अन्नपदार्थांची चव वाढवण्यासाठी रोजच्या जेवणात मिठाचा वापर केला जातो. मिठाशिवाय जेवणाला चव लागत नाही. मीठ खाल्ल्यामुळे शरीराला जितके फायदे होतात तितकेच तोटे सुद्धा होतात. चव वाढवण्यासाठी मिठाचा वापर केला जातो. समुद्राच्या पाण्यातील क्षारतेवर मीठ अवलंबून असते. सर्वसाधारणपणे समुद्राच्या पाण्याची क्षारता 3.5% असते. समुद्राच्या पाण्यात सरासरी ३.५% मीठ विरघळलेले असते. सूर्याच्या उष्णतेमुळे पाण्याची वाफ होते आणि मीठ खाली स्फटिकांच्या रूपात जमा होते. या प्रक्रियेला बाष्पीभवन होणे असे म्हणतात. चला तर जाणून घेऊया समुद्राच्या एक लिटर पाण्यातून किती मीठ तयार होते. (फोटो सौजन्य – istock)
समुद्राच्या एक लिटर पाण्यापासून किती मीठ तयार केले जाते?

समुद्राच्या एक लिटर पाण्यापासून 35 ग्रॅम मीठ तयार होते. तसेच संपूर्ण समुद्राच्या पाण्याचा विचार केल्यास, संपूर्ण पृथ्वीवर 500 फूट जाडीचा थर तयार होऊ शकतो.

मीठ तयार करण्याची सगळ्यात जुनी आणि सोपी पद्धत म्हणजे बाष्पीभवन. समुद्राच्या पाण्याचे बाष्पीभवन झाल्यानंतर मिठाचे थर तयार होतात. समुद्राचे पाणी वाफ्यांमध्ये साठवले जाते. त्यानंतर त्याच पाण्याची सूर्याच्या उष्णतेमुळे वाफ होते आणि मीठ तयार केले जाते.

सगळ्यांचं समुद्रांमध्ये मिठाचे प्रमाण सारखेच नसते. मृत समुद्रामध्ये एका लिटर पाण्यात सुमारे 300 ते 340 ग्रॅम मीठ असते, तर सामान्य समुद्रांमध्ये मृत समुद्राच्या १० पट पाणी जास्त असते.

समुद्राच्या पाण्यात केवळ मीठ आढळून येत नाही. या पाण्यात मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि पोटॅशियम इत्यादी घटक आढळून येतात. मिठाचे शुद्धीकरण करताना त्यातील काही घटक काढून टाकले जातात.

समुद्राच्या पाण्याचे बाष्पीभवन करून तयार केलेले मीठ थेट खाण्यासाठी वापरले जात नाही. मिठावर प्रक्रिया करून नंतरच मिठाचा वापर खाण्यासाठी केला जातो.






