सौजन्य : iStock
गोंदिया : नागरिकांसाठी सर्वात सुरक्षित प्रवास म्हणून एसटी महामंडळाच्या बसकडे पाहिले जाते. बसमध्ये असलेल्या प्रवाशांना सुरक्षितपणे त्यांच्या ठिकाणावर पोहोचविण्याची जबाबदारी बसचालकाच्या हाती असते. महामंडळाच्या कार्यपद्धतीनुसार कर्तव्यावर असलेल्या चालक व वाहकाने मद्यप्राशन केलेले नाही, याबाबत विशेष मोहीम राबविण्यात येते. याअंतर्गत गोंदिया आगारातील एकही वाहक व चालक कर्तव्यावर असताना मद्यप्राशन केलेला आढळला नसल्याची माहिती आगाराने दिली आहे.
हेदेखील वाचा : ST Bus: एसटी महामंडळाचे रुपडे पालटणार! महाराष्ट्र एसटीमध्ये ‘कर्नाटक पॅटर्न’; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा मोठा निर्णय
सुरक्षित प्रवासाच्यादृष्टीने राज्य परिवहन महामंडळाच्या बसकडे पाहिले जाते. त्यामुळे एसटी बसने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. अशातच प्रवाशांना त्यांच्या ठिकाणी सुरक्षितपणे पोहोचविण्याची जबाबदारी संबंधित आगारातील वाहक व चालकांची असते. त्यामुळे आगारातील वाहतूक निमंत्रक कर्तव्यावर जाणाऱ्या वाहक व चालकांनी मद्यप्राशन केले नसल्याची खात्री करूनच त्यांना कर्तव्यावर पाठविले जाते. असे असले तरी मद्यप्राशन करून कर्तव्य बजावताना एसटी बसला अपघात झाल्याचे व त्यात प्रवासी जखमी झाल्याच्या घटना राज्यात घडल्या आहेत. त्यामुळे महामंडळातर्फे यासंदर्भात विशेष मोहीम राबविण्यात येते.
या विशेष मोहिमेंटर अंतर्गत गोंदिया आगारात सुरक्षा विभागाच्या मार्ग तपासणी पर्यवेक्षक, प्रशिक्षण पर्यवेक्षकांनी अल्कोटेस्ट व ब्रेथ ऍनालायझरच्या साहाय्याने कर्तव्यावरील वाहक व चालकांची तपासणी केली. यात एकही वाहन व चालक मद्यप्राशन केल्याचे आढळून आलेले नाही.
महाराष्ट्र एसटीचे रुपडं पालटणार
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (MSRTC) सेवा दर्जात लक्षणीय सुधारणा करण्यासाठी कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (केएसआरटीसी) यशस्वी मॉडेलचा अवलंब करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी रविवारी बंगळुरू येथे ‘केएसआरटीसी’ मुख्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी कर्नाटक परिवहन व्यवस्थेचा सखोल अभ्यास केला आणि महाराष्ट्रात त्या धर्तीवर नव्या सुविधा लागू करण्याचा विचार असल्याचे सांगितले.
गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्र एसटी महामंडळ आर्थिक संकट आणि व्यवस्थापनाच्या अडचणींना तोंड देत आहे. प्रवाशांना खासगी बस कंपन्यांपेक्षा एसटी सेवा अधिक विश्वासार्ह वाटावी यासाठी सुधारणा आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर, केएसआरटीसीच्या यशस्वी पद्धतीचा अवलंब केल्यास एसटी महामंडळाला मोठा फायदा होऊ शकतो.
हेदेखील वाचा : MSRTC Bus Fare Increase : एसटी भाडेवाढ विरोधात शिवसेना ठाकरे गटाचे पेणमध्ये निदर्शने