Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राष्ट्रवादीच्या पुणे जिल्हा परिषद गटनेतेपदी ‘या’ सदस्याची निवड; आमदार सुनील शेळके यांनी केली घोषणा

पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटनेतेपदी बावडा-लाखेवाडी गटातून निवडून आलेले सदस्य श्रीमंत ढाले यांची निवड करण्यात आली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 07, 2026 | 01:09 PM
राष्ट्रवादीच्या पुणे जिल्हा परिषद गटनेतेपदी 'या' सदस्याची निवड; आमदार सुनील शेळके यांनी केली घोषणा

राष्ट्रवादीच्या पुणे जिल्हा परिषद गटनेतेपदी 'या' सदस्याची निवड; आमदार सुनील शेळके यांनी केली घोषणा

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटनेतेपदी बावडा-लाखेवाडी गटातून निवडून आलेले सदस्य श्रीमंत ढाले यांची निवड करण्यात आली आहे. आमदार सुनील शेळके यांनी ही घोषणा केली. याबाबतची बैठक पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात पार पडली आहे. बैठकीत जिल्हा आगामी कामकाज तसेच स्थानिक पातळीवरील विकासकामांना गती देण्यासाठी पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी आमदार सुनील शेळके यांनी श्रीमंत ढाले यांच्यावर गटनेतेपदाची जबाबदारी सोपविण्यात आल्याचे जाहीर केले.

 

गटनेतेपदी निवड झाल्यानंतर श्रीमंत ढाले यांनी पक्ष नेतृत्वाचे आभार मानत, जिल्हा परिषदेमध्ये पक्षाची भूमिका प्रभावीपणे मांडण्याचा तसेच सर्व सदस्यांना सोबत घेऊन मतदारसंघातील विकासकामांना प्राधान्य देण्याचा निर्धार व्यक्त केला. या बैठकीस दिगंबर दुर्गाडे, सुरेश घुले, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संभाजी नाना होळकर यांच्यासह पक्षाचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

हे सुद्धा वाचा : अर्थसंकल्पातून पिंपरी- चिंचवडच्या प्रगतीचा मार्ग मोकळा; आमदार गोरखे यांनी सरकारचे मानले आभार

अध्यक्षपदाबाबत राष्ट्रवादीत हालचालींना वेग!

राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या अध्यक्ष-सभापती निवडीचा मार्ग मोकळा झाल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. राज्य शासनाने अधिकृत कार्यक्रम जाहीर केल्याने सर्वच पक्षांकडून अंतर्गत बैठका आणि रणनीती आखण्यास सुरुवात झाली आहे. पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षची एकहाती सत्ता असल्याने अध्यक्षपदाची माळ कोणत्या तालुक्याच्या गळ्यात पडणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. जिल्ह्यातील अनेक पंचायत समित्यांवरही राष्ट्रवादीचे वर्चस्व असल्याने सभापती पदांच्या निवडीबाबतही कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसाखाली उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत पुण्यात बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र, मुंबईतील महत्त्वाच्या कार्यक्रमासाठी त्यांना तातडीने रवाना व्हावे लागल्याने त्या बैठकीस उपस्थित राहू शकल्या नाहीत. त्यांच्या अनुपस्थितीत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. गटनेता निवडला म्हणजे तोच जिल्हा परिषद अध्यक्ष असेल, असे बंधन नसल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले. गटनेता निश्चित झाल्यानंतर अध्यक्षपदासाठी अन्य नावाचाही विचार होऊ शकतो. अंतिम निर्णय पक्ष नेतृत्वाकडून घेतला जाईल, असे स्पष्ट करण्यात आले. जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीचे सर्वाधिकार राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्याकडे देण्याचा ठरावही एकमताने मंजूर करण्यात आला.

Web Title: Shrimant dhale has been elected as the group leader of the nationalist congress party in the pune zilla parishad

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 07, 2026 | 01:09 PM

Topics:  

  • Ajit Pawar NCP
  • Sunetra Pawar
  • Sunil Shelke

संबंधित बातम्या

बारामतीत मतदान घटले, बालेकिल्ल्यात गटबाजीचा फटका, राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना आत्मचिंतनाची गरज
1

बारामतीत मतदान घटले, बालेकिल्ल्यात गटबाजीचा फटका, राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना आत्मचिंतनाची गरज

Baramati Bypoll Election 2026: बारामती पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला! ५८.१७ टक्के मतदानामुळे बदलणार राजकीय गणिते?
2

Baramati Bypoll Election 2026: बारामती पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला! ५८.१७ टक्के मतदानामुळे बदलणार राजकीय गणिते?

सुनेत्रा पवारांचा ‘मास्टरस्ट्रोक’; पक्षातील जबाबदाऱ्यांची विभागणी, पार्थ यांच्याकडे मुंबई-दिल्ली तर…
3

सुनेत्रा पवारांचा ‘मास्टरस्ट्रोक’; पक्षातील जबाबदाऱ्यांची विभागणी, पार्थ यांच्याकडे मुंबई-दिल्ली तर…

Baramati Assembly bypoll Elections 2026: बारामतीत ३५ वर्षांनंतर पुन्हा पोटनिवडणूक! १९९१ मध्ये अजित पवारांनी रचला होता इतिहास
4

Baramati Assembly bypoll Elections 2026: बारामतीत ३५ वर्षांनंतर पुन्हा पोटनिवडणूक! १९९१ मध्ये अजित पवारांनी रचला होता इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.