Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुख्यमंत्र्यांनी राज्याचे हित बघावे, ठाकरेंच्या आणि तुमच्या वादात जनतेला काही देणं-घेणं नाही, अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांना सुनावले

विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, तुमच्या मुलाच्या वयाच्या मुलांच्या मागे लागण्यापेक्षा ते सोडून राज्यातील प्रश्नावर लक्ष देणे गरजेचे आहे, असा सल्ला अजित पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लगावला आहे.

  • By Sunil Chavan
Updated On: Dec 30, 2022 | 05:45 PM
मुख्यमंत्र्यांनी राज्याचे हित बघावे, ठाकरेंच्या आणि तुमच्या वादात जनतेला काही देणं-घेणं नाही, अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांना सुनावले
Follow Us
Follow Us:

मुंबई – मुख्यमंत्र्यांनी राज्याचे हित बघावे, ठाकरेंच्या आणि तुमच्या वादात राज्यातील जनतेला आणि मला काही देणं-घेणं नाही, एकनाथ शिंदेंनी छोट्या गोष्टीत रमू नये, असा असा टोला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी लगावला आहे.

एकनाथ शिंदे हे नेहमी प्रमाणे जुन्या गोष्टीमध्ये रमले असा टोला अजित पवारांनी सभागृहात बोलताना मुख्यमंत्र्यांना लगावला आहे. तर राज्यातील बेरोजगारी, शेतकऱ्यांचा समस्या याकडे लक्ष घालावे, आणि विरोधकांवर टीका करण्यासाठी आमच्याकडून घेतलेल्या दीपक केसरकरांना वेळ द्या, ते योग्य गोष्टी हेरून टीका करतात असा टोलाही अजित पवारांनी लगावला आहे. यावेळी मध्ये बोलण्याचा प्रयत्न करणाऱ्या गोगावले यांना उद्देशून अजित पवार म्हणाले की, जास्त बोलू नका तुम्हाला मंत्रिपदाला अडचण येईल असा उपहासात्मक टोला पवारांनी लगावला.

विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, तुमच्या मुलाच्या वयाच्या मुलांच्या मागे लागण्यापेक्षा ते सोडून राज्यातील प्रश्नावर लक्ष देणे गरजेचे आहे, असा सल्ला अजित पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लगावला आहे.तर मुख्यमंत्र्यांचे पंतप्रधान, गृहमंत्री यांच्यासोबत चांगल्या संबंधातून महाराष्ट्रासाठी काय मिळणार असा सवालही अजित पवार यांनी उपस्थित करत एकनाथ शिंदेंच्या भाषणावरुन टोला लगावला आहे. राज्यातील 13 कोटी जनतेचे पालक आहात असे वागावे म्हणत एकनाथ शिंदेंचे कान टोचले आहेत.

पुढे बोलताना विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, महापुरुषांच्या अपमान केल्याचा निषेध व्हायला हवाच. सत्ताधारी असो की विरोधी पक्षातील सर्वांवर कारवाई झाली पाहिजे, असे अजित पवारांनी म्हटले आहे. 6 महिन्यांपूर्वी काय झाले हे सर्वांना माहिती आहे. झाले गेले ते सर्व सोडून कामाला लागा, जुने उकरुन काढू नका, त्यांचा काहीच फायदा होणार नाही असेही म्हणताना अजित पवार यांनी नव्या वर्षांत एकनाथ शिंदेंनी राज्यातील समास्यावर लक्ष द्यावे असेही म्हटले आहे.

Web Title: Ajit pawar on eknath shinde

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 30, 2022 | 05:45 PM

Topics:  

  • ajit pawar
  • BJP
  • Eknath Shinde
  • Nagpur Winter session
  • Nationalist Congress Party
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

NCP President Appointment:सुनील तटकरेंचे प्रदेशाध्यक्षपद धोक्यात; उच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला महत्त्वाचे निर्देश
1

NCP President Appointment:सुनील तटकरेंचे प्रदेशाध्यक्षपद धोक्यात; उच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला महत्त्वाचे निर्देश

‘मुंबई इन मिनिट्स’! ५९ मिनिटांचा प्रवास, ३५ लाख घरे अन् नव्या रोजगार केंद्रांचा आराखडा; उपमुख्यमंत्र्यांनी मांडली रूपरेषा
2

‘मुंबई इन मिनिट्स’! ५९ मिनिटांचा प्रवास, ३५ लाख घरे अन् नव्या रोजगार केंद्रांचा आराखडा; उपमुख्यमंत्र्यांनी मांडली रूपरेषा

Beed Crime News: जुन्या वादातून परळीत भाजप नेत्याच्या पुतण्यावर प्राणघातक हल्ला; सात जणांवर गुन्हा
3

Beed Crime News: जुन्या वादातून परळीत भाजप नेत्याच्या पुतण्यावर प्राणघातक हल्ला; सात जणांवर गुन्हा

चाकण नगरपरिषदेत वादंग; साहित्य खरेदी आणि निधी वापरावरून विरोधक आक्रमक
4

चाकण नगरपरिषदेत वादंग; साहित्य खरेदी आणि निधी वापरावरून विरोधक आक्रमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.