
दसरा-दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांमध्ये चिंता! सोयाबीन काढणीला लगबग, पावसाच्या धास्तीने धावपळ वाढली
Amravati News: दसरा-दिवाळीच्या सणासुदीचे दिवस जवळ आले असताना शेतकऱ्यांसमोर मात्र पावसाचे संकट उभे ठाकले आहे. परतीच्या पावसाचे वातावरण निर्माण झाल्याने भातकुली तालुक्यात सोयाबीन काढणीला वेग आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी धावपळ सुरू झाली आहे. कापणी केलेले पीक शेतातच नुकसान होण्याची शक्यता असल्याने शेतकरी सकाळपासूनच शेतात दाखल होत आहेत.(फोटो सौजन्य – AI)
Melghat News : पक्क्या रस्त्यांसाठी आदिवासी बांधवांचा अमरावतीत मोर्चा; प्रशासनाला आंदोलनाचा इशारा
भातकुली तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीनचे सर्वाधिक क्षेत्र असून, तब्बल २२ हजार २०७हेक्टरवर सोयाबीनची पेरणी करण्यात आली आहे. याशिवाय १९ हजार १२८ हेक्टरवर कापूस, ९ हजार ३६१ हेक्टरवर तूर, ७५ हेक्टरवर उडीद, १० हेक्टरवर इतर तेलबिया, ७.२० हेक्टरवर मका आणि २.४० हेक्टरवर मुगाची पेरणी झाली आहे. त्यामुळे तालुक्यातील मोठ्या प्रमाणातील शेतकऱ्यांचे आर्थिक गणित सोयाबीनसह खरीप पिकांवर अवलंबून आहे.
टाकरखेडा संभू परिसरासह पूर्णानगर, आष्टी, देवरी निपाणी, जळका हिरापूर, रामा, साऊर, लसणापूर, कृष्णापूर, कळमगाव परिसरात सोयाबीन काढणीचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. काही ठिकाणी मजुरांच्या माध्यमातून तर काही ठिकाणी यंत्राच्या साहाय्याने कापणी केली जात आहे. कापणी केलेले सोयाबीन पावसापासून सुरक्षित ठेवण्यासाठी शेतकरी तातडीने शेतातून घरी किंवा सुरक्षित ठिकाणी हलवत आहेत. मंगळवारी रात्री काही भागात ढगाळ वातावरणासह विजांचा कडकडाट झाल्याने शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढली. बुधवारी सकाळपासूनच अनेक शेतकरी शेतात पोहोचले होते. दिवसभर कापणी करून तयार झालेले पीक पावसाच्या तडाख्यात सापडू नये, यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू होती.
यंदा पावसाचा अनियमितपणा आणि विविध कारणांमुळे सोयाबीनच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. अशा परिस्थितीत उरलेले पीकही पावसामुळे खराब झाल्यास शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. कापणीनंतर शेतात ठेवलेले सोयाबीन भिजल्यास त्याच्या दर्जावर परिणाम होऊन बाजारभावावरही त्याचा विपरित परिणाम होण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत.
८८ कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटाला आज शेतकरी त्रस्त झालेला आहे. आमच्या गावातील किमान ५० टक्के क्षेत्रात अतिशय कमी पावसामुळे शेती पिकाचे नुकसान झालेले आहे. काही शेतकऱ्यांनी जूनच्या अखेरीस पेरणी केलेल्या सोयाबीनला दोन ते तीन क्विंटलचा उतारा येत आहे, परंतु उशिरा पेरणी केलेल्या सोयाबीनला ते पण उत्पन्न मिळणार नाही हे नक्की झालेले आहे. त्यामुळे शासनाने खर्च उत्पन्न आधारित हेक्टरी किमान एक लाख रुपयाची मदत देऊन रब्बी हंगामाच्या उभारणीला मदत करावी.
गत ५ सतत वातावरणाच्या बदलामुळे सोवाधीन म पण यावर्षी आमच्या खारपाण पट्टचत कुणालाच सोयाबीनचा दाणा सुद्धा झालेला नाही. यावर्षी सोयाबीन उत्पन्नात कमालीची घट आली असून शासनाने ट्रिगर वन लागू केल्यावरही अद्यापपर्यंत कोणत्या शेतकऱ्याला नुकसानभरपाई मिळाले नाही दसरा तोंडावर आहे, दिवाळी आहे. शेतकऱ्यांना दसरा दिवाळीपूर्वी भरीव मदत मिळावी हीच अपेक्षा.
66 दसरा-दिवाळीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या कुटुंबांवर आर्थिक संकट ओढवले आहे. त्यामुळे शासनाने केवळ आश्वासन न देता प्रत्यक्ष मदत तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.