Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 14 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

14 वर्षांपासून जमिनीची प्रतीक्षा; मागासवर्गीय खंडकरी वारसाचा बारामतीत 15 ऑगस्टपासून आमरण उपोषणाचा इशारा

इंदापूर तालुक्यातील कळंब येथील खंडकरी शेतकरी शंकर लक्ष्मण महार यांचे कायदेशीर वारस उमेश घोडके यांनी हक्काच्या शेतजमिनीसाठी प्रशासनाविरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे. १५ ऑगस्टपासून बारामतीत आमरण उपोषण करण्याची घोषणा त्यांनी केली आहे.

  • By विवेक
Updated On: Aug 14, 2026 | 10:05 PM
baramati

baramati

Follow Us
Follow Us:

इंदापूर:(वा.) : महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाचे मूळ खंडकरी शेतकरी शंकर लक्ष्मण महार यांचे कायदेशीर वारस उमेश भानुदास घोडके (रा. कळंब, ता. इंदापूर) यांनी न्याय्य हक्काच्या शेतजमिनीसाठी प्रशासनाविरुद्ध एल्गार पुकारला आहे. २०१२ च्या शासकीय परिपत्रकानुसार हक्काची जमीन मिळण्यासाठी गेल्या १४ वर्षांपासून पाठपुरावा करूनही, केवळ मागासवर्गीय (अनुसूचित जाती) असल्याने प्रशासनाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा गंभीर आरोप घोडके यांनी केला आहे. या अन्यायाविरोधात येत्या १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ७:०० वाजेपासून बारामती येथील प्रशासकीय भवनासमोर आपल्या कुटुंबासह आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा त्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

​शासकीय नियमानुसार उमेश घोडके व त्यांच्या चुलत भावाला ९ एकर २६ गुंठे शेतजमीन मिळणे अपेक्षित होते. मात्र, प्रशासनाकडून त्यांना दिलेली गट नं. ३९२ मधील जमीन ही चोपण, करल आणि पूर्णतः नापीक आहे. याउलट, मौजे कळंब येथील गट नं. २५१/१ मध्ये शेती महामंडळाचे सुमारे २० एकर सुपीक क्षेत्र शिल्लक आहे. हे क्षेत्र मिळण्यासाठी घोडके गेल्या १० वर्षांहून अधिक काळापासून मागणी करत आहेत. याबाबत पुणे जिल्हाधिकारी आणि शेती महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक यांनी सदर जमीन देण्यास कोणतीही हरकत नसल्याचे लेखी पत्राद्वारे कळवले होते. तरीही बारामती उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडून त्यांना जमिनीचा ताबा देण्यास टाळाटाळ केली जात आहे.

Wai – एम.आय.डी.सी.तील ‘अर्थव फाउंड्री’विरोधात शेतकऱ्यांचा एल्गार; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे १५ ऑगस्टपासून आमरण उपोषणाचा इशारा

​सध्या सदर गट नं. २५१/१ ही जमीन एमआयडीसीसाठी (MIDC) संपादित केली जात असल्याचे सांगून दिशाभूल केली जात आहे. वास्तविक, लोकवस्तीजवळ असलेली ही सुपीक जमीन एमआयडीसीच्या नावाखाली राजकीय हितसंबंध जपण्यासाठी व धनदांडग्यांच्या घशात घालण्यासाठी हा प्रशासकीय घाट घातला जात असल्याचे घोडके यांनी म्हटले आहे. उलटपक्षी, घोडके यांना राहत्या घरापासून १२ ते १५ किमी अंतरावर रस्ता नसलेल्या दुर्गम ठिकाणी जमीन दाखवली जात आहे.

​गेल्या १४ वर्षांत जमीन न मिळाल्याने सुमारे ५० लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचे घोडके यांनी नमूद केले. १५ ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या उपोषणादरम्यान प्रशासनाने त्वरित योग्य ती कारवाई न केल्यास कुटुंबासह आत्मदहन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

विकसित होत असलेल्या जतच्या विकासाला निधीची कमतरता भासू देणार नाही – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

Web Title: Baramati khandkari heir land demand hunger strike 15 august 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 14, 2026 | 10:05 PM

Topics:  

  • baramati
  • pune news

संबंधित बातम्या

पुणे जिल्हा बँकेच्या एलटीएसबी बाँडची विक्रमी विक्री; निर्धारित वेळेआधीच 500 कोटींचे उद्दिष्ट पूर्ण
1

पुणे जिल्हा बँकेच्या एलटीएसबी बाँडची विक्रमी विक्री; निर्धारित वेळेआधीच 500 कोटींचे उद्दिष्ट पूर्ण

Pune News: एमआयटी-जिंदाल स्टेनलेस यांच्यात करार; टनेल इंजिनिअरिंगसाठी विशेष अभ्यासक्रम सुरू
2

Pune News: एमआयटी-जिंदाल स्टेनलेस यांच्यात करार; टनेल इंजिनिअरिंगसाठी विशेष अभ्यासक्रम सुरू

‘परिवर्तनासाठी सक्षम युवाशक्ती आवश्यक’; माजी परराष्ट्र सचिव डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांचं विधान
3

‘परिवर्तनासाठी सक्षम युवाशक्ती आवश्यक’; माजी परराष्ट्र सचिव डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांचं विधान

शास्त्रीनगर, विश्रांतवाडीत लवकरच वाहतूक कोंडीतून दिलासा; महापालिका आयुक्तांनी दिले निर्देश
4

शास्त्रीनगर, विश्रांतवाडीत लवकरच वाहतूक कोंडीतून दिलासा; महापालिका आयुक्तांनी दिले निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.