Uddhav Thackeray Yavatmal: माझ्या सांगण्यावरून तुम्ही 'त्या' बुजगावण्याला निवडून दिलं'; उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली मतदारांची माफी
ऑडिओ क्लिप ऐकवण्यापूर्वी जनतेशी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, काही वेळेला हे गद्दार माझी चूक होती, माझ्या सांगण्यावरून तुम्ही हे बुजगावणं निवडून दिलं. त्याला रक्ताचं पाणी करून समोरून पाऊस पडत असतानाही निवडून दिले. त्यासाठी तुमची माफी मागतो. मतदारांची मा फी मागतो. शिवसेना प्रमुख आणि माज्या शब्दांच्या भरवशावरून तुम्ही या गद्दारांना निवडून दिले. पण त्याने गद्दारी करुन तुमच्या माझ्या विश्वासाला काळं फासलं. त्याचा जाब आता विचारला पाहिजे. शेवटी हे गद्दारच, गद्दारांच्या कळपात गेला. गद्दार शिरोमणी मिंधे याने ४० आमदार फोडले, बैल पोळ्यात बैलावर लिहील होतं ५० खोके एकदम ओके आता या खासदारांचा किती भाव असेल, हा धंदा झाला, निवडून यायचं आणि हमी भाव वाढवायचा आणि विकून टाकायचं,” अशी घणाघाती टिकाही त्यांनी यावेळी केली.
उद्धव ठाकरे सुरुवातीला म्हणाले, पहिलं गद्दारांचा समाचार घेतो. कारण हे गद्दार काही वेळेला माझी चूक होती. माझ्या सांगण्यावरून जे तुम्हाला बुजगावणं दिलं. त्याला रक्ताचं पाणी करून, समोरून पावसाचा धबधबा पडत होता तरी कशाची तमा न बाळगता निवडून दिलं. त्याबद्दल तुमची माफी मागतो. मतदारांची माफी मागतो. तुम्ही शिवसेना प्रमुखांचा चेहरा आणि माझ्या शब्द या भरवश्यावर गद्दाराला निवडून दिलं. त्याने गद्दारी करून विश्वासाला काळं फासलं. त्याचा जाब विचारलं पाहिजे. शेवटी गद्दारच. गद्दाराच्या कळपात गेला. गद्दार शिरोमणी मिंधे याने ४० आमदार फोडले. बैल पोळ्यात बैलावर लिहिलं होतं ५० खोके एकदम ओके. आता खासदारांचा किती भाव असेल. हा धंदा झाला. निवडून यायचं आणि हमी भाव वाढवायचा आणि विकून टाकायचं.
जनतेशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी एका ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून पक्षातील बंडखोरीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. ऑडिओ क्लिप ऐकवल्यानंतर उद्धव ठाकरे म्हणाले की, “आईला काय वाटेल? आईची शपथ घेऊन गद्दारी करणार असतील, तर खरोखर आईला काय वाटेल?” असा सवाल उपस्थित केला.
“चूक आपल्या सर्वांची झाली. याने पूर्वीही एकदा गद्दारी केली होती, तरीही त्याला पुन्हा स्वीकारले. टेपमध्ये तुम्ही ऐकले असेल, शिवसेनेवर संकट येऊच शकत नाही. तुझी काळजी कर, माझी करू नको. शिवसेना चोरली, चिन्ह चोरलं तरी ठाकरे उभा आहे.”
ते पुढे म्हणाले, “शिवसेना आणि पक्षाचे चिन्ह हिरावून घेतल्यानंतरही आम्ही नऊ खासदार निवडून आणले. मग ते फोडण्याची वेळ का आली? तेव्हा म्हणत होते की, १८ खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्यावर निवडून आले. मात्र, आम्ही महाविकास आघाडीचे ३१ खासदार निवडून आणले. मग मोदींची लाट कुठे गेली?” “गेल्या दोन वर्षांत हे लोकसभेत किती वेळा उपस्थित राहिले? त्यांनी कोणती आंदोलने केली? आम्ही जी आंदोलने केली, ती कुणावर उपकार म्हणून नव्हती. आम्ही शेतकऱ्यांना कर्जमुक्त केले. त्यांनी मागणी करण्यापूर्वीच दिलासा दिला. प्रत्येकजण स्वतःला शेतकऱ्यांचा मुलगा म्हणतो, मग निष्ठेलाही जागा.”
विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) मोहिमेचाही उल्लेख करत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका केली. “एसआयआर सुरू होत आहे. रेशन कार्ड, पॅनकार्ड… आता पासपोर्टही नागरिकत्व ठरवणार नाही. मग काय, भाजपचे सदस्यत्वच नागरिकत्वाचा निकष ठरणार का? आम्ही भाजपचे सदस्य नाही. हा भाजप नाही. असेच सुरू राहिले, तर हा ‘पाकिस्तान जनता पक्ष’ होत आहे की काय, अशी चिंता वाटते,” असा टोलाही त्यांनी लगावला.






