Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ajit Pawar Plane Crash: शरद पवारांकडून घेतले राजकारणाचे धडे: अजित पवार कसे झाले महाराष्ट्राचे ‘दादा’

१९८० च्या दशकात त्यांचे काका शरद यांच्या मार्गदर्शनाखाली राजकारणात प्रवेश केला. १९९१ मध्ये बारामती लोकसभा मतदारसंघ जिंकून त्यांना पहिले निवडणूक यश मिळाले.

  • By anuradha sagar
Updated On: Jan 28, 2026 | 01:00 PM
Ajit pawar Plane crash News Update Ajit Pawar death News

Ajit pawar Plane crash News Update Ajit Pawar death News

Follow Us
Follow Us:

 Ajit Pawar Plane Crash: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (एनसीपी) नेते अजित पवार यांचे बारामती येथे विमान अपघातात निधन झाले. ते बारामती येथे जिल्हा परिषद निवडणुकीसाठी प्रचार करत होते. आज सकाळी  ८:४५ वाजण्याच्या सुमरास बारामतीत विमान लँडिंग करताना त्यांच्या विमानाच अपघात झाला. हा अपघात इतका भयानक होता, की विमानातील सर्व सहा जणांचा मृत्यू झाला.  महाराष्ट्राच्या राजकारणात अजित पवार यांचा एक वेगळाच दरारा होता. महाराष्ट्राच्या राजकारणाचे ‘दादा’ अशी ओळख त्यांनी तयार केली होती.

Ajit Pawar Death : काका-पुतणा-बहीण-पत्नीही आहे राजकारणात… किती मोठं आहे अजित पवारांचं कुटुंब?

अजित यांचा जन्म २२ जुलै १९५९ रोजी महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात झाला. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांचे मोठे भाऊ अनंतराव पवार यांचे पुत्र होते. त्यांचे वडील राजकमल स्टुडिओमध्ये काम करत होते. महाराष्ट्राच्या राजकारणातले चाणक्य  अशी ओळख असलेले ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडून अजित पवार यांनी राजकारणाचे धडे गिरवले. शरद पवार यांच्याकडून त्यांनी राजकारणाची मूलतत्त्वे शिकली. गेल्या चार दशकांहून अधिक काळापासून अजित पवार महाराष्ट्राच्या राजकारणातले एक प्रमुख व्यक्ती होते.  अजित पवारांनी आठ वेळी उपमुख्यमंत्री पद भुषवले. विविध सरकारांमध्ये मंत्री म्हणून काम केले.

१९८० च्या दशकात राजकारणात प्रवेश

१९८० च्या दशकात त्यांचे काका शरद यांच्या मार्गदर्शनाखाली राजकारणात प्रवेश केला. १९९१ मध्ये बारामती लोकसभा मतदारसंघ जिंकून त्यांना पहिले निवडणूक यश मिळाले. त्यानंतर त्यांनी काकांची जागा भरण्यासाठी लवकरच पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर शरद यांनी पोटनिवडणूक जिंकली. तत्कालीन केंद्रातील पी.व्ही. नरसिंह राव यांच्या सरकारमध्ये ते संरक्षण मंत्री झाले.पण त्याचवेळी ते महाराष्ट्राच्या राजकारणात  हसतमुख चेहरा, कामाच्या शिस्तीमुळे आणि त्यांच्या बेधडक वक्तव्यामुळे अजित पवारांनी काही काळातच महाराष्ट्राच्या राजकारणावर आपली पकड मजबूत केली. बारामतीचे दादा महाराष्ट्राचे दादा म्हणून ओळखले जाऊ लागले.

Ajit Pawar Plane Crash: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली ‘बारामती’ कशी बनली विकासाचे मॉडेल

राजकीय प्रवास

१९९५ मध्ये अजित पवार पुणे जिल्ह्यातील बारामती विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदाच आमदार झाले. तेव्हापासून ते या मतदारसंघातून सतत आमदार म्हणून निवडून येत आहेत. १९९५, १९९९, २००४, २००९, २०१४, २०१९ आणि २०२४ मध्ये ते विजयी झाले आहेत. त्यांनी केवळ राजकीय जीवनात स्वतःला स्थापित केले नाही तर स्वतःचा प्रभावही निर्माण केला आहे.

शरद पवार दिल्लीहून  बारामतीकडे रवाना

विमान अपघातात शरद पवार यांच्या निधनाची बातमी कळताच त्यांचे काका शरद पवार दिल्लीहून बारामतीला रवाना झाले. सुप्रिया सुळे त्यांच्यासोबत सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्यासह होत्या. देशभरातील राजकारणी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त करत आहेत. त्यांच्या निधनाने बारामतीतील लोकांना खूप दुःख झाले आहे. घटनास्थळी मोठा जमाव जमला आहे.

Web Title: Ajit pawar plane crash having learned politics from sharad pawar how did ajit pawar become the dada big boss of maharashtra politics

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 28, 2026 | 11:55 AM

Topics:  

  • ajit pawar
  • Baramati Politics
  • Maharashtra Politics

संबंधित बातम्या

Maharashtra Today’s Live breaking News in Marathi: लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप, तर २३ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
1

Maharashtra Today’s Live breaking News in Marathi: लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप, तर २३ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

Ladki Bahin Yojana August installment: लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट! ऑगस्टच्या हप्त्यासाठी ३३९ कोटींचा निधी मंजूर
2

Ladki Bahin Yojana August installment: लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट! ऑगस्टच्या हप्त्यासाठी ३३९ कोटींचा निधी मंजूर

Maharashtra Politics: ‘महेंद्र थोरवे तिसऱ्यांदा आमदार होणार’; भरत गोगावलेंचा 2029 च्या निवडणुकीबाबत दावा
3

Maharashtra Politics: ‘महेंद्र थोरवे तिसऱ्यांदा आमदार होणार’; भरत गोगावलेंचा 2029 च्या निवडणुकीबाबत दावा

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन
4

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.