
Yugendra Pawar, Someshwar Sugar Factory, Baramati Politics,
बारामती शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दत्तात्रय चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सतीश खोमणे आणि पक्षाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र जगताप उपस्थित होते.
Rahul Gandhi News: विद्यार्थी भाजपवर नाराज; महाराष्ट्रातील परीक्षा आंदोलनावर राहुल गांधींचा इशारा
युगेंद्र पवार म्हणाले की, दोन-तीन आठवड्यांपूर्वी निंबूत येथे सभासद व कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला होता. या मेळाव्याला मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते. त्यानंतर सोमेश्वर कारखाना कार्यक्षेत्रातील बारामती, पुरंदर, फलटण आणि खंडाळा तालुक्यांतील सभासदांच्या भेटीगाठी घेऊन त्यांची मते जाणून घेण्यात आली.
या संवादादरम्यान अनेक सभासदांनी अजित पवार यांच्यानंतर पावा साहेब यांनी सोमेश्वर कारखान्याकडे लक्ष द्यावे, अशी भूमिका मांडल्याचे युगेंद्र पवार यांनी सांगितले. अजित पवार यांनी कारखाना अडचणीतून बाहेर काढून तो सक्षमपणे चालविण्यासाठी विशेष लक्ष दिले. साखर उद्योगाचे मोठे ज्ञान आणि अनुभव साहेबांकडे आहे. अजितदादा देखील अनेक बाबतीत त्यांचे मार्गदर्शन घेत होते, असे त्यांनी नमूद केले.
१९९२ मध्ये सोमेश्वर कारखान्याची सत्ता आल्यानंतर अजितदादांनी कारखान्याच्या कामकाजाकडे बारकाईने लक्ष दिले. त्यांच्या नेतृत्वामुळे सभासदांचा विश्वास निर्माण झाला होता. सध्याच्या परिस्थितीत कारखान्याला चांगल्या विचारांचे, सक्षम आणि प्रामाणिक संचालक मंडळ आवश्यक असल्याचे सभासदांचे म्हणणे आहे.
या पार्श्वभूमीवर पवार साहेब यांच्याशी चर्चा करून त्यांचे मार्गदर्शन घेण्यात आले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना कार्यक्षेत्रातील सर्वपक्षीय प्रामाणिक कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन शेतकरी पॅनल उभे करण्यात येणार आहे. कारखान्याच्या हितासाठी काम करण्याची क्षमता असलेल्या नवीन चेहऱ्यांना या निवडणुकीत संधी देण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे युगेंद्र पवार यांनी स्पष्ट केले.