बदलापूर एन्काऊंटर प्रकरणातील हायकोर्टाच्या अहवालावर अक्षय शिंदेच्या आईची प्रतिक्रिया (फोटो- टीम नवराष्ट्र)
बदलापूर: बदलापूर येथील शाळेत दोन मुलींवर अत्याचार केल्याची घटना घडली होती. या प्रकारानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. बदलापूर रेल्वे स्थानकावर नागरिकांनी निदर्शने केली होती. या अत्याचार प्रकरणात अक्षय शिंदे या आरोपीला अटक करण्यात आली होती. या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर करण्यात आला होता. मुंबई उच्च न्यायालयाने अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणात मोठा निर्णय दिला आहे. या प्रकरणात पाच पोलिस अधिकाऱ्यांना दोषी ठरवत त्यांच्या विरोधात कारवाईचे आदेश दिले. आता यावर अक्षय शिंदेच्या आईने प्रतिक्रिया दिली आहे.
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर करण्यात आला. या प्रकरणाची न्यायालयीन समितीकडून चौकशी करण्यात आली. त्याचा अहवाल हायकोर्टात सादर करण्यात आला. मुंबई उच्च न्यायालयाने अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणात मोठा निर्णय दिला आहे. या प्रकरणात पाच पोलिस अधिकाऱ्यांना दोषी ठरवत त्यांच्या विरोधात कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यावर अक्षय शिंदेच्या आईने प्रतिक्रिया दिली आहे.
अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणाचा अहवाल मुंबई हायकोर्टात सादर केला गेला. यावर प्रतिक्रिया देताना, अक्षय शिंदेची आईने माझा मुलगा अक्षय हा निर्दोष आहे. माझ्या मुलाने गुन्हा केलाच नव्हता. माझा मुलगा खरा होता आणि हे सत्यच आहे. मी त्याची आई आहे, मला त्याच्यावर विश्वास आहे. माझ्या मुलावर अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आणि नंतर त्याचा एन्काऊंटर केला. आम्ही अजूनही भीक मागून आमचे जीवन जगत आहोत, अशी भावनिक प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणात मोठा निर्णय दिला आहे. या प्रकरणात पाच पोलिस अधिकाऱ्यांना दोषी ठरवत त्यांच्या विरोधात कारवाईचे आदेश दिले आहेत. अक्षय शिंदे हा बदलापूर येथील शाळेत शिकणाऱ्या चिमुकल्या मुलींवरील लैंगिक शोषणाच्या प्रकरणात आरोपी होता. मात्र, चौकशी अहवालात हे स्पष्ट झाले की, त्याच्या बंदुकीवर अक्षयचे फिंगरप्रिंट्स सापडले नाहीत. यामुळे या एन्काऊंटरच्या सत्यतेबद्दल प्रश्न निर्माण झाले आहेत आणि न्यायालयाने पोलिसांना जबाबदार धरत कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत.
हेही वाचा: Akshay Shinde News Update; अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणात उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
बदलापूर येथील शाळेतील दोन मुलींर झालेल्या अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा पोलिसांच्या चकमकीत मृत्यू झाला. तळोजा कारागृहातून नेत असताना मुंब्रा बायपास य़ाठिकाणी त्याने कारमधील पोलिसाची बंदूक हिसकावून पोलिसांवरच गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. यात पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी त्यांच्यावर गोळीबार केला, यातच त्याचा मृत्यू झाला.
अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरण: मुंब्रा बायपासवर नेमकं काय घडलं?
पोलीस अधिकारी अक्षय शिंदेला तळोजा तुरूंहातून बदलापूर गुन्हे शाखेला घेऊन जात होते. पोलिसांची कार मुंब्रा बायपासवर पोहचली असता अक्षय शिंदेने पोलिसांची बंदूक हिसकवून त्यांच्यावर गोळीबार केला. या झटापटीत एपीआय निलेश मोरे यांच्यापायाला गोळी लागली. अक्षय पळून जाण्याच्या तयारीत असताना त्याने इतर पोलीस अधिकाऱ्यांवरही गोळीबार कऱण्याचा प्रयत्न केला पण पोलीस निरीक्ष संजय शिंदे यांनी अक्षयवर गोळीबार केला. यात त्याला तीन गोळ्या लागल्या. तो गंभीर जखमीही झाला. त्याला उपचारासाठ रुग्णालयात दाखल करण्याता आले असता, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.