Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Majhi Vasundhara 5.0: बारामती नगरपरिषदेचा राज्यात डंका! ‘माझी वसुंधरा ५.०’ अभियानात पटकावला प्रथम क्रमांक

राज्य शासनाच्या 'माझी वसुंधरा अभियान ५.०' अंतर्गत घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत बारामती नगरपरिषदेने ४० हजार ते १ लाख लोकसंख्या गटामध्ये उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Feb 18, 2026 | 09:32 AM
Majhi Vasundhara 5.0: बारामती नगरपरिषदेचा राज्यात डंका! ‘माझी वसुंधरा ५.०’ अभियानात पटकावला प्रथम क्रमांक
Follow Us
Follow Us:
  • ‘माझी वसुंधरा ५.०’ मध्ये बारामती नगरपरिषदेचे यश
  • दिवंगत अजित पवार यांच्या कार्याचा गौरव
  • स्वच्छ सर्वेक्षण २०२६ साठी नवा संकल्प
 

Baramati News:  “माझी वसुंधरा अभियान ५.०” अंतर्गत भूमी, जल, वायु, अग्नी व आकाश या पंचतत्त्वांवर आधारित स्थानिक स्वराज्य संस्थांची राज्यस्तरीय स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत ४० हजार ते १ लाख लोकसंख्या गटामध्ये उत्कृष्ट कामगिरी करत बारामती नगरपरिषदेने प्रथम क्रमांक पटकावला आहे.

बारावी परीक्षेचा ताण असहाय्य झाल्याने विद्यार्थिनीचे टोकाचे पाऊल; गळफास घेऊन संपवलं जीवन

पर्यावरण संवर्धन, संरक्षण व जतन या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल बारामती नगरपरिषदेचा सन्मान “माझी वसुंधरा अभियान सन्मान सोहळ्या”त करण्यात येणार आहे. हा सन्मान सोहळा शनिवारी (दि २१) दुपारी १२.०० वाजता डोम, सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम येथे  मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार , पर्यावरण मंत्री तसेच इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. हे राज्यस्तरीय यश महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शन व नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या उपक्रमांचे फलित असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यांच्या प्रेरणेने नगरपरिषद प्रशासनाने पर्यावरणपूरक व शाश्वत विकासाच्या दिशेने भरीव कामगिरी केली आहे.महाराष्ट्र राज्याच्या विद्यमान उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी बारामती नगर परिषदेचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.

या यशाबाबत नगराध्यक्ष सचिन सातव यांनी सांगितले कि, माझ्या बारामती शहराची देशातील पहिल्या पाच शहरांमध्ये गणना झाली पाहिजे,हे ‘अजितदादां’चे स्वप्न होते.त्यांच्याच मार्गदर्शनाखाली राबविलेल्या विविध उपक्रमांचे हे मोठे यश आहे.आज ‘दादां’च्या बारामतीने राज्यात प्रथम क्रमांक मिळविलेले यश पाहण्यासाठी तेच आपल्यात नाहित,याची खुप मोठी खंत बारामतीकरांमध्ये आहे.‘दादां’वर खऱ्या अर्थाने प्रेम करणाऱ्या बारामतीकरांचे यामध्ये मोठे योगदान आहे.आता देशाच्या नकाशावर बारामतीची ओळख करण्यासाठी आम्ही बारामतीकर सज्ज आाहोत.‘दादां’ना अभिप्रेत असणारे देशातील शहर घडविण्यासाठी आम्ही सर्वजण कटीबध्द आहोत,असे सातव म्हणाले.

10 महिन्यांच्या चिमुकलीने सर्वात कमी वयात केले ऑर्गन डोनेट, रस्ते अपघातात जीव गेला… आता अनेकांना देणार

दरम्यान, बारामती नगर परिषदेचे नगराध्यक्ष सचिन सदाशिव सातव, उपाध्यक्ष श्वेता योगेश नाळे व मुख्याधिकारी पंकज अनिल भुसे तसेच सर्व सन्माननीय सभापती, गटनेते, नगरसेवक व नगरसेविका यांनी शहरातील नागरिक, अधिकारी व कर्मचारी यांच्या सक्रिय सहभागाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. तसेच दिवंगत अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करत २०२६ मधील स्वच्छ सर्वेक्षण अभियानात देशपातळीवर सर्वोत्तम कामगिरी करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला. बारामती शहरातील नागरिकांना अधिक भरीव योगदान देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बारामती शहराच्या पर्यावरणपूरक वाटचालीत नागरिकांनी यापुढेही सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन नगरपरिषद प्रशासनाने केले आहे.

 

Web Title: Baramati municipal council stuns the state won first place in majhi vasundhara 50 campaign

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 18, 2026 | 09:32 AM

Topics:  

  • Baramati Politics
  • Marathi News
  • pune news

संबंधित बातम्या

Russia-Ukraine :धक्कादायक ;युक्रेनवर रशियाचा मोठा मिसाईल-ड्रोन हल्ला ;२४ जणांचा मृत्यू
1

Russia-Ukraine :धक्कादायक ;युक्रेनवर रशियाचा मोठा मिसाईल-ड्रोन हल्ला ;२४ जणांचा मृत्यू

World News:तेलाचा भाव १०० डॉलरपार,जगाला महागाईचा झटका; पेट्रोल-डिझेलपासून वाहतुकीपर्यंत वाढणार दबाव
2

World News:तेलाचा भाव १०० डॉलरपार,जगाला महागाईचा झटका; पेट्रोल-डिझेलपासून वाहतुकीपर्यंत वाढणार दबाव

Taiwan-China : तैवानजवळ चीनची लष्करी हालचाल; १४ लढाऊ विमानांसह ८ जहाजांची घुसखोरी, तणाव वाढला
3

Taiwan-China : तैवानजवळ चीनची लष्करी हालचाल; १४ लढाऊ विमानांसह ८ जहाजांची घुसखोरी, तणाव वाढला

West Bank News : ऑलिव्हच्या शेतात रक्तपात; वसाहतवाद्यांच्या हल्ल्यात पॅलेस्टिनी नागरिक ठार
4

West Bank News : ऑलिव्हच्या शेतात रक्तपात; वसाहतवाद्यांच्या हल्ल्यात पॅलेस्टिनी नागरिक ठार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.