Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar : नागरिकांच्या जीवाशी होतोय खेळ; पिण्याच्या पाण्याच्या टाकीत शेवाळ, गावकऱ्यांना होतोय दूषित पाण्याचा पुरवठा

जामखेड शहरातील तपनेश्वर परिसरात पिवळसर व दूषित पाणीपुरवठा होत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक व पदाधिकारी आक्रमक झाले आहेत.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 12, 2026 | 03:51 PM
Ahilyanagar : नागरिकांच्या जीवाशी होतोय खेळ; पिण्याच्या पाण्याच्या टाकीत शेवाळ, गावकऱ्यांना होतोय दूषित पाण्याचा पुरवठा
Follow Us
Follow Us:

 

  • नागरिकांच्या जीवाशी होतोय खेळ;
  • पिण्याच्या पाण्याच्या टाकीत शेवाळ,
  • गावकऱ्यांना होतोय दूषित पाण्याचा पुरवठा
अहिल्यानगर : जामखेड शहरातील तपनेश्वर परिसरात पिवळसर व दूषित पाणीपुरवठा होत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक व पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. नागरिकांच्या तक्रारीनंतर पदाधिकाऱ्यांनी भुतवडा रोड येथील पाण्याच्या टाकीवर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता टाकीत शेवाळ साचल्याचे व पाणी दूषित अवस्थेत असल्याचे दिसून आल्याचा दावा करण्यात आला. स्वच्छ पाणीपुरवठा तातडीने सुरू न केल्यास तहसील कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडण्याचा इशारा युवा नेते शहाजी राळेभात यांनी दिला आहे. आज बुधवार (दि. 11मार्च) रोजी तपनेश्वर भागात नळाचे पाणी सुटले असता नळातून पिवळसर व दूषित पाणी येत असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. याबाबत नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांना माहिती दिल्यानंतर पदाधिकारी व नगरसेवकांनी भुतवडा रोड येथील पाण्याच्या टाकीवर जाऊन पाहणी केली. यावेळी टाकीमध्ये अस्वच्छता असून पाण्यात शेवाळ असल्याचे दिसून आल्याचा दावा करण्यात आला.

कर्मचारी अपुरे; तरी स्वच्छ पाण्यासाठी प्रयत्न सुरू
88 नगरपरिषद पाणीपुरवठा विभागाकडे
ग्रामपंचायत काळातील अपुरा कर्मचारी वर्ग आहे. तरीही नागरिकांना स्वच्छ पाणी देण्याचा प्रयत्न सुरू आहे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याऱ्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करून वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली जाईल व शहराला स्वच्छ पाणीपुरवठा करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येतील.
ज्ञानेश्वर मिसाळ, अभियंता, पाणीपुरवठा विभाग, जामखेड

Amravati News : पूर्णा नदी पात्रात पोकलेनचा ‘धुमाकूळ’, प्रशासनावर प्रश्नचिन्ह; रेतीचा बेकायदेशीर उपसा सुरुच

पाण्याच्या टाकीची झाली मोठी दुरवस्था
– यावेळी बोलताना शहाजी राळेभात म्हणाले की, “शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या टाकीची व इतर ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी केली असता टाकीची स्वच्छता अत्यंत निकृष्ट असल्याचे दिसून आले. पाण्यात शेवाळ आढळल्यामुळे हे पाणी नागरिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते, नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने स्वच्छ पाणीपुरवठा सुरू करावा, अन्यथा तहसील कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल.

टाकीची पाहणी करताना मान्यवरांची मोठी उपस्थिती
या पाहणीवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस राजेंद कोठारी, युवा नेते शहाजी राळेभात, संभाजी राळेभात, नगरसेवक राजेंद्र गोरे, प्रशांत राळेभात, माजिद कुरेशी, वसीम सय्यद, इस्माईलभाई सय्यद, संदिप गायकवाड, डॉ. कैलास हजारे, सागर सदाफुले, प्रवीण उगले, हरिभाऊ आजचे, सागर भोसले, सचिन शिंदे, दिपक घायतडक, दत्ता डिसले, स्वामी दिक्षित यांच्यासह नगरपरिषदेचे पाणीपुरवठा अभियंता ज्ञानेश्वर मिसाळ उपस्थित होते.

दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी यांनीही नगरपरिषदेच्या कारभारावर टीका करताना सांगितले की, -पिण्याच्या पाण्याच्या ठिकाणी आवश्यक रजिस्टर व नौदीही दिसून आल्या नाहीत. शहरातील जवळपास नव्वद टक्के नागरिक हेच पाणी पितात. त्यामुळे दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. नगरपरिषदेला स्वच्छ पाणी देता येत नसेल तर मुख्याधिका-यांनी बदली करून घ्यावी. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने लवकरच आंदोलन छेडण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

LPG cylinder shortage : घरगुती सिलिंडरच्याही तुटवड्याची शक्यता, दरवाढीचा अमरावतीला झटका; ५.९५ लाख ग्राहकांवर परिणाम

 

 

Web Title: Ahilyanagarplaying with the lives of citizens algae in drinking water tanks contaminated water supply in jamkhed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 12, 2026 | 03:49 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • Water supply

संबंधित बातम्या

नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर! गढूळ-दूषित पाण्यावरून संताप; राष्ट्रवादी अन् शिंदे शिवसेनेचा प्रशासनाला अल्टिमेटम
1

नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर! गढूळ-दूषित पाण्यावरून संताप; राष्ट्रवादी अन् शिंदे शिवसेनेचा प्रशासनाला अल्टिमेटम

Crime News: गणपती विसर्जनाला गालबोट ,मंडळ अध्यक्षाचा मृत्यू; विसर्जन मिरवणुकीत अचानक काय घडलं?
2

Crime News: गणपती विसर्जनाला गालबोट ,मंडळ अध्यक्षाचा मृत्यू; विसर्जन मिरवणुकीत अचानक काय घडलं?

Ahilyanagar News: भीषण दुष्काळामुळे गाव सोडण्याची वेळ! अहिल्यानगरच्या चापडगावात 1972 पेक्षाही भयावह परिस्थिती
3

Ahilyanagar News: भीषण दुष्काळामुळे गाव सोडण्याची वेळ! अहिल्यानगरच्या चापडगावात 1972 पेक्षाही भयावह परिस्थिती

Ahilyanagar News : १९७२ पेक्षाही भीषण दुष्काळ? चापडगावात पाण्यासाठी गावकऱ्यांवर स्थलांतराची वेळ
4

Ahilyanagar News : १९७२ पेक्षाही भीषण दुष्काळ? चापडगावात पाण्यासाठी गावकऱ्यांवर स्थलांतराची वेळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.