Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मार्च महिन्यातच परिस्थिती गंभीर? ‘या’ जिल्ह्यात केवळ 48.28 टक्केच पाणीसाठा

मोठ्या प्रकल्पामध्ये असलेल्या उर्ध्व वर्धा धरणाची साठवण क्षमता ५६४.०५ दलघमी असून सध्या त्यात ३२२.७१ दलघमी महणजे ५७.२१ टक्के पाणी उपलब्ध आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 13, 2026 | 03:36 PM
मार्च महिन्यातच परिस्थिती गंभीर? ‘या’ जिल्ह्यात केवळ 48.28 टक्केच पाणीसाठा
Follow Us
Close
Follow Us:

अमरावती जिल्ह्यात पाणी पातळी घसरली
प्रकल्पात केवळ ४८.२८ टक्के जलसाठा
जिल्ह्यातील धरणांमध्ये अध्यपिक्षा कमी साठा

अमरावती: उन्हाळ्याची चाहूल लागताच अमरावती जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पातील पाणीपातळी झपाट्याने घटू लागली आहे. जिल्ह्यातील मोठे, मध्यम व लघु अशा एकूण ५६ सिंचन प्रकल्पांमध्ये सध्या सुमारे ९८५.९० दलघमी इतकाच पाणीसाठा उपलब्ध असून तो एकूण क्षमतेच्या केवळ ४८.२८ टक्के आहे. त्यामुळे उन्हाळी पिकांचे नियोजन, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता आणि नदीपात्रातील पाण्याबाबत प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात एक मोठा, सात मध्यम व ४८ लघुप्रकल्प असून त्यांची एकूण साठवण क्षमता २०४७.३० दलघमी आहे. त्यापैकी सध्या ९८५.९० दलघमी पाणीसाठा उपलब्ध आहे.

मोठ्या प्रकल्पामध्ये असलेल्या उर्ध्व वर्धा धरणाची साठवण क्षमता ५६४.०५ दलघमी असून सध्या त्यात ३२२.७१ दलघमी महणजे ५७.२१ टक्के पाणी उपलब्ध आहे. मध्यम प्रकल्पांची एकूण साठवण क्षमता २५६.२४ दलघमी असून सध्या १२७.१३ दलघमी म्हणजे सुमारे ४९.६२ टक्के पाणी आहे.

Ashti Nagar Panchayat: नगरपंचायतींमध्ये पावसाळ्यापूर्वी पाणीपुरवठा कामे पूर्ण करा; आ. सुरेश धस यांचे आदेश

तर जिल्ह्यातील ४८ लघु प्रकल्पाची क्षमता २२७.०१ – दलघमी असून त्यात १२८.८६ दलघमी – म्हणजे ५६.७६ टक्के साठा उपलब्ध आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच – जलसाठा निम्म्याच्या आसपास राहिल्याने एप्रिल-मे महिन्यात परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता वर्तवली जात – आहे. दरम्यान जिल्ह्यातील वर्धा, पूर्णा – आणि इतर उपनद्यांच्या प्रवाहातही पाणी कमी होत चालले आहे.

अप्पर वर्धात ५७ टक्क्यावर जलसाठा
उन्हाळा वाढल्यामुळे जिल्ह्यातील सर्व धरणांची पातळीत घटली आहे. परंतु  अमरावती शहराला पाणी पुरवठा करणार्या अप्पर वर्धात अजूनही ५७ टक्क्यावर पाणी साठा आहे. परंतू जिल्ह्यातील मेळघाट परिसरात शेतकरी व ग्रामस्थ पाण्यासाठी ताणतणावाचा सामना करत आहेत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत, मात्र सतत वाढणाऱ्या तापमानामुळे पाण्याची समस्या दीर्घकाळ टिकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

समुद्राच्या एक लिटर पाण्यापासून किती मीठ तयार केले जाते? वाचून तुम्हीसुद्धा व्हाल आश्चर्यचकित

आ. सुरेश धस यांचे आदेश

आष्टी नगरपंचायत, पाटोदा आणि नगरपंचायत शिरूर कासार या तीन नगरपंचायतींमध्ये राज्याच्या नगरविकास विभागाच्या नगरोत्थान असलेल्या योजनेंतर्गत सुरू पाणीपुरवठा योजना व नळजोडणी कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. बैठकीत आ. सुरेश धस यांनी पावसाळ्यापूर्वी सर्व कामे गुणवत्तापूर्ण आणि वेळेत पूर्ण करण्याचे महत्त्व सांगितले. बैठकीत तीनही नग्रपंचायतींमधील सध्या सुरू असलेल्या कामांची सद्यस्थिती तपासली. यामध्ये पाणीपुरवठा, नळजोडणी, पाणी टाक्या, फिल्टर युनिट, उपलब्ध पाणीसाठा आणि शहरांमध्ये सध्या मिळणारा पाणीपुरवठा यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

Web Title: Only 48 28 percentage water availiable in amrvati district in march 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 13, 2026 | 03:16 PM

Topics:  

  • Amravati District
  • Amravati News
  • Water Shortage

संबंधित बातम्या

कॅनच्या पाण्याची गुणवत्ता कितपत योग्य? शुद्धतेचे काय? यवतमाळात रोज हजारो लिटर पाण्याची विक्री
1

कॅनच्या पाण्याची गुणवत्ता कितपत योग्य? शुद्धतेचे काय? यवतमाळात रोज हजारो लिटर पाण्याची विक्री

Amravati News : कोट्यवधी रुपये पाण्यात; मेळघाटातील बारातांडा-धूळघाट रस्ता खड्यात गडप
2

Amravati News : कोट्यवधी रुपये पाण्यात; मेळघाटातील बारातांडा-धूळघाट रस्ता खड्यात गडप

आठ गावांची ‘जीवनरेषा’ धूसर! कोट्यवधी रुपये पाण्यात; मेळघाटातील बारातांडा-धूळघाट रस्ता खड्यात गडप
3

आठ गावांची ‘जीवनरेषा’ धूसर! कोट्यवधी रुपये पाण्यात; मेळघाटातील बारातांडा-धूळघाट रस्ता खड्यात गडप

खेडमधील ३३ गावे, ५० वाड्यांमध्ये टंचाईचा दाह; पाणीसाठा झपाट्याने कमी
4

खेडमधील ३३ गावे, ५० वाड्यांमध्ये टंचाईचा दाह; पाणीसाठा झपाट्याने कमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.