Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics : “…तर पार्थ पवारांना खासदार बनवणं चुकीचं, हा संधीसाधू माणूसच; अंजली दमानिया यांचे टीकास्त्र

सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी पार पडल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सोशल मीडिया पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी धनंजय मुंडे आणि पार्थ पवार यांच्याबाबत भाष्य केले.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 01, 2026 | 05:09 PM
Anjali Damania opposes making Parth Pawar a Rajya Sabha MP and Dhananjay Munde minister

Anjali Damania opposes making Parth Pawar a Rajya Sabha MP and Dhananjay Munde minister

Follow Us
Close
Follow Us:
  • अजित पवारांच्या निधनानंतर राजकारणाला उधाण
  • पार्थ पवारांच्या खासदारकीवर दमानिया नाराज
  • धनंजय मुंडेंना म्हणाल्या संधीसाधू
Maharashtra Politics : मुंबई : दिवंगत नेते अजित पवार यांचे अपघाती निधन (ajit pawar plane crash) झाले आहे. मुंबईहून बारामतीला येताना त्यांच्या विमानाचा लँडिंगवेळी अपघात झाल्याने अजित पवारांसह पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात आणि राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त करण्यात आली. अजित पवार यांच्या आकस्मित निधनामुळे राजकारणाची दिशा बदलण्याची शक्यता होती. मात्र अवघ्या चार दिवसांमध्ये अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यामुळे विरोधकांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे. त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला होता. राजकीय विरोध असला तरी ही घटना मनाला चटका लावणारी असल्याचे देखील दमानिया म्हणाल्या होत्या. मात्र आता सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यामुळे दमानिया यांनी महत्त्वपूर्ण टिप्पणी केली आहे. दमानिया यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये पार्थ पवार आणि धनंजय मुंडे यांचा उल्लेख केला आहे.

हे देखील वाचा : अजित पवारांच्या अपघातावर राष्ट्रवादीच्या नेत्यांना संशय; अमोल मिटकरींनी उपस्थित केला महत्त्वपूर्ण सवाल

अंजली दमानिया यांनी लिहिले आहे की, “अजित पवारांच्या निधनानंतर अवघ्या ३ दिवसांत शपथविधी घ्यायला काहीच हरकत नसेल आणि “बिझनेस अज यूज्युअल” असेल, तर पुणे जमीन घोटाळ्याची चौकशीही थांबवायची नाही. १. पार्थ पवारांविरोधात प्रलंबित FIR तात्काळ दाखल करा. आणि २. खारगे आयोगाचा अहवाल त्वरित सार्वजनिक करा. पार्थ पवारांवर चौकशी सुरू असताना राज्यसभेचे खासदार बनवणे चुकीचे धनंजय मुंडेंही सुनेत्रा पवारांच्या पुढे मागे फिरतांना दिसले. संधीसाधू माणूस. परत येण्याची तडफड दिसतेय,” अशी घणाघाती टीका अंजली दमानिया यांनी केली आहे.

अजित पवारांच्या निधनानंतर अवघ्या ३ दिवसांत शपथविधी घ्यायला काहीच हरकत नसेल आणि “बिझनेस अज यूज्युअल” असेल, तर पुणे जमीन घोटाळ्याची चौकशीही थांबवायची नाही. १. पार्थ पवारांविरोधात प्रलंबित FIR तात्काळ दाखल करा.
२. खारगे आयोगाचा अहवाल त्वरित सार्वजनिक करा.
पार्थ पवारांवर चौकशी सुरू… — Mrs Anjali Damania (@anjali_damania) February 1, 2026

हे देखील वाचा : “अपघाताचं राजकारण नको , घटनेची सखोल चौकशी होईल” – गिरीश महाजन

सुनेत्रा पवार यांना अजित पवारांकडे असणारी सर्व खाती देण्यात आली फक्त अर्थ खाते देण्यात आले नाही. यावरुन माध्यमांशी संवाद साधताना अंजली दमानिया म्हणाल्या की, “एकदा राष्ट्रवादी काँग्रेस नामशेष झाली की, भाजपाला शिंदे गटाचीही आवश्यकता राहणार नाही आणि मग त्यांनाही बाजूला सारले जाईल, एकूणच, हा सर्व प्रकार लोकशाहीला घातक असून महाराष्ट्रातील प्रादेशिक अस्मिता पुसून टाकण्याचा हा प्रयत्न असल्याचे,” अंजली दमानिया म्हणाल्या आहेत.

Web Title: Anjali damania opposes making parth pawar a rajya sabha mp and dhananjay munde minister

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 01, 2026 | 05:09 PM

Topics:  

  • ajit pawar
  • ajit pawar plane crash
  • anjali damania

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: सुनेत्रा पवारांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीची रिक्त जागा कोणाला? भुजबळांच्या माघारीमुळे पेच वाढणार
1

Maharashtra Politics: सुनेत्रा पवारांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीची रिक्त जागा कोणाला? भुजबळांच्या माघारीमुळे पेच वाढणार

Sunreta Pawar: मोठी बातमी! सुनेत्रा पवार यांचा राज्यसभा खासदारकीचा राजीनामा; बारामतीतील ऐतिहासिक विजयानंतर विधानसभेवर स्वारी!
2

Sunreta Pawar: मोठी बातमी! सुनेत्रा पवार यांचा राज्यसभा खासदारकीचा राजीनामा; बारामतीतील ऐतिहासिक विजयानंतर विधानसभेवर स्वारी!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.