Ranjani Onion Farmers: कांदा उत्पादक शेतकरी संकटात; दर कोसळले, खर्चही न निघाल्याने आंबेगावात चिंता
सध्या बाजारात गावरान कांद्याला सरासरी ९०० रुपये तर लाल कांद्याला १००० रुपये प्रति क्विंटल सरासरी दर मिळत आहे, असे सांगितले जात आहे. परंतु, बहुतांश ठिकाणी कांद्याचा दर ६०० रुपयांच्या आतच आहे. कांदा दराला निर्यात बंदीचा फटका बसत असून सध्याच्या दरातून मिळणाऱ्या रकमेत खर्चही निघत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी हतबल आहेत.
प्रामुख्याने पुणे जिल्ह्यात कांद्याचे अधिक प्रमाणात उत्पादन घेतले जाते. खरीप लेट खरिपात साधारण 5 हजार हेक्टर क्षेत्रात रब्बीत साधारणतः ७ ते ८ हजार हेक्टरकांद्याचे क्षेत्र असते. दरवर्षी कांदा क्षेत्रात बदल होतो. दराची पडझड मात्र गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. एखाद्या लिलावाला दर वाढले की लगेच पुढच्या लिलावाला दर कमी होत आहेत. मागील आठवड्यात गावरान कांद्याचे दर 3 हजार रुपयांपर्यंत तर लाल कांद्याचे दर ३ हजार ६०० रुपयांपर्यंत गेले होते. मात्र, त्यानंतर पुन्हा दर खाली आले आहेत. त्यामुळे कांदा उत्पादक मात्र कमालीचे हतबल झाले आहेत.
कांद्याचे पीक खर्चिक झाले आहे. महेश कुंडलिक जाधव या शेतकऱ्याने सांगितले की कांद्यासाठी शेत तयार करणे रोटाव्हेटर, रोपे तयार करणे, वाफे पाडणे खत तसेच फवारणी, लागवड, पाणी, कांद्याची काढणी ते घरापासून बाजारापर्यंत येण्याची वाहतूक असा एकरी 70 हजार रुपयाहून अधिक खर्च येतो. मजुरी खताचे, बियाणांचे आणि फवारणीचे दर दरवर्षी 25 टक्क्यांनी वाढत आहेत बाजारात कांदा निघाल्यावर कांदा विक्रीतून मिळालेली रक्कम आणि तेवढाच खर्च होत असेल तर काय म्हणावे अशीच परिस्थिती राहिली तर सर्वाधिक वाईट अवस्था कांदा उत्पादकांची होणार आहे.
Leopard News: रात्री अन् दिवसा बिबट्याचा खेळ; ‘या’ जिल्ह्यातील 105 गावांमध्ये दहशत
गेल्या सहा ते सात वर्षांपासून कांद्याचे दर वाढलेल नाहीत, सध्या कांद्याला मिळणारा दर म्हणजे एवा रुपया खर्च आणि उत्पन्न 12 आणे अशी स्थिती आहे त्यामुळे कांदा उत्पादन घेणे म्हणजे कर्जबाजारी होऊन आत्महत्या करण्याच्या मार्गाने अशीच आहे. कांद्याला किमान 3 हजार रुपयांपेक्षा अधिक दर देऊन निर्यात बंदी उठवली तरच कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चांगल दिवस येतील असे वळती (ता. आंबेगाव) येथील कांदा उत्पादक शेतकरी धोंडीभाऊ रामभाऊ भोर यांनी सांगितले, कांदा उत्पादनाला प्रति एकरी 40 ते 50 हजार रुपयाहून अधिक खर्च येत आहे. त्यातून दहा पंधरा टणांपर्यंत उत्पादन निघते काही दिवसांपासून मिळणारा दर पाहता पाच महिने मेहनतीने पिकवलेल्या कांद्याला कांद्याचा खर्चही निघत नाही. सरकारचे धोरणा अत्यंत चुकीचे आहे त्यामुळे शेतकरी कोलमडून पडला असल्याचे जाधववाडी (ता. अम्बेगाव) येथील शेतकर आणि उपसरपंच संपतराव जाधव यांनी म्हटले आहे.






