मुंबई : मेघालय राज्याच्या चेरापुंजी येथील एका हॉटेलमध्ये महिलेसोबत गळ्यात हात घालून खुर्चीवर बसल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. तसेच भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी हा व्हिडीओ ट्विट करत टोला लगावला आहे. यानंतर चित्रा वाघ यांच्यावर रुपाली पाटील ठोंबरे यांनी टीका केली आहे.
रुपाली ठोंबरे पाटील काय म्हणाल्या ?
भाजपच्या चित्राताईंनी कॉंग्रेसच्या नाना पटोलेंचा एक तथाकथित हा खाजगी व्हिडिओ शेयर केला आहे. मुळात आपण राजकारणात कशासाठी आलो आहोत? विरोधकांची अनैतिक संबंध काढणं, ताकझाक करणं हा आपला विकास आहे का? तुमच्याही पक्षातल्या (भाजपच्या) नेत्यांचे खाजगी व्हिडिओ बाहेर आले आहेत. कोणाच्याही खाजगी आयुष्यातले व्हिडिओ अशाप्रकारे पोस्ट करता येत नाही. आपल्याला कुणी अधिकार दिला की, त्याच्या खाजगी आयुष्यातील व्हिडिओ अशाप्रकारे शेयर कारायचा? मुळात तुमच्या लोकांचे जे अनैतिक सबंध आहेत, ज्या महिला तक्रार करतात त्यांनी तो दिला. पण, हा व्हिडिओ त्या महिलेने दिलेला नाही. तरिही तुम्हाला विरोधकांच्या खाजगी आयुष्यातील व्हिडिओ पाठवणे, ते बघणे, त्यांचे कुठे-कुठे अनैतिक संबंध आहे हे बघणे हे तुम्हाला शोभत नाही अशी टीका त्यांनी चित्रा वाघ यांच्यावर केली.
पुढे म्हणाल्या की, आपल्या समाजात अनेक प्रश्न आवासूव उभे आहेत. परंतू सातत्याने भाजकडून महागाई, बेरोजगारी यासारखे मोठे प्रश्न सोडून लोकांच्या खाजगी आयुष्यात दखल देणं बंद करा. ते राजकारणी असले तरी ते माणसं आहे. त्यांनी त्यांच आयुष्य आहे. कुणावर जर खरा अन्याय झाला असेल करत त्याची पडताळणी करुनच राजकारणी नेत्यांनी बोललं पाहिचे. पूजा राठोड प्रकरणातही तसंच झालं. संविधान आहे. त्यानुसार चालावं लागतं. आज ज्या नेत्यावर आले होते ते भाजमध्ये आले आहेत ते वॉशिंगमशीनसारखे स्वच्छ झाले आहेत, ही कुठली पद्धत आहे? राजकारणात विकास सोडून कोण कुठं आंघोळ करतंय, कोण कुठं बेडरुममध्ये काय करतंयं यासाठी आपण राजकारणात आहोत का? असा सवाल त्यांनी चित्रा वाघ यांना विचारला आहे.
[read_also content=”मोदी सरकारच्या हुकूमशाहीविरोधात आरपारची लढाई; नाना पटोलेंचा हल्लाबोल https://www.navarashtra.com/maharashtra/a-back-and-forth-fight-against-modi-governments-dictatorship-the-attacks-of-various-factions-nrdm-306603/”]
दरम्यान, नाना पटोले यांना विचारपूस केली असता त्यांनी हे भाजपाचे कट कारस्थान असल्याचा आरोप नाना पाटोले यांनी केला आहे. त्याविरोधात आम्ही न्यायालयात दाद मागणार असल्याचे नाना पटोले यांनी केला आहे. यावर कायदेशीर बाबी आमची लीगल टीम तपासत आहे, असे नाना पटोले म्हणाले.