Ajit_Pawar_1675485164
बारामतीमध्ये (Baramati) आगामी लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरु आहे. यंदाच्या निवडणुकीत बारामतीमध्ये सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) विरुद्ध सुप्रिया सुळे (Supriya Sule) अशी लढत आपल्या पाहायला मिळणार आहे. त्यामुळे बारामतीमध्ये नेमकं कोण जिकून येणार हे पाहणं देखील तितकेच महत्वाचे ठरणार आहे. अशातच अजित पवार पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. निवडणुकीच्या रींगणात सुनेत्रा पवार उतरल्याने अजित पवार त्यांचा प्रचार करत आहेत. अनेक ठिकाणी प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रचार सभेत अजित पवार म्हणाले,..
अजित पवार या प्रचार सभेत म्हणाले, मित्रांनो ही भावकी गावकीची निवडणूक नाही. ही निवडणूक देशाचे भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे.एवढा मोठा आपला देश सगळीकडे पसरला आहे. १३५ ते १४० कोटी जनता अठरा पगड जाती इथे राहतात. देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षापेक्षा जास्त काळ लोटलाय, तरी अजून काही भाग मुलभूत सुविधांपासून वंचित आहे, असे अजित पवार म्हणाले. मलाही तुमच्या पाठिंब्याची गरज आहे, मलाही तुमच्या पवित्र मतांची गरज आहे. बारामतीमध्ये ७ लाख मतदार आहेत.बारामतीमध्ये ७ तारखेला मतदान होणार असून तीन मशीन असतील, पहिल्या मशीनमध्ये २ नंबरला सुनेत्रा पवारांच नाव, शेजारी घड्याळ चिन्ह असेल ते बटण दाबा, असे आव्हान अजित पवारांनी जनतेला केलं आहे.
आगामी लोकसभा निवडणूक ही भवितव्य ठरवणारी निवडणूक
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले,खंडाळा तालुका हा दुष्काळी तालुका आहे. पुणे वेल्हे-भोर जवळ असूनसुद्धा इथे एमआयडीसी कारखाने नाहीत. खंडाळ्यामध्ये धरण झाल्याने तिथल्या जमिनी ओल्या झाल्या. अनेकांना रोजगार उपलब्ध झाले, असे अजित पवार म्हणाले. २०१९ मध्ये पुन्हा मत मागायला येणार नाही असे म्हणत पुन्हा मत मागायला येणार नाही. तुम्ही त्यांना पुन्हा निवडणून दिल. पुढची निवडणूक ही भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे. मग अजित पवार तुम्ही काय केलं? मी बारामतीमध्ये अनेक कामे केली आहे, असे अजित पवार म्हणाले.
मी कामासाठी कठोर आहे
मला विकास काम करायचा अनुभव आहे. मी रात्री १ वाजता झोपलो तरी सकाळी ६ वाजता उठून काम करतो. मुंबई, पुणे, बारामती जिथे कुठे असेन, तिथे पाचला उठून सहाला कामाला लागतो. कामाची, लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी, त्यांचा विकास करण्याची आवड आहे. राज्याचे भले करण्याचा हा प्रयत्न असल्याचे अजित पवारांनी सांगितले. मी शब्दाचा पक्का आहे.सहजासहजी मी शब्द देत नाहीत. शब्द दिला, तर कोणाच्या बापाच ऐकत नाही, तो पूर्ण करतो. मी कामासाठी कठोर आहे. जी कामाची माणस आहेत, त्यांना आपलस करण्याचा सुद्धा प्रयत्न करतो, असे अजित पवार म्हणाले.