Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अकोला जिल्ह्यात शालेय पोषण आहार योजना वर्षभर बंद असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस

महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच्या योजना बंद करून जनतेचा विकास खुंटवण्याचं काम करत असून हे स्थगिती सरकार असल्याची टीका दानवे यांनी केली. मंत्री अब्दुल सत्तार ही विकृती असून कुठे जातील तिथे तसेच वागणार अशी प्रतिक्रिया दानवे यांनी शिंदे गटाच्या बैठकीत झालेल्या सत्तार यांच्या वादावर केली.

  • By Sunil Chavan
Updated On: Oct 10, 2022 | 03:44 PM
अकोला जिल्ह्यात शालेय पोषण आहार योजना वर्षभर बंद असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस
Follow Us
Close
Follow Us:

अकोला- गेल्या वर्षभरापासून अकोला जिल्ह्यात शालेय पोषण आहार योजना बंद असल्याची धक्कादायक माहिती अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत समोर आली आहे. एकप्रकारे या योजनेकडे जिल्हा प्रशासन व संबंधित अधिकारी यांचं दुर्लक्ष झाल्याचा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी करत याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

आज अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना विरोधी पक्षनेते दानवे यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या, अतिवृष्टी, पीक विमा मदत, शेतकऱ्यांना स्वस्त धान्य राशन योजना, कुपोषित बालक व शालेय पोषण आहार तसेच जिल्ह्यातील समस्यांबाबत दानवे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली.

लहान मुलांच्या हक्काची असलेल्या या योजनेचा लाभ विद्यार्थ्यांना न देऊन एकप्रकारे त्यांच्या भवितव्य व भविष्याशी खेळ करत आहात असे म्हणत दानवे यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. या प्रकारवरुन अधिकाऱ्यांची असंवेदनशीलता दिसून येत असल्याचे दानवे म्हणाले. यामुळे विद्यार्थ्यांचे शालेय गळतीचे प्रमाण वाढेल अशी भीतीही दानवे यांनी व्यक्त केली. राज्यात कोणाची सत्ता असली तरी कुपोषण हा विषय कायम आहे. प्रगतशील महाराष्ट्रात भुकेने मृत्यू होणे ही दुर्देवी गोष्ट असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. याविरोधात आवाज उठवून हा प्रश्न मांडणार असल्याचं ते म्हणाले.

शिंदे फडणवीस सरकार हे धनदांडग्यांचे सरकार
शेतकऱ्यांना मदतीसाठी कोट्यवधी रुपयांच्या मदतीची घोषणा सरकार करते, मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यात एक रुपयाही मदत पोहचत नाही. शिंदे फडणवीस सरकार हे धनदांडग्याचे सरकार व गुजरातला मदत करणारे सरकार असल्याचा आरोप दानवे यांनी केला.

महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच्या योजना बंद करून जनतेचा विकास खुंटवण्याचं काम करत असून हे स्थगिती सरकार असल्याची टीका दानवे यांनी केली. मंत्री अब्दुल सत्तार ही विकृती असून कुठे जातील तिथे तसेच वागणार अशी प्रतिक्रिया दानवे यांनी शिंदे गटाच्या बैठकीत झालेल्या सत्तार यांच्या वादावर केली.

यावेळी जिल्हाधिकारी निमा अरोरा, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, आमदार व जिल्हाप्रमुख प्रमुख नितीन देशमुख, आमदार अमोल मिटकरी, तहसिलदार सुनिल पाटील, अकोला ग्रामीणचे जिल्हाप्रमुख गोपाल दातकर, युवासेना उप जिल्हाधिकारी राहुल कराळे, एसटी कामगार सेनेचे कार्याध्यक्ष विजय मालोकर, शहरप्रमुख राजेशकुमार मिश्रा, अतुल पोहणेकर तसेच सर्व संबंधित विभागाचे मुख्य अधिकारी व शिवसेनेचे पुरुष व महिला पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: A shocking revelation that the school nutrition scheme has been closed for the whole year in akola district

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 10, 2022 | 03:44 PM

Topics:  

  • Akola District
  • Marathi News

संबंधित बातम्या

ठाण्यात नोकरी देण्याच्या नावाखाली तरुणांची फसवणूक, आमदार संजय केळकरांकडे तक्रार अन् पुढे…
1

ठाण्यात नोकरी देण्याच्या नावाखाली तरुणांची फसवणूक, आमदार संजय केळकरांकडे तक्रार अन् पुढे…

Raigad News : सरकारने GR काढून जरांगे व ओबीसींची फसवणूक केली – सुरेश मगर
2

Raigad News : सरकारने GR काढून जरांगे व ओबीसींची फसवणूक केली – सुरेश मगर

Thane News : ठाण्यात ५ वर्षांत ५ हजारांहून अधिक बालकांवर मोफत शस्त्रक्रिया
3

Thane News : ठाण्यात ५ वर्षांत ५ हजारांहून अधिक बालकांवर मोफत शस्त्रक्रिया

Buldhana News : किमान वेतन मिळण्यासाठी मंत्रालयात मुख्यमंत्र्यांची घेणार भेट
4

Buldhana News : किमान वेतन मिळण्यासाठी मंत्रालयात मुख्यमंत्र्यांची घेणार भेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.