कोल्हापूर – कोल्हापूरमधून (Kolhapur) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अर्जुन समूहाचे प्रमुख संतोष शिंदे (Santosh Shinde) यांनी आपली पत्नी आणि मुलासह शुक्रवारी रात्री विष प्राशन केल्यानतंर गळ्यावर सुरी ओढून आत्महत्या (Sucide) केल्याने शहरात खळबळ उडाली आहे. तसेच या आत्महत्येमुळं वेगवेगळे तर्क काढले जाताहेत. तसेच पोलीस देखील याचा पुढील तपास करताहेत. या घटनेनंतर गडहिंग्लज शहरावासियांनी त्यांच्या निवासस्थानी मोठी गर्दी करत गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याची मागणी केली. काही दिवसांपूर्वी संतोष शिंदे यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न झाल्यानंतर तणावाखाली गेले होते. या तणावातून त्यांनी स्वत:सह कुटुंबाचा शेवट केला असावा, असं बोललं जात आहे.
नेमकं काय घडलं?
मागील काही दिवसांपासून संतोष शिंदे तणावात होते. तसेच त्यांना खोट्या प्रकरणात अडवण्याचा प्रयत्न झाला होता. त्या प्रकरणामुळे त्यांना कारवाईला सामोरं जावं लागलं होतं. यामुळेच त्यांनी तणावाखाली येऊन आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. आज सकाळी संतोष शिंदे यांच्या बेडरूमचे दार न उघडल्याने त्याच्या आई यांनी शेजाऱ्यांना बोलावून दरवाजा तोडून आत प्रवेश केला. यावेळी बेडरुममध्ये तिघांचेही मृतदेह आढळून आले. त्यामुळं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. संतोष शिंदे यांनी कोरोना काळात सामाजिक बांधिलकी जपताना परप्रातीयांना मोठी मदत केली होती. त्यामुळे उद्योगात नाव कमवून सामाजिक योगदान देणाऱ्या संतोष शिंदेंचा अत्यंत शेवट भयावह झाला आहे.
काय आहे सुसाईट नोटमध्ये?
दरम्यान, पोलिसांच्या माहितीनुसार संतोष शिंदे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली आहे, ती नोट पोलिसांनी ताब्यात घेतली असून, पुढील तपास पोलीस करताहेत. संतोष शिंदे याच्या मानेवरही जखमा आढळल्या आहेत. त्यामुळे त्यांनी सुरुवातीला विष प्राशन केल्यानंतर गळ्यावर सुरी फिरवून अंत केला. असा अंदाज लावला जात आहे. संतोष शिंदे हे गडहिंग्लज शहरात राहयला होते. एका उमद्या उद्योगपतीने अशा भयावह पद्धतीने आयुष्याचा शेवट केल्याने गडहिंग्लज तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.