मुंबई : सध्या राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. दरम्यान, शिवसेनेचे नेते व मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सुरतनंतर (Surat) आता जवळपास 44 आमदारांना (MLA) घेऊन गुहावटीत (Guhawati) येथे थांबले आहेत. आज एकनाथ शिंदे बंडाळी गटाचा पाचवा दिवस आहे. त्यामुळं राज्यातील राजकीय हालचालीना वेग आला असून, मविआमध्ये बैठकाचं (MVA meeting) सत्र सुरु आहे. तर तिकडे शिंदे गटानी आपल्या गटाचे ‘शिवसेना बाळासाहेब गट’ (Shivsena balasaheb Group) असे नाव ठेवले आहे. तसेच त्यांचे नेतेपद व काही आमदारांचे सदस्यत्व रद्द केल्यानंतर आता शिंदे गटाने सर्वोच्य न्यायालयात (Court) धाव घेतली आहे. याचा परिणाम राज्यातील राजकीय व सामाजिक घडामोडींवर होत आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांच्यात बैठकीचं (Shivsena, congress, and NCP Meeting) जोरदार सत्रं सुरु आहे.
[read_also content=”शिवसेनेचे 18 पैकी 10 खासदार बंडखोरीच्या तयारीत, भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांची माहिती https://www.navarashtra.com/maharashtra/10-out-of-18-shiv-sena-mp-are-preparing-for-mutiny-bjp-mp-pratap-patil-chikhlikar-296915.html”]
दरम्यान, शिवसेनेची आज राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक (Shivsena meeting shivsena bhavan) घेतलीय. या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यामुळं उद्धव ठाकरेंनी शिंदेंबरोबर (Eknath shinde) गेलेल्या बंडखोरांना चांगलेच फटकारले. विशेष म्हणजे “बंडखोरांना त्यांनी स्वतःच्या बापाचं नाव लावून मतं मागण्याचा सल्ला दिलाय. स्वतःच्या बापाच्या नावानं मतं मागा” असं उद्धव ठाकरेंनी बंडखोरांना फटकारल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान आधी नाथ होते, आता दास झाल्याचा टीकाही ठाकरेंनी बंडखोर आमदारांवर केलीय. तसेच शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत सर्वाधिकार उद्धव ठाकरेंना देण्यावर सुद्धा एकमत झाले.