Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘बटन दाबा आणि निधी घ्या, हे प्रलोभन नाहीये का?’ अजित पवारांच्या वक्तव्यावर अंबादास दानवे आक्रमक

कालचं अजित पवार यांचं वक्तव्य ऐकलं तर निवडणुक आयोग झोपलेलं आहे का असा प्रश्न अंबादास दानवे यांनी उपस्थित केला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 18, 2024 | 02:56 PM
‘बटन दाबा आणि निधी घ्या, हे प्रलोभन नाहीये का?’ अजित पवारांच्या वक्तव्यावर अंबादास दानवे आक्रमक
Follow Us
Follow Us:

छत्रपती संभाजीनगर – लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये राजकीय महानाट्य रंगले आहे. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असून प्रचाराचा धुरळा उडाला आहे. दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी महायुतीवर निशाणा साधला आहे. त्याचबरोबर निधी देण्याच्या बाबत केलेल्या वक्तव्यावरुन अंबादास दानवे यांनी अजित पवार यांचा समाचार घेतला आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये माध्यमांशी संवाद साधताना अंबादास दानवे यांनी आक्रमक पवित्रा घेतला. देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत ते म्हणाले, “फडणवीस रोज खोटं बोलतात. फडणवीस शिवसेना, राष्ट्रवादी संपवण्याचे काम करत आहे. उमेदवार अजित पवार हे ठरवत नसून भाजप ठरवत आहे. मोदींना हिंदुस्तान आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.  शिवसेना आणि राष्ट्रवादीतील भाजपाकडे गेलेली गद्दार लोक यांच्या पक्षाची आज स्थिती काय आहे” असा सवाल अंबादास दानवे यांनी उपस्थित केला आहे.

महायुतीला दररोज मोदी आणि शाह यांना महाराष्ट्रात आणावे लागते

त्याचबरोबर अंबादास दानवे यांनी महायुतीवर देखील निशाणा साधला आहे. अंबादास दानवे म्हणाले, “महायुतीला उमेदवार सुद्धा सापडेना. महाराष्ट्रात सात जागा अशा आहेत की महायुती मध्ये कोण लढणार असा प्रश्न आहे. छगन भुजबळ यांची कालची प्रतिक्रिया तुम्हीच बघा. छगन भुजबळ बोलले आहेत की, किमान 20 पर्यंत उमेदवार जाहीर करा. महायुतीला दररोज नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना महाराष्ट्रात आणावे लागते. दररोज खोटं बोलणं चालू आहे. मला वाटत यातचं आमचं महाविकास आघाडीचं यश सामावलेलं आहे. आमचे सर्व उमेदवार जाहीर झाले आहेत. महाविकास आघाडी जागा जिंकण्यात सुद्धा पुढे राहणार आहे” असा विश्वास ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी व्यक्त केला.

बटन दाबा आणि निधी घ्या, हे प्रलोभन नाहीये ?

अजित पवार यांनी प्रचारसभेमध्ये ‘पाहिजे तेवढा निधी आम्ही देतो, मशीनमध्ये कचाकचा बटन दाबा, तर मला निधी द्यायला बरं वाटेल नाहीतर माझा हात आखडता होईल’ असे वक्तव्य भरसभेमध्ये केले होते. यावरुन महाविकास आघाडीचे नेते आक्रमक झाले आहेत. यावरुन देखील अंबादास दानवे यांनी अजित पवार यांना घेरले आहे. अंबादास दानवे म्हणाले, “कालचं अजित पवार यांचं वक्तव्य ऐकलं तर निवडणुक आयोग झोपलेलं आहे का असा मला प्रश्न पडलेला आहे की बटन दाबा आणि निधी घ्या, हे प्रलोभन नाहीये ? ही गोष्ट विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केली असती तर निवडणुक आयोगाने गुन्हा दाखल केला असता. रणदीप सिंह सुरजेवाला काहीच बोलले नाहीत तरी त्यांच्या वरती गुन्हा दाखला झाला. याचं घटना बदलण्याचं षडयंत्र आहे, किरकोळ बदल करावे लागतात असं लंगड समर्थन केलं जात आहे. ही सत्यता अजित पवार यांच्या तोंडून बाहेर आलेली आहे,” असा घणाघात अंबादास दानवे यांनी केला.

Web Title: Ambadas danve target dcm ajit pawar for statement on development funds for baramati lok sabha elections 2024 nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 18, 2024 | 02:56 PM

Topics:  

  • ajit pawar
  • Ambadas Danve
  • devendra fadnavis
  • LOKSABHA ELECTION
  • loksabha election 2024
  • political news

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
1

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

Devendra Fadnavis On Maharashtra Drought: अनावश्यक खर्च टाळा, पाणी जपून वापरा’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आवाहन
2

Devendra Fadnavis On Maharashtra Drought: अनावश्यक खर्च टाळा, पाणी जपून वापरा’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आवाहन

SIR ही मतदार यादी शुद्धीकरणाची प्रक्रिया; शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम यांचं विधान
3

SIR ही मतदार यादी शुद्धीकरणाची प्रक्रिया; शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम यांचं विधान

बारामतीत गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत; अनेक मंडळांकडून यंदा साधेपणाने गणेशोत्सव साजरा
4

बारामतीत गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत; अनेक मंडळांकडून यंदा साधेपणाने गणेशोत्सव साजरा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.