Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

उन्हाळ्यात प्राण्यांची पाण्यासाठी वणवण! सौर उर्जेवर आधारित कृत्रिम जलस्त्रोत, टँकरचा केला जाणार उपयोग

जिल्ह्यात जंगलाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. या वन्यप्राण्यांचा मोठ्या प्रमाणावर वावर आहे. परंतु सध्या उन्हाळ्याची चाहूल लागत आहे. अशातच वन्यप्राण्यांची पाण्यासाठी भटकंती होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 17, 2026 | 03:32 PM
पाणवठ्यासाठी वनविभागाचा वेट अ‍ॅण्ड वॉच! सौर उर्जेवर आधारित कृत्रिम जलस्त्रोत, टँकरचा केला जाणार उपयोग

पाणवठ्यासाठी वनविभागाचा वेट अ‍ॅण्ड वॉच! सौर उर्जेवर आधारित कृत्रिम जलस्त्रोत, टँकरचा केला जाणार उपयोग

Follow Us
Close
Follow Us:

यवतमाळ जिल्ह्याला प्रचंड जंगलव्याप्त भाग लागलेला आहे. त्यामध्ये विविध प्रकारचे पशुपक्षी, वन्यप्राणी राहतात. दरवर्षी मार्च महिन्यात वाढलेल्या तापमानामुळे जंगलातील नैसर्गिक जलस्त्रोत आटल्याने वन्यप्राण्यांची नागरी वस्त्यांकडे धूम असते. दरम्यान यावर्षी झालेल्या मुबलक पावसामुळे तुर्तास तरी जंगलातील पानवठ्याला अजून थोडा अवधी आहे. मात्र वाढते तापमान लक्षात घेता वनविभागाकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असून सौर उर्जेवर आधारित कृत्रिम जलस्त्रोत उभारण्यात आले आहे.(फोटो सौजन्य – istock)

वर्षभरात पीक नुकसानीच्या ३ हजार घटना! वन्यप्राणी हल्ले; अनुदान वितरणात वडसा वनविभाग अव्वल

यवतमाळ जिल्हा घनदाट वनसंपदेने वेढलेले आहेत. यामध्ये टिपेश्वर अभयारण्य व पैनगंगा अभयारण्य येथे अनेक पशु पक्ष्यांसह इतर प्राणी पहायला मिळातात. तर काही जंगलाचा भाग हा यवतमाळसह पुसद, पांढरकवडा वनविभागाचे वन परिसर आणि वाशिम जिल्ह्यातील जंगल परिसराचा काही भाग यवतमाळ वनविभागाच्या अंतर्गत येतो. दोन्ही जिल्ह्यांचा समावेश करून जवळपास ३ हजार ४७० चौरस किलोमीटर हेक्टर वनक्षेत्र आहे. ज्यामध्ये यवतमाळ वनक्षेत्राचा समावेश २१०७चौरस किलोमीटरमध्ये आहे. या घनदाट जंगला वाघ, अस्वल, रानडुक्कर, बिबट अशा हिंस्त्र वन्य प्राण्यांचा मुक्त संचार आहे.

उन्हाळ्याच्या दिवसात वन्यप्राण्यांची पाण्यासाठी परवड होऊ नये म्हणून अधिवासातच तहान भागविण्यात यावी. यासाठी कृत्रिम पानवठे प्राण्याकरिता महत्त्वाचे असतात. जिथे नैसर्गिक जलसोत्र नसतात किंवा असले तरी कोरडे पडण्याची शक्यता असते तिथे उपयोजना करावी लागते. दरवर्षी कृत्रिम पानवठे तयार करून त्यात टँकरने पाणी सोडण्यात येते. मार्च महिन्यात तापमानाचा पारा वाढल्याने जंगलातील जलखोत आटत्तात. अशावेळी जंगलातील हिंस्त्र प्राणी, पशु पक्षी मानव वस्तीकडे व लगतच्या शेतात पाण्यासाठी धाव घेतात आणि मानव पशु संघषर् वाढतो. अशा घटनात अनेक शेतकरी जखमी झाले आहे, तसेच शेतपिकांचेही नुकसान होते. अशा घटना टाळण्यासाठी वनविभागाकडून दरवर्षी जंगलातच पाणवठे तयार केले जातात. यावर्षी कृत्रिम जलस्रोत उभारणीसाठी शासनाकडे निधी उपलब्ध करून देण्याबाबत प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. जंगलात प्राण्यांसाठी टँकरच्या माध्यमातून जलकुंड भरून ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

जिल्ह्यात जंगलाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. या वन्यप्राण्यांचा मोठ्या प्रमाणावर वावर आहे. परंतु सध्या उन्हाळ्याची चाहूल लागत आहे. अशातच वन्यप्राण्यांची पाण्यासाठी भटकंती होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. वनविभागाने प्राण्याची ताण-भागविण्यासाठी कृत्रिम पाणवठे तयार करून पाण्यासाठी वन्यप्राण्यांची भटकती होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशी मागणी वन्यप्रेमी नागरिकांतून करण्यात येत आहे.

कापूस विक्रीचा पेच आता आणखी वाढला! विक्रीसाठी मुदतवाढ; मात्र नवीन नोंदणीचा मार्ग करण्यात आला बंद

उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागल्याने वनक्षेत्रामध्ये वन्यप्राण्यांना पाण्याची टंचाई भासू नये, यासाठी वनविभागाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. कृत्रिम जलस्रोत उभारणीसाठी शासनाकडे आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याबाबत प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. दरम्यान, सध्या वनक्षेत्रांमध्ये सौरऊर्जेवर आधारित जलस्रोत उभारण्यात येत असून टैंकरच्या माध्यमातून जलकुंड भरून ठेवण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. – किशोर मानकर, विभागीय वनपरिक्षेत्र अधिकारी, असे मत व्यक्त केले आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Animals hunt for water in summer artificial water source based on solar energy tankers will be used

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 17, 2026 | 03:32 PM

Topics:  

  • animal
  • Yavatmal
  • yavatmal latest news

संबंधित बातम्या

Yavatmal News: एटीएमवर ना गार्ड, ना सीसीटीव्ही! सुरक्षेची जबाबदारी बँकांवर; अनेक ठिकाणी सुरक्षारक्षकच नाही
1

Yavatmal News: एटीएमवर ना गार्ड, ना सीसीटीव्ही! सुरक्षेची जबाबदारी बँकांवर; अनेक ठिकाणी सुरक्षारक्षकच नाही

Yavatmal Crime: प्रियकरासाठी नवऱ्याला विजेचा धक्का देऊन मारण्याचा कट; रात्री 2 वाजता नवऱ्याची किंकाळी आणि…
2

Yavatmal Crime: प्रियकरासाठी नवऱ्याला विजेचा धक्का देऊन मारण्याचा कट; रात्री 2 वाजता नवऱ्याची किंकाळी आणि…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.