Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आरटीआय कार्यकर्ते सुशांत मोरे यांच्या तक्रारीला नगराध्यक्ष अमोल मोहितेंचे प्रत्युत्तर; साताऱ्यात अतिक्रमण हटाव मोहीम लवकरच

शाहू चौक ते बोगदा या मार्गावरील अतिक्रमण हटाव मोहिमेचा दुसरा टप्पा लवकरच सुरू होणार असून, अदालत वाडा परिसरासह संबंधित भागातील अतिक्रमणधारकांना नोटिसा देण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याची माहिती मोहिते यांनी दिली.

  • By विवेक
Updated On: Jun 09, 2026 | 09:50 PM
आरटीआय कार्यकर्ते सुशांत मोरे यांच्या तक्रारीला नगराध्यक्ष अमोल मोहितेंचे प्रत्युत्तर

आरटीआय कार्यकर्ते सुशांत मोरे यांच्या तक्रारीला नगराध्यक्ष अमोल मोहितेंचे प्रत्युत्तर

Follow Us
Follow Us:

सातारा, दि. ९ (प्रतिनिधी) : “अतिक्रमण हटाव मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यात माझे घर रस्ता रुंदीकरण प्रक्रियेत येत असेल, तर ते स्वतःहून काढून घेण्यात माझाच पहिला नंबर असेल. या कारवाईत मी कोणतीही सवलत मागणार नाही,” असे स्पष्ट प्रतिपादन सातारा नगरपालिकेचे नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी केले. माहिती अधिकार कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी केलेल्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करत सर्व चर्चांना पूर्णविराम दिला.

शाहू चौक ते बोगदा या मार्गावरील अतिक्रमण हटाव मोहिमेचा दुसरा टप्पा लवकरच सुरू होणार असून, अदालत वाडा परिसरासह संबंधित भागातील अतिक्रमणधारकांना नोटिसा देण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याची माहिती मोहिते यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.

गुरुवार पेठेतील रस्ता रुंदीकरण प्रक्रिया हेतुपुरस्सर थांबवून समर्थ मंदिर चौक ते बोगदा या मार्गावर अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली आणि त्यातून नगराध्यक्षांनी स्वतःच्या घराचे अतिक्रमण वाचवले, असा आरोप करत सुशांत मोरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीला उत्तर देताना मोहिते यांनी कोणताही पक्षपात झालेला नसल्याचा दावा केला.

ते म्हणाले, समर्थ मंदिर चौक परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या गंभीर होती. त्यामुळे त्या भागातील रस्त्यात येणाऱ्या मिळकती हटविण्यास प्राधान्य देण्यात आले. नागरिकांनीही स्वयंस्फूर्तीने आपल्या मिळकतीचा वाढीव भाग काढून प्रशासनाला मोठे सहकार्य केले. त्यामुळे कारवाई सुरळीतपणे पूर्ण झाली.

Panvel News: वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याने नागरिक त्रस्त; पनवेलच्या प्रश्नांवर मंत्रालयात खलबतं

समर्थ मंदिर चौक ते बोगदा या भागातील रस्ता रुंदीकरण प्रक्रिया काम पूर्ण झाले असून, आता त्या मार्गावरील डांबरीकरण व पॅचिंगची कामे हाती घेतली जाणार आहेत. दुसऱ्या टप्प्यात अदालत वाडा ते शाहू चौक या मार्गावरील रस्ता रुंदीकरण प्रक्रिया केली जाणार असून त्यासाठी आवश्यक तांत्रिक बाबी पूर्ण करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी स्वतःच्या घरासंदर्भातील आरोपांवर बोलताना मोहिते म्हणाले, “माझे घर रस्ता रुंदीकरणात येत असल्याचे काहीजण सांगत आहेत. प्रशासनाच्या नोंदींनुसार तसे आढळल्यास मी स्वतःहून ते काढून घेईन. त्यामध्ये माझाच पहिला नंबर असेल. नियम सर्वांसाठी समान आहेत आणि त्यातून मीही अपवाद नाही.”

नगराध्यक्षांच्या या भूमिकेमुळे अतिक्रमण कारवाईसंदर्भातील सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

तुकाराम मुंढेंची आणखी एक धडक कारवाई, कोल्हापूर आणि पुण्यात लाखो रुपयांचा औषधसाठा जप्त

Web Title: Anti encroachment drive on route from shahu chowk to tunnel

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 09, 2026 | 09:50 PM

Topics:  

  • Encroachment Issue
  • Satara
  • Satara News

संबंधित बातम्या

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकारण नको; उदयनराजेंनी नेमकं काय म्हटलं?
1

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकारण नको; उदयनराजेंनी नेमकं काय म्हटलं?

Satara News: मुंबईच्या २५ सुपरकार्स साताऱ्यात दाखल! जलमंदिर पॅलेसबाहेर कारप्रेमींची तुफान गर्दी
2

Satara News: मुंबईच्या २५ सुपरकार्स साताऱ्यात दाखल! जलमंदिर पॅलेसबाहेर कारप्रेमींची तुफान गर्दी

जास्तीत जास्त ऊस प्रतापगडला देऊन हंगाम यशस्वी करा; सौरभबाबा शिंदेंचं ऊस उत्पादकांना आवाहन
3

जास्तीत जास्त ऊस प्रतापगडला देऊन हंगाम यशस्वी करा; सौरभबाबा शिंदेंचं ऊस उत्पादकांना आवाहन

Sajjangad : ब्लास्टिंगचा दणका अन् सज्जनगड घाट ठप्प! दरड कोसळल्याने शेकडो भाविक-पर्यटक अडकले
4

Sajjangad : ब्लास्टिंगचा दणका अन् सज्जनगड घाट ठप्प! दरड कोसळल्याने शेकडो भाविक-पर्यटक अडकले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.