पुणे : व्यावसायिकाच्या अपहरण प्रकरणी कुख्यात गजानन उर्फ गजा मारणे टोळीतील आणखी एकाला गुन्हे शाखेने अटक केली. टोळीवर मोक्कानुसार कारवाई करण्यात आली होती. आतापर्यंत टोळीतील १० जणांना अटक करण्यात आली आहे. मयूर जगदीश जगदाळे (रा. गोसावी वस्ती, कर्वेनगर)असे अटक केलेल्याचे नाव आहे.
कुख्यात गजा मारणे टोळीने एका व्यावसायिकाचे अपहरण करीत तब्बल २० कोटींची खंडणी केली होती. या प्रकरणी खंडणी विरोधी पथकासह गुन्हे शाखेने विविध ठिकाणाहून नऊ जणांना अटक केली होती. त्यांच्याविरूद्ध पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मोक्कानुसार कारवाई केली आहे. टोळीतील फरारी कर्वेनगर परिसरात असल्याची माहिती पोलीस हवालदार सुधीर इंगळे यांना मिळाली. त्यानुसार मयूर जगदाळे याला ताब्यात घेउन अटक केली.