Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

N Chandrasekaran Resigns : टाटा समूहात मोठी खळबळ! एन. चंद्रशेखरन यांचा Tata Sons च्या अध्यक्षपदाचा दिला राजीनामा; नेमकं कारण काय?

N Chandrasekaran Resigns : भारतीय उद्योग जगतातून एक मोठी बातमी समोर आली आहे. टाटा संसचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एन. चंद्रशेखरन फेब्रुवारी २०२७ पर्यंत आपल्या पदावर कायम राहतील.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Aug 12, 2026 | 11:55 AM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • भारतीय उद्योग जगतातून मोठी बातमी
  • टाटा समूहात मोठी खळबळ!
  • एन. चंद्रशेखरन यांचा अध्यक्षपदाचा राजीनामा
N Chandrasekaran Resigns : भारतीय उद्योग जगतातून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. टाटा समूहाची होल्डिंग कंपनी असलेल्या Tata Sons चे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी आपल्या पदाचा राजीनामा ( N Chandrasekaran Resigns ) दिला आहे. मात्र, ते फेब्रुवारी २०२७ पर्यंत आपल्या पदावर कायम राहतील. अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. चंद्रशेखरन यांचा हा निर्णय १८ ऑगस्ट रोजी होणाऱ्या टाटा सन्सच्या वार्षिक सर्वसाधारण सभे AGM च्या अगदी आधी आला आहे. नेमकं काय आहे त्यामागचं कारण?

FSSAI Action On Pan Masala : पान मसाला खाणाऱ्यांना मोठा झटका! FSSAI कडून ‘या’ गोष्टीवर बंदी; नियमांचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई

चंद्रशेखरन २०१७ मध्ये टाटा सन्सचे अध्यक्ष झाले. टाटा परिवाराबाहेरील ते समूहाचे नेतृत्व करणारे पहिले व्यावसायिक व्यवस्थापक होते. त्यांच्या कार्यकाळात टाटा समूहाचा महसूल दुप्पटीहून अधिक वाढला, परंतु अलीकडच्या काळात, नवीन व्यवसायांमधील त्यांच्या मोठ्या गुंतवणुकीवरून आणि त्यांच्या कामगिरीवरून टाटा ट्रस्ट्ससोबतचे मतभेद अधिकच वाढले होते. त्याच्यातील आणि नोएल टाटा यांच्यासोबतचे झालेले मतभेद यासगळ्या मागचं कारणं मानलं जात आहे. त्यात टाटा ट्रस्टमधील अंतर्गत ओढाताण यामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती समोर येत आहे.

नोएल टाटा यांचा विरोध आणि AGM मधील वोटिंग सस्पेंसमध्ये निर्णय

सूत्रांनुसार, १८ ऑगस्टच्या बैठकीबाबतची अनिश्चितता आणि त्यात होणाऱ्या संभाव्य मतदानाच्या पार्श्वभूमीवर चंद्रशेखरन यांनी हे पाऊल उचलले आहे. टाटा सन्समध्ये सुमारे ६६% हिस्सा असलेल्या टाटा ट्रस्ट्सचे अध्यक्ष नोएल टाटा यांचा चंद्रशेखरन यांच्या कार्यकाळवाढीला विरोध होता, असे मानलं जात होतं.
फेब्रुवारी २०२४ मध्ये, संचालक मंडळाने चंद्रशेखरन यांना आणखी पाच वर्षांसाठी शिफारस केली होती, पण नंतर नोएल टाटा यांनी नवीन व्यवसायांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर आणि चंद्रशेखरन यांनी केवळ दोन वर्षेच काम करावे, असे समर्थन केलं गेलं.

चॅरिटी कमिश्नरच्या बंदीमुळे फसला AGM च्या वोटिंगचा पेच ?

महाराष्ट्र धर्मादाय आयुक्तांनी चौकशी प्रलंबित असेपर्यंत टाटा सन्सचे मुख्य भागधारक असलेल्या सर रतन टाटा ट्रस्टच्या महत्त्वाच्या निर्णयांना स्थगिती दिली आहे. टाटा सन्सच्या नियमावलीनुसार, केवळ सर रतन टाटा ट्रस्ट आणि सर दोराबजी टाटा ट्रस्ट यांनी संयुक्तपणे नामनिर्देशित केलेले विश्वस्तच वार्षिक सर्वसाधारण सभेत मतदान करू शकतात.
नोएल टाटा, डॅरियस खंबाटा आणि जहांगीर जहांगीर यांच्यासह काही विश्वस्तांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत उपस्थित राहण्याची परवानगी मागितली होती, तर विजय सिंग आणि वेणू श्रीनिवासन यांनी अर्जावर स्वाक्षरी केली नाही. मतदानाचा वाद आणि कटुता टाळण्यासाठी चंद्रशेखरन यांनी मुदतपूर्व पायउतार होण्याचा निर्णय घेतला असल्याचं म्हटलं जातं आहे.

रतन टाटांच्या निधनानंतर ट्रस्टमध्ये बरेच मतभेद

दिवंगत रतन टाटा यांच्या निधनानंतर, टाटा समूहातील अंतर्गत मतभेद समोर येऊ लागले आहे. अनेक विश्वस्तांनी राजीनामे दिले आणि वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांनी विश्वस्तांना सल्ला दिला की, त्यांच्यातील मतभेदांचा समूहाच्या कंपन्यांच्या कामकाजावर परिणाम होणार नाही याची खात्री करावी. अनेक अधिकारी आणि कार्यकारी अधिकाऱ्यांनी चिंता व्यक्त केली की, या संघर्षामुळे समूहाचे महत्त्वाचे निर्णय घेण्यास विलंब होत आहे. या सगळ्याचा परिणाम सध्याच्या या परिस्थितीवर दिसून येत आहे. पुढे या प्रकरणावर नेमकं काय घडतं पहावं लागेल.

Hybrid Home Loan : होम लोनचा हप्ता वाढण्याची भीती? हायब्रिड होम लोनचा पर्याय ठरेल फायदेशीर; वाचतील लाखो रुपये

Web Title: N chandrasekaran resigns as tata sons chairman tata trust conflict marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 12, 2026 | 11:40 AM

Topics:  

  • Business News
  • Marathi News
  • N Chandrasekaran
  • Noel Tata
  • Tata
  • Tata Group

संबंधित बातम्या

Malaysia-Rohingya : UNच्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष; 1,500 म्यानमार नागरिकांची घरवापसी सुरू
1

Malaysia-Rohingya : UNच्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष; 1,500 म्यानमार नागरिकांची घरवापसी सुरू

World News :आता तरी युद्ध थांबेल का ? इराणचा पुन्हा अमेरिकेला कतार मार्फत शांततेचा प्रस्ताव
2

World News :आता तरी युद्ध थांबेल का ? इराणचा पुन्हा अमेरिकेला कतार मार्फत शांततेचा प्रस्ताव

Diabetic Retinopathy: दिसतंय म्हणून डोळे निरोगी आहेत असं समजू नका! रेटिनाच्या आजाराचा धोका ओळखा
3

Diabetic Retinopathy: दिसतंय म्हणून डोळे निरोगी आहेत असं समजू नका! रेटिनाच्या आजाराचा धोका ओळखा

US-Pakistan Relations : दहशतवादाबाबत सहानुभूती खपवून घेतली जाणार नाही; जयशंकरांचे अमेरिका-पाक संबंधांवर स्पष्ट भाष्य
4

US-Pakistan Relations : दहशतवादाबाबत सहानुभूती खपवून घेतली जाणार नाही; जयशंकरांचे अमेरिका-पाक संबंधांवर स्पष्ट भाष्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.