Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar News: ‘ती’ एक चूक आणि संगमनेर पोलीस ठाण्यात शेकडो महिलांचे ठिय्या आंदोलन

10 महिन्यांपासून सीआरपी म्हणून कार्यरत असलेल्या महिलेला मानधन मिळत नव्हता. याच मानधनाची मागणी करण्यासाठी वरिष्ठांकडे गेले असता तिच्याशी गैरवर्तन झाले. दुर्दैव म्हणजे जनतेचे रक्षक असणाऱ्या पोलिसांनीही महिलेची तक्रार लिहून

  • By मयुर नवले
Updated On: Mar 25, 2026 | 08:20 PM
'ती' एक चूक आणि संगमनेर पोलीस ठाण्यात शेकडो महिलांचे ठिय्या आंदोलन

'ती' एक चूक आणि संगमनेर पोलीस ठाण्यात शेकडो महिलांचे ठिय्या आंदोलन

Follow Us
Follow Us:

संगमनेर बचत गटाची सीआरपी म्हणून कार्यरत असलेल्या महिलेला १० महिन्यांपासून मानधन मिळाले नाही. वरिष्ठांकडे मानधनाची मागणी केल्यानंतर तिच्याशी गैरवर्तन झाले. त्याची प्रशासनाने दखल घेतली नाही. पोलिसांनीही महिलेची तक्रार न घेतल्याने संतापलेल्या संगमनेरच्या शेकडो महिलांनी आज संगमनेर पोलिस ठाण्यात ठिय्या दिला.

सीआरपी महिलेला न्याय मिळावा यासाठी शहर व तालुक्यातील महिलांनी हे आंदोलन केले. पंचायत समितीच्या माध्यमातून चालवल्या जाणाऱ्या बचत गटांच्या नियंत्रणासाठी असलेल्या सीआरपीचे मागील १० महिन्यांपासून मानधन थकलेले आहे. काही महिलांचे मानधन दिले तर काहींचे मागे ठेवले.

Onion Growers : कांदा उत्पादकांसाठी सरकारकडून ठोस उपाययोजना; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले ‘हे’ महत्त्वपू्र्ण निर्देश

पीडित महिला मानधन मागण्यासाठी गेल्यानंतर तिच्याशी वरिष्ठ अधिकाऱ्याने गैरवर्तन केले. तिने ही बाब पती यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते शरद नाना थोरात यांना सांगितली. काही युवक कार्यकत्यांनी संतापून संबंधित अधिकाऱ्याला चोप दिला. त्यानंतर पीडिता तक्रार देण्यासाठी पोलिस ठाण्यात गेली. रात्री दोन वाजेपर्यंत त्यांना तेथे थांबवूनही तक्रार नोंदवण्यात आली नाही. कोणाचा तरी फोन आल्याने तक्रार घेतली नसल्याचा आंदोलक महिलांचा आरोप आहे. तुम्ही सकाळी या असे सांगितल्याने पीडिता सकाळी नऊ वाजता पोलिस ठाण्यात जाऊनही तक्रार घेतली नाही. त्यामुळे संतापलेल्या शेकडो महिलांनी पोलिस ठाण्याकडे धाव घेत तेथे ठिय्या दिला. पीडितेला न्याय देण्याची मागणी केली. त्यांनाही पोलिसांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्यानंतर संतप्त महिलांनी घोषणाबाजी केली.

संगमनेरला अशी परिस्थिती यापूर्वी कधीच नव्हती…

आशा, अंगणवाडी सेविकांसह विविध महिला कर्मचाऱ्यांना सतत त्रास दिला जातो. राजकीय कार्यक्रम त्यांना बंधनकारक केले जातात, महिलांकडून राजकीय अजेंडा राबवला जातो. यापूर्वी अशी परिस्थिती कधीही तालुक्यात नव्हती. संगमनेर तालुक्यात वाळू व अमली पदार्थाची तस्करी, गुंडागर्दी, मारामारी, हप्ते वसुली अशी परिस्थिती कधीही नव्हती, अशा तक्रारी आंदोलक महिलानी केल्या.

Ashok Kharat Case: “जादूटोण्याने निवडणुका जिंकता आल्या असत्या तर…”, अशोक खरात प्रकरणी मुख्यमत्र्यांनी सभागृहात स्पष्टच सांगितल

कोकाटे यांना झालेल्या मारहाणीचाही गुन्हा दाखल

तालुक्यातील शेडगाव येथील महिला बचत गटातील समुदाय संसाधन व्यक्तीच्या मानधनावरून कर्मचारी नंदलाल कोकाटे यांना मारहाण केल्याच्या घटनेचाही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्येष्ठ कार्यकर्ते शरद थोरात, त्याची मुले यांच्यासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. संबंधित महिलेविरूद्ध तक्रारी असल्याने त्यांना गटविकास अधिकाऱ्यांनी नोटीस दिली होती. त्याचे उत्तर न दिल्याने मानधन थांबविले होते. या कारणावरून संबंधित महिला, त्यांचे पती व शस्द थोरात व त्यांची मुले कार्यालयात आली आणि जाब विचारत मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Web Title: Ahilyanagar news sangamner women protest at police station crp issue

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 25, 2026 | 08:20 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • Sangamner

संबंधित बातम्या

Ahilyanagar Bank Election: बँक बिनविरोध करण्याचे मनसुबे धुळीस? अहिल्यानगरमध्ये तब्बल ५४१ उमेदवारी अर्जांमुळे खळबळ
1

Ahilyanagar Bank Election: बँक बिनविरोध करण्याचे मनसुबे धुळीस? अहिल्यानगरमध्ये तब्बल ५४१ उमेदवारी अर्जांमुळे खळबळ

Tridha Concert: अहिल्यानगरमध्ये रंगणार ‘त्रिधा’ची विशेष मैफल; गायन, वादन अन् नृत्याचा अनोखा संगम
2

Tridha Concert: अहिल्यानगरमध्ये रंगणार ‘त्रिधा’ची विशेष मैफल; गायन, वादन अन् नृत्याचा अनोखा संगम

Leopard : चांदबिबी महाल परिसरात बिबट्याचे दर्शन, गाडीपासून अवघ्या पाच फुटावर होता उभा
3

Leopard : चांदबिबी महाल परिसरात बिबट्याचे दर्शन, गाडीपासून अवघ्या पाच फुटावर होता उभा

Ahilyanagar News: जिल्हा बँक निवडणूक: ‘बिनविरोध’च्या हालचालींना वेग; पण ‘आत्मकेंद्री राजकारण’ चालणार नाही, राम शिंदेंचा इशारा
4

Ahilyanagar News: जिल्हा बँक निवडणूक: ‘बिनविरोध’च्या हालचालींना वेग; पण ‘आत्मकेंद्री राजकारण’ चालणार नाही, राम शिंदेंचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.