुरस्कार! अर्ज कसा करावा? शेवटची तारीख जाणून घ्या

Feb 18, 2026 | 05:51 PM
Rahul Gandhi on BJP: “भारतीय डेटाची विक्री आणि चिनी उत्पादनांचे प्रदर्शन”; AI समिटवरून राहुल गांधींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

Rahul Gandhi on BJP: “भारतीय डेटाची विक्री आणि चिनी उत्पादनांचे प्रदर्शन”; AI समिटवरून राहुल गांधींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

Feb 18, 2026 | 05:47 PM
“ब्रेन हॅम्रेज, पण…”, सलीम खान यांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट, डॉक्टरांनी दिली माहिती

“ब्रेन हॅम्रेज, पण…”, सलीम खान यांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट, डॉक्टरांनी दिली माहिती

Feb 18, 2026 | 05:45 PM
आता ST चा प्रवासाच्या सवलतीसाठी ‘NCMC’ कार्ड अनिवार्य; बोगसगिरीला बसणार चाप

आता ST चा प्रवासाच्या सवलतीसाठी ‘NCMC’ कार्ड अनिवार्य; बोगसगिरीला बसणार चाप

Feb 18, 2026 | 05:45 PM
Shivaji maharaj Jayanti : नेरळमध्ये तिथीप्रमाणे साजरा होणार शिवजन्मोत्सव, उत्सव समितीच्या अध्यक्षपदी बंडू क्षीरसागर

Shivaji maharaj Jayanti : नेरळमध्ये तिथीप्रमाणे साजरा होणार शिवजन्मोत्सव, उत्सव समितीच्या अध्यक्षपदी बंडू क्षीरसागर

Feb 18, 2026 | 05:42 PM
Hingoli News : CCTV बंद की वीज अचानक गायब…? ‘कॉपी’ प्रकरणात महावितरणच्या नोंदींचीही चौकशी आवश्यक !

Hingoli News : CCTV बंद की वीज अचानक गायब…? ‘कॉपी’ प्रकरणात महावितरणच्या नोंदींचीही चौकशी आवश्यक !

Feb 18, 2026 | 05:38 PM
अजितदादा पवार क्रीडा नगरीत ‘डायनॅमिक’ खो-खोचा थरार शिगेला पोहोचला, मुंबई पोलिसांचा विजय

अजितदादा पवार क्रीडा नगरीत ‘डायनॅमिक’ खो-खोचा थरार शिगेला पोहोचला, मुंबई पोलिसांचा विजय

Feb 18, 2026 | 05:35 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : अहिल्यानगरात टिपू सुलतान वाद तापला!

Ahilyanagar : अहिल्यानगरात टिपू सुलतान वाद तापला!

Feb 18, 2026 | 03:10 PM
Virar : मार्चअखेर उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होणार, महापौर अजिव पाटील यांची घोषणा

Virar : मार्चअखेर उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होणार, महापौर अजिव पाटील यांची घोषणा

Feb 18, 2026 | 03:07 PM
Dombivli : डोंबिवली-मुंबईत बनावट ‘Telma AM’ रॅकेटचा पर्दाफाश

Dombivli : डोंबिवली-मुंबईत बनावट ‘Telma AM’ रॅकेटचा पर्दाफाश

Feb 18, 2026 | 03:04 PM
NAVI MUMBAI : नवी मुंबई महापौरांचा रुग्णालयांना पाहणी दौरा, आरोग्य सुविधांसाठी डॅशबोर्डची घोषणा

NAVI MUMBAI : नवी मुंबई महापौरांचा रुग्णालयांना पाहणी दौरा, आरोग्य सुविधांसाठी डॅशबोर्डची घोषणा

Feb 18, 2026 | 02:22 PM
MAHAD : महाड तालुक्यात कोथेरी धरणाच्या घळभरणीला ग्रामस्थांचा तीव्र विरोध

MAHAD : महाड तालुक्यात कोथेरी धरणाच्या घळभरणीला ग्रामस्थांचा तीव्र विरोध

Feb 18, 2026 | 02:19 PM
Ratnagiri : रोखविरहित आणि पारदर्शक प्रवासासाठी एसटीचे मोठे पाऊल

Ratnagiri : रोखविरहित आणि पारदर्शक प्रवासासाठी एसटीचे मोठे पाऊल

Feb 17, 2026 | 07:55 PM
Palghar News : डहाणू–पालघर मार्गाला नवसंजीवनी; 165 कोटींच्या प्रकल्पाचे भूमिपूजन

Palghar News : डहाणू–पालघर मार्गाला नवसंजीवनी; 165 कोटींच्या प्रकल्पाचे भूमिपूजन

Feb 17, 2026 | 07:46 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.