मुंबई : मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) आणि संतोष धुरी ( Santosh Dhuri) यांना अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे. त्यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणण्याचा आरोप होता. संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्या अटकपूर्व जामीनावरील सुनावणी (Bail) १७ मे रोजी पूर्ण झाली होती. मात्र मुंबई सत्र न्यायालयाने (Mumbai Session Court) १९ मे रोजी अटकपूर्व जामीनावरचा निकाल जाहीर करणार असल्याचे सांगितले होते. आता निकाल जाहीर झाला असून संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना जामीन (Bail To Sandeep Deshpande And Santosh Dhuri) मिळाला आहे.
[read_also content=”कुणीही गॉडफादर नसताना स्वत:च्या अभिनयाच्या जोरावर नवाजुद्दीन सिद्दीकींनी निर्माण केली आपली खास ओळख https://www.navarashtra.com/photos/happy-birthday-nawazuddin-siddiqui-information-about-actor-nrsr-281822.html”]
राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानाबाहेर संदीप देशपांडे आणि संतोष धुरी हे प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. माध्यमांशी बोलणं झाल्यानंतर संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना पोलिसांनी ताब्यात घेत असल्याचं सांगितलं. त्यावेळी संदीप देशपांडे यांनी आम्ही तुमच्यासोबत येत असल्याचं पोलिसांना सांगितलं. काही अंतर पोलिसांसोबत चालल्यानंतर संदीप देशपांडे आणि संतोष धुरी हे देशपांडे यांच्या खासगी गाडीत बसले. त्यावेळी पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. पण गाडी न थांबवताच ते तिथून निघून गेले. त्यांची गाडी भरधाव वेगानं जात असताना एक महिला पोलीस जखमी झाली.
संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांनी पोलिसांना गुंगारा देत पळ काढल्यानंतर त्यांच्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. पण पोलिसांनी याप्रकरणी संदीप देशपांडेंवर गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध घेत आहेत. एवढंच नाही तर संदीप देशपांडेंना शोधण्यासाठी पोलीस राज ठाकरेंच्या शिवतीर्थावरही पोहोचले होते.






