Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raj Thackeray News: राज ठाकरेंनी तो व्हिडीओ सुरू करताच एकच शांतता…; शिवाजी पार्कच्या सभेत नेमकं काय झालं?

यापूर्वी अनेक सभांमध्ये व्हिडीओ सादर करून विरोधकांची पोलखोल करण्याची राज ठाकरेंची स्टाईल नवी नाही, पण कालच्या सभेत दाखलेल्या व्हिडीओमुळे उपस्थित श्रोत्यांवर मोठा प्रभाव पडल्याचे दिसून आले.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jan 12, 2026 | 10:24 AM
Raj Thackeray News: राज ठाकरेंनी तो व्हिडीओ सुरू करताच एकच शांतता…; शिवाजी पार्कच्या सभेत नेमकं काय झालं?
Follow Us
Close
Follow Us:
  •  मुंबईतून मराठी माणसाचे अस्तित्त्व पुसण्याचे पद्धतशीर प्रयत्न सुरू- राज ठाकरे
  • मुंबईसह देशभरात सरकारकडून अदानी समूहाला सिमेंट, कोळशा, खाणी प्रकल्पांपासून पोर्ट बंदरांपर्यतचे प्रकल्प देण्यात आले -राज ठाकरे
  • मुंबई गुजरातमध्ये विलीन करण्याचा प्रयत्न- राज ठाकरे
Raj Thackeray Shivaji Park Sabha : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी इतर पक्षांच्या प्रचारसभा सुरू झाल्या असतानाही ठाकरे बंधुंच्या संभांबाबत प्रश्न उपस्थित केले जात होते. त्यांच्या प्रचाराबाबत राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुर झाल्या होत्या. ठाकरे बंधू भाजपच्या झंझावाती प्रचारासमोर ठाकरे बंधू कसा सामना करणार, अशी शंकाही व्यक्त केली जात होती. पण रविवारी मुंबईच्या शिवाजी पार्कवर झालेल्या ठाकरे बंधुंच्या संयुक्त सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर आक्रमक हल्ला करत मुंबईतून मराठी माणसाचे अस्तित्त्व पुसण्याचे पद्धतशीर प्रयत्न सुरू असल्याचा आरोप केला. राज ठाकरे (Raj Thackeray)  यांनी उद्योगपती गौतम अदानी यांच्या अदानी समुहाला महाराष्ट्रासह देशभरात देण्यात आलेल्या विविध प्रकल्पांचे सादरीकरण करत मुद्देसूद मांडणी केली.

Iran Protest : इराणमध्ये रक्ताचा सडा! 500 हून अधिक आंदोलकांचा बळी, खामेनेई सरकारविरोधात जनक्षोभ

शिवाजी पार्कवरील सभेत राज ठाकरे काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. पण राज ठाकरेंनी भाषणाच्या सुरूवातीलाच भाजपच्या (BJP) वर्मावर घाव घातला. राज ठाकरे यांनी सत्ताधारी भाजप आणि महायुती सरकार उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर किती मेहरबान असल्याकडे लक्ष वेधले. राज ठाकरे यांनी एक व्हिडीओचे सादरीकरण करत २०१४ ते २०२५ या कालावधीत मुंबईसह देशभरात सरकारकडून अदानी समूहाला सिमेंट, कोळशा, खाणी प्रकल्पांपासून पोर्ट बंदरांपर्यतचे प्रकल्प देण्यात आले, अदानी समुहाला मोठ्या प्रमाणात जमिनी कशा प्रकारे देण्यात आल्या, याचा तपशीलवार व्हिडीओ सादर केला. हा व्हिडीओमुळे ठाकरे बंधुं पूर्ण तयारीनिशी मैदानात उतरल्याचे दिसून आले. महत्त्वाची बाब म्हणजे, व्हिडीओ सादर करण्यापूर्वी त्यांनी मुंबईतील मराठी माणसाला जागृत राहण्याचे आणि राज्य सरकारच्या गैरकारभाराकडेही लक्ष वेधले.   Thackeray  Brothers Alliance)

विशेष म्हणजे यापूर्वी अनेक सभांमध्ये व्हिडीओ सादर करून विरोधकांची पोलखोल करण्याची राज ठाकरेंची स्टाईल नवी नाही, पण कालच्या सभेत दाखलेल्या व्हिडीओमुळे उपस्थित श्रोत्यांवर मोठा प्रभाव पडल्याचे दिसून आले. राज ठाकरेंनी दाखवलेल्या व्हिडीओतून २०१४ ते २०२५ या काळातअदानी समुहाचे साम्राज्य कशाप्रकारे वाढत गेले, हे निदर्शनास आणून दिले. सभेत दाखवण्यात आलेल्या व्हिडीओला धीरगंभीर पार्श्वसंगीत असल्याने तो उपस्थितांवर खोल परिणाम करणारा ठरला. त्यानंतर राज ठाकरे यांनी मुंबई आणि राज्यातील विविध भागांत अदानी समूहाला कशा पद्धतीने जमिनी व प्रकल्प देण्यात आले, याची सविस्तर यादी एकामागोमाग एक वाचून दाखवली. राज ठाकरे यांचे भाषण सुरू असताना शिवाजी पार्कमध्ये जमलेला हजारोंचा जनसमुदाय पूर्णपणे एकाग्र होऊन ऐकत होता. या वेळी संपूर्ण परिसरात अक्षरशः चिडीचूप शांतता पसरली होती, ज्यातून सभेची गंभीरता आणि उपस्थितांवरील प्रभाव स्पष्टपणे जाणवत होता.

Aditya Thackeray on BJP: शिवाजी पार्कवर आदित्य ठाकरेंची फटकेबाजी; फडणवीसांची नक्कल करत कोस्टल

Raj Thackeray speech: मुंबई गुजरातमध्ये विलीन करण्याचे प्रयत्न

राज ठाकरें मुंबईकरांना आणखी एका धोक्याची जाणीव करून दिली. राज्य सरकारसह केंद्र सरकारकडून मुंबईवर कब्जा करण्यासाठी मोठी प्लॅनिंग सुरू असल्याचे सांगितले. मुंबईवर कब्जा करण्यासाठी सुरूवात बुलेट ट्रेनपासून झाली. वाढवण बंदर हे गुजरातजवळ आहे. बुलेट ट्रेनचे शेवटचे स्टेशन गुजरातमध्ये आहे. स्टेशनपासून काही किलोमीटर अंतरावर गुजरात मुंबईच्या दिडपट मोठे असलेले शहर वसवण्याचे काम करत आहे. मुंबई गुजरातला मिळवण्यासाठी पालघर, ठाणे या दोन जिल्हे महत्त्वाचे आहेत. गुजरातमधून मुंबईत मोठ्या प्रमाणात लोक इथे येतील त्यांचे मतदारसंघ बनवले जात आहेत. खासदारापासून नगरसेवक अशा सर्व ठिकाणी त्यांना आपली बसवून मुंबई हस्तगत करायची आहे. त्यासाठी मुंबई महापालिका ही सर्वात मोठी चावी आहे. असा आरोप राज ठाकरे यांनी यावेळी केला.

गेल्या काही वर्षांत अदानी समूह ज्या पद्धतीने पसरत आहे, वीज क्षेत्र असू दे, बंदर असू दे, विमानतळ असू दे, राज्यात जवळपास प्रत्येक क्षेत्र अदानी समूहाच्या हातात दिलं जात आहे… आज मराठी म्हणून आपण या एका उद्योग समूहाच्या विस्ताराकडे गांभीर्याने बघितलं नाही तर या राज्यातील इंच आणि… pic.twitter.com/uiYpdBoKLr — Raj Thackeray (@RajThackeray) January 11, 2026

Web Title: As soon as raj thackeray started the video there was complete silence at the rally what exactly happened at the shivaji park rally

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 12, 2026 | 10:05 AM

Topics:  

  • BMC Election 2026
  • Gautam Adani
  • raj thackeray

संबंधित बातम्या

Rohit Pawar Meet Raj Thackeray : रोहित पवारांच्या लढ्याला आले बळ! FIR संबंधित राज ठाकरेंनी सुपुर्द केले दोन दाखले
1

Rohit Pawar Meet Raj Thackeray : रोहित पवारांच्या लढ्याला आले बळ! FIR संबंधित राज ठाकरेंनी सुपुर्द केले दोन दाखले

BMC Swikrut Nagarsevak: ‘स्वीकृत ‘ची निवड लांबणीवर? इच्छुकांची नाराजी टाळण्यासाठी राजकीय पक्षांचा सावध पवित्रा
2

BMC Swikrut Nagarsevak: ‘स्वीकृत ‘ची निवड लांबणीवर? इच्छुकांची नाराजी टाळण्यासाठी राजकीय पक्षांचा सावध पवित्रा

Raj Thackeray : जेव्हा कानेटकरांच्या ‘सुख पाहता’ पुस्तकाचे मुखपृष्ठ रेखाटलं …; राज ठाकरेंनी जागवल्या खास आठवणी
3

Raj Thackeray : जेव्हा कानेटकरांच्या ‘सुख पाहता’ पुस्तकाचे मुखपृष्ठ रेखाटलं …; राज ठाकरेंनी जागवल्या खास आठवणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.