ट्रक अपघात चालक ठार (फोटो- aigemini
मुंबई-गोवा महामार्गावर ट्रक अपघातात चालक ठार
केबिनखाली चिरडून चालकाचा मृत्यू
लांजा तालुक्यात घडला अपघात
लांजा: मुंबईहून गोव्याच्या – दिशेने जाणाऱ्या ट्रक मुंबई गोवा महामार्गा लगतच्या सुरक्षा भिंतीला व दिशादर्शक फलकाला जोरदार धडक देऊन यात – महामार्गावर पलटी झाला. केबिनखाली चिरडून ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला. सोमवारी दुपारी – पाऊणच्या सुमारास धनावडे शेती फार्मसमोर हा अपघात घडला.
ट्रक चालक जितेश रामजी मसालिया (वय ३२, रा. शेख, टिंबो कोली वास, ता. – अंजार, जि. कच्छ, गुजरात) आपल्या ताब्यातील मालवाहू ट्रक (जीजे. १२ बीझेड २९१७) घेऊन मुंबईहून गोव्याच्या दिशेने जात होता. ट्रक लांजा तालुक्यातील धनावडे शेती फार्मसमोर आला असता रस्त्याच्या कडेला असलेल्या सुरक्षा भिंतीला व दिशादर्शक फलकाला जोरदार धडकला. धडकल्यानंतर ट्रक पलटी होऊन चालकाचा केबिन खाली चिरडून जागीच मृत्यू झाला. पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक देवकन्या अधिक तपास करत आहेत.
Accident News: तिहेरी अपघातात महिलेचा मृत्यू; अपघातग्रस्त स्कुटीला ठोकर…
तिहेरी अपघातात महिलेचा मृत्यू
कुडाळ-मालवण मार्गावर कल्पना अपार्टमेंट समोर सोमवारी सकाळी सुमारे ११.१० वाजता झालेल्या दोन दुचाकी व ट्रक यांच्यात झालेल्या तिहेरी अपघातात स्कुटीस्वार महिलेचा जागीच मृत्यू झाला. महिलेच्या रस्त्यावर पडलेल्या अपघातग्रस्त स्कुटीला ठोकर बसून एक दुचाकीस्वारही किरकोळ जखमी झाला आहे.
या अपघात प्रकरणी ट्रकचालक महम्मद सादिक उस्मानसाब कितुर (वय ५५, रा. निमदगड तर्फ खानापूर, जि. बेळगाव) याच्यावर कुडाळ पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. ट्रकचालक महम्मद सादिक उस्मानसाब कितुर हा नेरूर येथून कुडाळच्या दिशेने जात होता. यावेळी हा ट्रक कल्पना अपार्टमेंट समोर आल्यावर अचानक व धोकादायकरीत्या आपल्या ट्रकचा वेग कमी केला.
Accident News: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर टेम्पो पलटी; लोखंडी साहित्य थेट…
यामुळे त्याच्या मागून येणाऱ्या स्कुटीवरील स्वार निलम निलेश मेस्त्री (वय ३५, रा. नेरूर साईटेंब, ता. कुडाळ) यांनी अचानक ब्रेक लावला. त्यात त्या ट्रकच्या मागील चाकाखाली पडल्या आणि ट्रकचे चाक त्यांच्या डोक्यावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर स्कुटी रस्त्यावर पडून मागून येणाऱ्या पल्सर मोटारसायकलला धडकली, या मोटारसायकलवरील स्वार मुकुंद नितीन मार्गी (वय २४, रा. रोयुडीयेवाडी, नेरुर तर्फ हवेली देऊळवाडा, ता. कुडाळ) हे किरकोळ जखमी झाले.






