थायलंड-कंबोडियात पुन्हा संघर्षाची लाट! शांतताचर्चांदरम्यान सीमेवर थाई सैनिकांकडून सीमेवर जोरदार हवाई हल्ले (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
ट्रम्प पुन्हा फेल? Thailand Cambodia सीमेवर बारुदी खेळ!
कंबोडियाच्या संरक्षण मंत्रालयाने, थायलंडवर सीमेवर F-16 लढाऊ विमानांमधून ४० बॉम्ब डागल्याचा आरोप केला आहे. कंबोडियाच्या उत्तर-पश्चिम भागातील बांटेय मीनच्या प्रांतात एका गावाला लक्ष्य करण्यात आले आहे. सुदैवाने या हल्ल्यात कोणत्याही जीविताहीनीची घटना घडलेली नाही. परंतु वाढत्या तणावामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कंबोडियाने दिलेल्या माहितीनुसार, थालंडच्या हल्ल्यामुळे अनेक घरे, इमारती, आणि मालमत्तेचे नुकसान झाले आहे. दरम्यान थायलंडने या ताज्या हल्ल्याची पुष्टी करताना म्हटले की, ही कारवाई त्यांच्या संरक्षणासाठी करण्यात आली आहे. थाई लष्कराच्या मते, कंबोडियाच्या सीमेलगत केओ प्रांतात सुरक्षेसाठी सेना आणि वायुसेनने ही कारवाई केली आहे. दोन्ही देशांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून या भागावरुन तीव्र वाद सुरु आहे.
पाच महिन्यांपूर्वी झाली होती युद्धबंदी
दोन्ही देशात पाच महिन्यांपूर्वी मलेशिया आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या मध्यस्थीने युद्धबंदी लागू करण्यात आली होती, मात्र दोन्ही देशात ८ डिसेंबर रोजी पुन्हा एकदा संघर्षाला सुरुवात झाली आणि तणाव शिगेला पोहोचला. जुलैमध्ये थायलंड आणि कंबोडियात पाच दिवस तीव्र संघर्ष झाला होता. पण ट्रम्प आणि मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांनी मध्यस्थी करत द्विपक्षीय युद्धबंदी लागू केली होती. ट्रम्प यांच्या दबावामुळे ही युद्धबंदी लागू झाली खरी, पण फार काळ टिकली नाही. दोन्ही देशांनी ८ डिसेंबर रोजी पुन्हा एकमेकांवर हल्ले सुरु केले.
थायलंड आणि कंबोडियातील वाद काही नवीन नाही. दोन्ही देशात प्रेम विहार मंदिरावरुन हा वाद सुरु आहे. १९६२ मध्ये या मंदिराला कंबोडियाचा भाग घोषिक केले होते. परंतु या मंदिराचा काही भाग थायलंडच्या भूभागात असल्याने हे मंदिर थायलंडचे असल्याचा दावा केला जातो. तेव्हापासून दोन्ही देशांत राष्ट्रवाद आणि धार्मिक वादाला तोंड फुटवले आहे. २००८ , २०११, २०१५ मध्ये यावादवरुन तीव्र संघर्षा झाला होता. आता हा वाद पुन्हा एकदा सुरु झाला आहे.
Thailand Cambodia संघर्षामुळे दशलक्ष लोक घरे सोडून पळाली ; सीमेवर दोन दिवसांपासून गोळीबार सुरुच






