(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
सुपरस्टार शाहरुख खान केवळ त्याच्या उत्कृष्ट अभिनयासाठीच नाही तर त्याच्या अद्भुत विनोदबुद्धीसाठी देखील ओळखला जातो. यामुळेच त्याला ट्रोल करणे कठीणच नाही तर अशक्यही आहे. अभिनेत्याने हे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. शनिवारी किंग खानने अचानक X अकाउंटवर Ask SRK सेशन केले. या दरम्यान शाहरुख खानने चाहत्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. दरम्यान, शाहरुख खानने एका वापरकर्त्याला जबरदस्त उत्तर देऊन त्यांनी बोलती बंद केली ज्याने अभिनेत्याने आता चित्रपटांमधून रिटायरमेंट घ्या असा सल्ला दिला.
Ask SRK सेशन दरम्यान एका वापरकर्त्याने शाहरुख खानला विचारले की अभिनेता कधी रिटायरमेंट घेणार आहे. वापरकर्त्याच्या या प्रश्नाने अभिनेत्याला थोडे दुखावले, ज्यावर त्याने मजेदार पद्धतीने प्रत्युत्तर देऊन त्याचे तोंड बंद केले. वापरकर्त्याने लिहिले, ‘भाऊ, आता तुमचं वय झालं आहे, रिटायरमेंट घ्या. इतर लोकांना येण्याची संधी द्या.’ असे या नेटकाऱ्याने लिहिले. त्याला उत्तर देत आता शाहरुख काय म्हणाला जाणून घेऊयात.
Bhai Tere sawaalon ka bachpana jab chala jaaye…Phir kuch acchha saa puchna! Tab tak temporary retirement mein reh please. https://t.co/56hKhyC6zo
— Shah Rukh Khan (@iamsrk) August 16, 2025
वापरकर्त्याच्या या कमेंटला उत्तर देताना शाहरुख खानने लिहिले, ‘भाऊ, जेव्हा तुमच्या प्रश्नांमधील बालिशपणा कमी होईल… तेव्हा काहीतरी चांगलं विचारा. तोपर्यंत कृपया तात्पुरती तुम्ही रिटायरमेंट घ्या’. असे अभिनेता म्हणाला. चाहत्यांना किंग खानचे हे उत्तर खूप आवडले आणि त्यांनी ५८ व्या वर्षीही सक्रिय आणि काम करत राहिल्याबद्दल शाहरुखचे कौतुक केले. अनेक चाहत्यांनी या पोस्टवर कंमेंट करून आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
‘किंग’ चित्रपटाबद्दल काही अपडेट
दरम्यान, शाहरुख खानने त्याच्या आगामी ‘किंग’ चित्रपटाबद्दलही अपडेट दिले. ‘किंग’ चित्रपटाच्या शूटिंगच्या प्रगतीबद्दल विचारले असता त्याने मजेदार पद्धतीने उत्तर दिले. शाहरुखने लिहिले, ‘शूटिंग चांगले सुरु आहे… लवकरच पुन्हा सुरू होईल. प्रथम फक्त पायाचे शॉट्स, नंतर पूर्ण शरीराचे… इंशाअल्लाह संपूर्ण शूटिंग लवकरच पूर्ण होईल. ते पूर्ण करण्यासाठी सिद्धार्थ आनंद कठोर परिश्रम करत आहे.’ असे लिहून अभिनेत्याने चाहत्यांना प्रश्नाचे उत्तर दिले. सिद्धार्थ आनंद हे ‘किंग’ चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत.
बॉक्स ऑफिसवर ‘Coolie’ चित्रपट ‘War 2’ वर पडला भारी? जाणून घ्या दोघांचे एकूण कलेक्शन
मुलगी सुहाना देखील या चित्रपटात मुख्य भूमिकेत
‘किंग’ हा शाहरुख खानचा आगामी ॲक्शन ड्रामा चित्रपट असेल, ज्यामध्ये शाहरुख त्याची मुलगी सुहाना खानसोबत दिसणार आहे. सिद्धार्थ आनंदने या चित्रपटाचे दिग्दर्शन हाती घेतले आहे. शाहरुख खानचा हा चित्रपट पुढील वर्षी म्हणजेच २०२६ मध्ये चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. अभिनेता शेवटचा ‘डंकी’ चित्रपटात दिसला होता ज्यामध्ये शाहरुख खानने तापसी पन्नू, अनिल ग्रोव्हर आणि विक्रम कोचर यांच्यासोबत काम केले होते.