Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वीज केंद्राचे काम रखडल्याने शेतकरी त्रस्त; वर्षभरापासून काम थंड, पिके वाचवण्याचे शेतकऱ्यांसमोर आव्हान

संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन बांधकामाच्या दर्जाची पाहणी करावी आणि कंत्राटदाराला सूचना देऊन उर्वरित काम तातडीने पूर्ण करून प्यावे, अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थांकडून होत आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 16, 2026 | 01:39 PM
वीज केंद्राचे काम रखडल्याने शेतकरी त्रस्त; वर्षभरापासून काम थंड, पिके वाचवण्याचे शेतकऱ्यांसमोर आव्हान

वीज केंद्राचे काम रखडल्याने शेतकरी त्रस्त; वर्षभरापासून काम थंड, पिके वाचवण्याचे शेतकऱ्यांसमोर आव्हान

Follow Us
Follow Us:

अकोला : बार्शी टाकळी तालुक्यातील पिंजरनजीकच्या मौजे जमकेश्वर येथे महावितरणच्या वतीने उभारण्यात येत असलेल्या ३३/११ केव्ही वीज उपकेंद्राचे काम वर्षभरापासून संथगतीने सुरू असून, अद्यापही अपूर्ण आहे. कंत्राटदाराने सप्टेंबरअखेर काम पूर्ण करण्याचे नियोजन केले होते. मात्र, निर्धारित कालावधी संपत आला तरी काम पूर्ण न झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

हे उपकेंद्र कार्यान्वित झाल्यानंतर जमकेश्वर, धाकली, सावरखेड, टिटवा, निहीदा, बहिरखेड, उमरदरी व पिंपळगाव हांडे या गावांना सुरळीत वीजपुरवठा मिळण्यास मदत होणार असून, कृषिपंपांचा प्रश्नही मार्गी लागण्याची अपेक्षा आहे. सध्या पावसाने ओढ दिल्याने पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना नियमित वीजपुरवठ्याची नितांत गरज आहे. मात्र, वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा आणि सततच्या तांत्रिक बिघाडांमुळे शेतीचे नुकसान होत असून शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.

NPCI New UPI Rules : पेट्रोल पासून रेल्वे तिकीटांपर्यंत! कोणत्या UPI व्यवहारावर द्यावे लागणार अतिरिक्त शुल्क

सबस्टेशनचे काम रखडल्याने परिसरातील गावांमध्ये विजेची समस्या भेडसावत आहे. उपकेंद्र लवकर कार्यान्वित झाल्यास कृषिपंपांचा मोठा प्रश्न सुटण्यास मदत होईल. त्यामुळे प्रशासनाने काम गतीने पूर्ण करून घ्यावे, अशी मागणी माजी सरपंच प्रदीप देशमुख यांनी केली.

दरम्यान, सप्टेंबरअखेर काम पूर्ण होणे अपेक्षित होते; मात्र ते अद्याप अर्धवट आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कामाची प्रत्यक्ष पाहणी करून प्रकल्प लवकरात लवकर पूर्णत्वास न्यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विजय ठाकरे यांनीही केली.

जुन्या यंत्रणेवर वीज वितरणाचा भार

उपकेंद्राचे काम रखडल्याने परिसरातील वीज वितरणाचा भार जुन्या यंत्रणेवर पडत आहे. त्यामुळे वारंवार रोहित्र जळण्याच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन बांधकामाच्या दर्जाची पाहणी करावी आणि कंत्राटदाराला सूचना देऊन उर्वरित काम तातडीने पूर्ण करून प्यावे, अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थांकडून होत आहे.

Repo Rate च्या निर्णयापूर्वी RBI चा मोठा मास्टरस्ट्रोक! बँकांकडून 3.93 लाख कोटी रुपये परत घेतले; तुमच्या खिशावर काय होणार परिणाम?

Web Title: Farmers distressed as power plant work stalls

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 16, 2026 | 01:39 PM

Topics:  

  • akola news
  • Electricity Issue
  • Farmers Issue

संबंधित बातम्या

Power Crisis In India : देशात अंधाराचे सावट? वीज प्रकल्पांकडे उरला अवघा काही दिवसांचा कोळसा; केंद्राची चिंता वाढली
1

Power Crisis In India : देशात अंधाराचे सावट? वीज प्रकल्पांकडे उरला अवघा काही दिवसांचा कोळसा; केंद्राची चिंता वाढली

बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांसमोरील आव्हाने वाढली; खरीप कांदा लागवडीचा अभिनव प्रयोग
2

बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांसमोरील आव्हाने वाढली; खरीप कांदा लागवडीचा अभिनव प्रयोग

अकोला जिल्ह्यातील 329 शाळांमध्ये शिक्षिकाच नाही; महाराष्ट्र राज्य बाल संरक्षण आयोगाकडून गंभीर दखल
3

अकोला जिल्ह्यातील 329 शाळांमध्ये शिक्षिकाच नाही; महाराष्ट्र राज्य बाल संरक्षण आयोगाकडून गंभीर दखल

अकोला तालुक्यात सर्वाधिक शेतकऱ्यांची आत्महत्या; केवळ 48 कुटुंबाला मिळणार शासनाची मदत
4

अकोला तालुक्यात सर्वाधिक शेतकऱ्यांची आत्महत्या; केवळ 48 कुटुंबाला मिळणार शासनाची मदत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.