मुंबई : अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan) याचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याला ड्रग्जप्रकरणी एनसीबीने (NCB) अटक केली होती. त्यावेळी मुंबई विभागाचे माजी संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांनी ही कारवाई केली होती. आर्यन खानला सोडण्यासाठी समीर वानखेडे यांनी शाहरुख खानकडे 25 कोटींची मागणी केल्याचा आरोप आहे. असे असताना आता याप्रकरणी नवी माहिती समोर येत आहे.
आर्यन खान आणि त्याचा मित्र अरबाझ मर्चंट (Arbaaz Merchant) यांची नावे शेवटच्या वेळी आरोपींच्या यादीत टाकण्यात आली, असा दावा आयपीएस अधिकारी ज्ञानेश्वर सिंह (Dnyaneshwar Singh) यांनी प्रतिज्ञापत्रात केला आहे. कॉर्डेलिया क्रुझ ड्रग प्रकरणात आर्यन खानला अटक करण्यात आली होती. या प्रकरणातील तपासातील त्रुटींची आणि आरोपांची चौकशी ज्ञानेश्वर सिंह करत होते. या प्रकरणाच्या मूळ केस नोटमध्ये बदल करून आर्यन आणि अरबाझ या दोघांची नावे वाढवणात आली, तर काहींची नावे वगळण्यात आली असा दावा देखील सिंह यांच्या प्रतिज्ञापत्रातून करण्यात आला आहे.
कोण आहे अरबाझ मर्चंट?
अरबाझ मर्चंट हा आर्यन खान आणि सुहाना खान यांचा मित्र आहे. इन्स्टाग्रामवरही त्याचा बऱ्यापैकी फॅन फॉलोइंग आहे. तो अनेकदा स्टार किड्सच्या पार्ट्यांमध्ये दिसून आला आहे. अरबाझ मर्चंट हा मध्यंतरी पूजा बेदीची मुलगी अलाया एफ हिला डेट करत असल्याचीही चर्चा होती.