अमरावती : गेल्या चार महिन्यांपासून पाण्याचा प्रश्न भिषण झाला असून पिण्याच्या पाण्यासाठीही नागरिकांना वणवण भटकावं लागत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या युवा स्वाभिमाच्या माहिलांनी आज पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करण्याचा प्रयत्न केला.
[read_also content=”स्वत:च्या पत्नीलाच मित्रांसोबत शारिरीक संबंध ठेवण्यास भाग पाडत होता पती; तक्रार आली अन्… https://www.navarashtra.com/maharashtra/a-husband-arrested-with-his-2-friends-in-allegation-of-sexual-harrasment-incident-in-pune-nrka-281420.html”]
युवा स्वाभिमानिच्या माजी नगरसेवीका सुमती ढोके यांच्या सह महिलांनी हे आंदोलन केल. यावेळी तीन ते चार महिलांचा पाण्याच्या टाकीवर चढण्याचा प्रयत्न केला.दरम्यान टाकीच्या काही पायऱ्या चढल्या नंतर महिला पोलिसांनी त्यांना टाकीवर चढण्यापासून रोखलं. पाणी पुरवठा अधिकारी रात्री बारा नंतर पाणी पुरवठा करत असल्याचा केलेला आरोप यावेळी केला. तसेच लवकरात लवकर पाणी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी या महिलांनी केली.
[read_also content=”तामिळनाडूमध्ये दोन बसचा भीषण अपघात, व्हिडिओ बघाल तर बसेल धक्का https://www.navarashtra.com/viral/two-private-buses-accident-in-selam-area-of-tamilnadu-nrsr-281418.html”]